जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत “चला उद्योजक होऊया” ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 


अलिबाग, दि.11 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील व्यवसाय इच्छुक तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये विविध विषयातील तज्ञ मंडळींकडून व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.

बदलत्या काळानुरूप शेती या पारंपरिक व्यवसायाचे स्वरूपही बदलते आहे. या पारंपरिक उद्योगास नवीन शेतीपूरक जोड धंद्यांची साथ दिल्यास निश्चितच चांगली उत्पन्न निर्मिती करता येईल. यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्यामार्फत मंगळवार, दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता चला उद्योजक होऊया या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयांतर्गत कृषी क्षेत्रातील नव उद्योजक श्री.हेमंत कोंडीलकर हे सेंद्रिय खत निर्मितीतून स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र सगळ्यांसाठी खुले असून गुगल-मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी https://meet.google.com/nad-zpkc-ugg या लिंकचा वापर करावा.

तरी जिल्ह्यातील व्यवसायभिमुख तरुण, शेतकरी वर्ग, बचतगटातील महिला, कृषी क्षेत्राशी निगडीत सर्वांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता मु.पवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक