Posts

Showing posts from October 3, 2021

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सोयी-सुविधांची, सुरू असलेल्या कामांची पाहणी

    अलिबाग,जि.रायगड, दि.09 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतीच जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन तेथे नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची, सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्याचबरोबर येथील नवीन इमारतीची बांधकाम पाहणी करताना त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.    यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.      या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वयाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रगतीपथावर   असलेली कामे उत्तम दर्जाची तसेच नेमून दिलेल्या वेळेतच पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. तसेच त्यांनी नागरिकांना मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात स्वच्छ धुवा, घराबाहेर अत्यावश्यक कारणांशिवाय पडू नये, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूचीसाठी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका):-आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (PMEME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहे.   संसाधनव्यक्ती (ResourcePerson), शैक्षणिक अर्हता, नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान/अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी अथवा ज्या व्यक्तींना अन्न प्रक्रिया उद्योग, बँकींग, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रशिक्षणाचा अनुभव आहे अशा व्यक्ती. अनुभव, अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन/वृध्दी, नविन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा |व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षांचा अनुभव.     या   पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.20 ऑक्टोबर 2021 राहील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना अर्जाचा

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यासाठी नवीन नियमावली जाहीर

  वृत्त क्रमांक:-1033                                                                     दिनांक:- 09 ऑक्टोबर 2021     अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका) :-             शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशामधील कोविड-19 विषाणूचा प्रसार संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दती बाबत व करावयाच्या उपयायोजनेबाबत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने प्रतिबंधीत (Containment Zone) क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे दि.07 ऑक्टोबर 2021 रोजी पासून मानक कार्यप्रणालीचा (Standard Operating Procedure) अवलंब करण्याच्या अधिन राहून सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे.   त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी   साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती   व्यवस्थापन अधिनियम, 2005 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 तसेच शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेनुसार रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पुढील आदेश होईपर्यंत यापूर्वी लागू क

एकाच कारवाईमध्ये विनापरवाना मळीची वाहतूक करणाऱ्या सहा टँकरसह कोटयावधीचा मुद्देमाल जप्त

    अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका):-   निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकास   मिळालेल्या गोपनीय खबरीनुसार दि.06 ऑक्टोबर 2021 रोजी केलेल्या कारवाईमध्ये कोनेक्स टर्मिनल प्रा.लि.(CFS) कंपनीच्या गेटच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला, भेंडखळ ता. उरण जि. रायगड या ठिकाणी विनापरवाना मळीची अवैध वाहतूक करणारे 04 टँकर तसेच पुढील तपासामध्ये कोनेक्स टर्मिनल प्रा.लि. (CFS) कंपनीच्या गेटच्या आतील बाजूस मळीने भरलेले दोन टँकर तसेच या टँकरमधून कंटेनरमध्ये मळीसाठा काढण्याकरिता वापरण्यात आलेला शिवाय कंपनीचा एक 5 एच.पी. चा मोठा थ्री फेज इंडक्शन मोटर पंप जप्त केला आहे.   या प्रकरणी   केलेल्या तपासामध्ये कोणत्याही टँकर चालकांकडे तसेच याठिकाणी उपस्थित असलेल्या निर्यातदाराकडे मुंबई मळी नियम 1955 मधील तरतुदीनुसार मळी आयात करणे, निर्यात करणे, विक्री करणे व जवळ बाळगणे तसेच महाराष्ट्र थेट वाहतूक पास नियम, 1997 मधील तरतुदीनुसार लागणारा कोणताही शासकीय वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टँकरचालक व निर्यातदार यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी ही व

जिल्हा अग्रणी बँकतर्फे पेणमधील गांधी वाचनालय येथे महाकर्ज मेळाव्याचे होणार आयोजन

  अलिबाग जि.रायगड,दि.9 (जिमाका) :- वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी   बँक ,बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे दि.14 ऑक्टोबर   2021 रोजी गांधी वाचनालय, पेण, पेण-खोपोली रोड, वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत   कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .       पेण शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका यामध्ये सहभागी होणार आहेत,या कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेअंतर्गत   शिशू कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत कर्ज तसेच विविध msme आणि गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकऱ्यांना, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना, अणि कुकुट पालन आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि अलिबाग नगर पालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज, नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरू साठी जिल्हा उद्योग मार्फत PMEGP, CMEGP या   योजनेंतर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.          त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 35 टक्के अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृषी कर्ज, तसेच नाबार्ड चे कृषी पायाभूत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहर 2021-22 करिता प्रस्ताव द्यावेत

  अलिबाग जि.रायगड, दि.9 (जिमाका) :- शासनाने आंबा व काजू पिकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई ही कंपनी मी आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे.       या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, कमी तापमान 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख, गारपीट दि.01 जानेवारी ते 30 एप्रिल, विमा संरक्षित रक्कम 33 हजार 333.        आंबा पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.15 मे, कमी तापमान दि.1 जानेवारी ते दि.10 मार्च, जास्त तापमान दि.1 मार्च ते दि.15 मे, वेगाचा वारा दि.10 एप्रिल ते दि.15 मे विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख 40 हजार,  गारपीट दि.1 फेब्रुवारी ते दि.31 मे विमा संरक्षित रक्कम

बँकांनी पत धोरणाच्या 100 टक्के कर्ज वितरणाचे धोरण ठेवावे --डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महा कर्ज मेळावा संपन्न

      अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका)- आर्थिक सेवा विभाग, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार अणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलिबागमध्ये जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महा कर्ज मेळाव्याचे   क्षत्रिय समाज हॉल कुरुळ येथे यशस्वी आयोजन करण्यात आले.                या बँक कर्ज मेळाव्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 10 शासकीय बँकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, पोस्ट पेमेंट बँक, स्वयंसहायता समूहाचे स्टॉल,स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यास अलिबाग तालुक्यातील जनतेकडून उत्तम   प्रतिसाद मिळाला.                 यावेळी जिल्हाधिकारी श्री. डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या शुभ हस्ते 35 लाभधारकांना विविध बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेले पीक कर्ज, मुद्रा   कर्ज, बचत गट कर्ज,   उद्योजक यांना मुद्रा कर्ज मंजुरी पत्र   देण्यात आले.               जिल्हाधिकारी महोदयांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या निसर्ग चक्रीवादळ, ताउत्के वादळ, पूर परिस्थिती आणि करोना यासारख्या विविध संक

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

                                                          दिनांक:- 09 ऑक्टोबर 2021                   अलिबाग जि.रायगड,दि.9 (जिमाका) :- जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांखिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित   कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.           त्यानुसार सप्टेंबर, 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिस