Posts

Showing posts from November 6, 2022

“स्वच्छ विद्यालय पुरस्कार” राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची निवड

Image
  अलिबाग, दि.11 (जिमाका):-  संचालक, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या पत्रान्वये सन 2021-22  “ स्वच्छ विद्यालय पुरस्कार ”  राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेची निवड झाल्याचे कळविले आहे. या स्वच्छ विद्यालय पुरस्काराचा कार्यक्रम केंद्रीय शिक्षणमंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने गुरुवार, दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेचे प्राचार्य व त्यांचे सहकारी शिक्षकांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात आला. 00000

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत “चला उद्योजक होऊया” ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Image
  अलिबाग, दि.11 (जिमाका):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील व्यवसाय इच्छुक तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये विविध विषयातील तज्ञ मंडळींकडून व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. बदलत्या काळानुरूप शेती या पारंपरिक व्यवसायाचे स्वरूपही बदलते आहे. या पारंपरिक उद्योगास नवीन शेतीपूरक जोड धंद्यांची साथ दिल्यास निश्चितच चांगली उत्पन्न निर्मिती करता येईल. यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्यामार्फत मंगळवार, दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता  “ चला उद्योजक होऊया ”  या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयांतर्गत कृषी क्षेत्रातील नव उद्योजक श्री.हेमंत कोंडीलकर हे सेंद्रिय खत निर्मितीतून स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र सगळ्यांसाठी खुले असून गुगल-मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होण्याकरिता इच्

आदिवासींच्या विविध प्रश्नांवर राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीची बैठक संपन्न

  अलिबाग, दि.11 (जिमाका):-  राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडीत व आदिवासी उपयोजनेतील कार्यान्वयीन यंत्रणांची आदिवासींच्या विविध प्रश्नांवर गुरुवार, दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी आगरी समाज हॉल, पेण येथे बैठक संपन्न झाली. राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष श्री.पंडीत यांच्या अध्यतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, रोहा तहसिलदार कविता जाधव, सुधागड तहसिलदार उत्तम कुंभार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण नियोजन अधिकारी आनंदकुमार हेमाडे व इतर कार्यान्वयीन यंत्रणा उपस्थित होत्या. बैठकीच्या सुरुवातीला सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.पवार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रकल्प कार्

रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात “भारतभर जागरूकता व संपर्क अभियाना”चे आयोजन

  अलिबाग, दि.10 (जिमाका):-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्याकडील निर्देशाप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.31 ऑक्टोबर ते दि.13 नोव्हेंबर 2022 पर्यंत संपूर्ण भारतात  “ भारतभर जागरूकता व संपर्क अभियान (Pan India Awareness & Outreach) ”  चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग व रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, जुने पनवेल येथे विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती एस.एस.सा

“मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023” अंतर्गत वरसोली ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा संपन्न

Image
अलिबाग, दि.10 (जिमाका):-  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आदेशानुसार  “ मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 ”  अंतर्गत आज अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कल्याणकर यांनी उपस्थित मतदारांना दि.9 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. वरसोली ग्रामपंचातीमधील मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणी किती मतदारांची झाली याचा त्यांनी आढावा घेतला. तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणे तसेच मतदारयादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सूचित केले. या ग्रामसभेच्या निमित्ताने दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीचे वाचनही करण्यात आले. यावेळी सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, सदस्य सुरेश घरत, सुजय घरत, नमिता माळवी, सजवणी कवळे,

मतदारांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आवाहन

Image
“ देशाचे भाग्यविधाते होऊ.. मतदारयादीत नाव नोंदवू ”     अलिबाग, दि.09 (जिमाका):-  मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे. दिव्यांग, तृतीयपंथीकरिता वय, पत्ता याबद्दल येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आवश्यक दस्तऐवजाबाबत निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत देण्यात आली आहे. नाव नोंदणीची सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि.19 व रविवार, ‍दि.20 नोव्हेंबर 2022 आणि शनिवार, दि.3 व रविवार, दि.4 डिसेंबर 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संक्षिप्त पुनरीक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या घटकांसाठ

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे “सायकल रॅली”व “वॉकेथॉन”संपन्न

Image
नवमतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे केले आवाहन   अलिबाग, दि.09 (जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागांतर्गत दि.9 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत नवमतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने  “ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2023 ”  अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांच्या पुढाकारातून अलिबाग रोजी  “ सायकल रॅली ” आणि  “ वॉकेथॉन ” चे आयोजन करण्यात आले. या रॅलीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, नायब तहसिलदार (निवडणूक) राजश्री साळवी, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून नवमतदारांना मतदार नोंदणी करण्याविषयीचे आवाहन करण्यात आले. छायाचित्रासह मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पु

फिट इंडिया मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता शाळा-महाविद्यालयांनी दि.15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी

  अलिबाग, दि.07 (जिमाका):-  आयुक्त, शिक्षण व क्रीडा यांनी दिलेल्या निर्देशानुसार  “ फिट इंडिया प्रश्नमंजुषा 2022 ”  या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. या स्पर्धेकरिता नोंदणी करण्याची मुदत दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी  http://fitindia.nta.ac.in  या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी. तरी  “ फिट इंडिया प्रश्नमंजुषा 2022 ”  या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयांनी सहभागी व्हावे. या स्पर्धेसंबंधी अधिक माहितीकरिता  http://fitindia.nta.ac.in  या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. 00000

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे दि.9 नोव्हेंबर रोजी “सायकल रॅली” व “वॉकेथॉन”चे आयोजन

  अलिबाग, दि.07 (जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागांतर्गत दि.9 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत नवमतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने  “ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2023 ”  अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे बुधवार, दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी  “ सायकल रॅली ”  आणि  “ वॉकेथॉन ” चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथून सुरु होणार असून रॅलीची सांगता अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर होणार आहे. तरी शाळा/महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी/खेळाडू यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. 00000

विशेष लेख: शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग मच्छिमार, मत्स्यसंवर्धन लाभार्थ्यांसाठी सदैव तत्पर..!

  रायगड जिल्ह्याला समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक वैभव प्राप्त आहे. या समुद्रकिनाऱ्यांवर येथील मच्छिमारांची उपजीविका अवलंबून आहे. या मच्छिमारांच्या सहाय्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. कोणत्या आहेत या योजना… जाणून घेऊ या लेखातून…!   किसान क्रेडिट कार्ड:- “ किसान क्रेडीट कार्ड ”  या योजनेंतर्गत मच्छिमारांना त्यांच्या उपलब्ध नौकांच्या आधारावर नवीन अल्प मुदत कर्ज देण्यात येते. डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर प्रतिपूर्ती:- या योजनेंतर्गत मच्छिमारांनी खरेदी केलेल्या डिझेल तेलावरील कराची किंमत कर प्रतिपूर्ती म्हणून मच्छिमारांना परत देण्यात येते. या संस्थेच्या यांत्रिक नौका सभासदांना, मासेमारी नौकांना डिझेल प्रतिपूर्तीसाठी तरतूद प्राप्त झाल्यावर प्राप्त तरतूदीच्या अधीन राहून मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाच्या यांत्रिक नौका सभासदांच्या खाती डिबीटीद्वारे रक्कम वाटप करण्यात येते. आधारकार्ड अपडेशनबाबत कार्यवाही :- मच्छिमारांकरीता UIDAI प्राप्त करून देण्याकरिता मच्छिमारांची विहित नमुन्यातील UIDAI बाबतची माहिती UIDAI सर्व्हरवर अपलोड करण्यात आलेली आहे. ही माहिती अपडेशन करताना रजिस्टर नोंद घेवून