खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू


अलिबाग, दि.28(जिमाका) :- पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता खालापूर तालुक्यातील पळसाचा बंधारा (टेपाचीवाडी नढाळ), पोखरवाडी बंधारा, झेनिथ धबधबा, झेनिथ धबधबा व परिसर, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव, नढाळ बंधारा, मोरबे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, कलोते धरण, धामणी कातकरवाडी धरण, भिलवले धरण माडप धबधबा, बोरगाव धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे,  सायंकाळी 6.00 वाजल्यानंतर ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस परिणाम, अडथळा होईल अशा प्रकारे वाहन चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकदायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॉस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॉस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टीम वाजविणे, गाडीमधील स्पीकर, वूफर वाजविणे  व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, अत्यावश्यक सेवा वगळून धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश या सर्व बाबींसाठी दि.16 जून ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी कर्जत प्रातांधिकारी अजित नैराळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कर्जत प्रातांधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक