आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूचीसाठी अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका):-आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (PMEME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहे.

 संसाधनव्यक्ती (ResourcePerson), शैक्षणिक अर्हता, नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान/अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी अथवा ज्या व्यक्तींना अन्न प्रक्रिया उद्योग, बँकींग, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रशिक्षणाचा अनुभव आहे अशा व्यक्ती. अनुभव, अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन/वृध्दी, नविन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा |व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षांचा अनुभव.

  या  पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.20 ऑक्टोबर 2021 राहील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना अर्जाचा नमूना सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी शर्तों या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर सुद्धा उपलब्ध आहेत. या पदासाठी संस्था पात्र असणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड अलिबाग श्रीमती उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक