Posts

Showing posts from August 30, 2020

जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारणार* *-पालकमंत्री कु.आदिती तटकरे*

*पालकमंत्री कु.आदिती तटकरे "तेजस्विनी" पुरस्काराने सन्मानित*  अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका):- अँड्रॉइड मोबाईल येण्याआधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते. परंतु काळ जसा बदलत आहे त्याप्रमाणे  शैक्षणिक व्यवस्थाही बदलण्याची  गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.       श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त "तेजस्विनी पुरस्कार" व "सरस्वती भूषण पुरस्कार" वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत हाेत्या.        यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा परिषद सदस्य  प्रगती अदावडे, सरपंच परविन नाझ, पंचायत समिती सदस्य मंगेश काेमनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, तहसिलदार सचिन गोसावी, प्राचार्य श्रीनिवास जोशी, गटविकास अधिकारी श्री.सिनारे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सिध्दू कोसंबे, गणेश पाेवेकर,  दर्श

अन्न व नागरी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई पोलिसांची पनवेल येथे धडक कारवाई*

*सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक         अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका) :- जिल्हयातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली हाेती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी हाेणार आहे.         नवी मुंबई पोलिसा

*मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा*

                                                                        अलिबाग, जि.रायगड, दि.5 (जिमाका)- महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत "शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह" ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे.           या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई ची शासन मान्यता आहे. तसेच MSCIT या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे.          *प्रवेशासाठी नियम, अटी व सवलती :-* अभ्यासक्रमाचे नाव- सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफीस (संगणक कोर्स), शैक्षणिक पात्रता- किमान इयत्ता 8 वी पास.   मोटार अँण्ड आर्मचेअर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रिक कोर्स), शैक्षणिक पात्रता- किमान  इयत्ता 9 वी पास. एम.एस.सी.आय

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शुक्रवार, दि.04 सप्टेंबर, 2020 रोजी, दुपारी 3.00 वा., सुनिती शासकीय निवासस्थान येथून शासकीय वाहनाने खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. सायं.5.00 वा. खारघर येथे आगमन व युथ हॉस्टेलची पाहणी. स्थळ : ग्रीन फिंगर स्कूलच्या बाजूला, सेक्टर-12, खारघर, नवी मुंबई.   सायं.6.00 वा. खारघर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.             शनिवार, दि. 05 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 9.00 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन गोखले एज्युकेशन सोसायटी श्रीवर्धन, रायगड येथील 4 सेवानिवृत्त व्रतस्थ आणि तपस्वी शिक्षकांचा सरस्वती भूषण गौरव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :प्रि.टी.ए.कुलकर्णी सभागृह, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर्टस,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, श्रीवर्धन. द

बाल कल्याण क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांनी बालशक्ती व बालकल्याण या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत

  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :-   बालशक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nca.wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.15 सप्टेंबर 2020  पर्यंत आहे,  असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना बालशक्ती पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो. मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन वा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस बालकल्याण वैयक्तिक पुरस्कार दिला जातो. जी संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे व बाल कल्याण क्षेत्र

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे “कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजना” जाहीर हॉस्पिटल, पोलीस दल, नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना लागू

  अलिबाग,जि.रायगड, दि.3 (जिमाका) :-   प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था ही कोकणातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे 1998 पासून व राजेंद्र माने तंत्रनिकेतन सन 2010 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबव येथे कार्यरत आहे. करोना या संसर्ग विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हॉस्पिटल, पोलीस दल, नगरपालिका, महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचारी जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा, म्हणून संस्थेच्या अभियांत्रिकी पदवी, एमबीए व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये त्यांच्या पाल्यांसाठी “ कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजना ” ही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतिगृह शिक्षण योजना 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे.   ही योजना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील हॉस्पिटल, पोलीस, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आहे. या योजनेंतर्गत प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात आटोमोबाईल कम्प्युटर

करोना योद्धा, स्वयंसेवक, योगदानकर्ता म्हणून नाव नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी -जिल्हाधिकारी निधी चौधरी

  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :-   संपूर्ण जगात देश, राज्य आणि जिल्हा करोना विषाणूशी लढत आहे. या लढाईत दिवसेंदिवस करून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सध्याच्या परिस्थितीत या लढाईसाठी डॉक्टर्स, नर्सेस, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ॲनेस्थेस्टिस्ट, आरोग्य कर्मचारी, केटरर्स, पेंटर्स अशा विविध क्षेत्रातील सेवा देणाऱ्या योद्धयांची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील जास्तीत जास्त कुशल नागरिकांनी करोना विरुद्धच्या या लढाईत स्वतःचे नाव करोना योद्धा, स्वयंसेवक, योगदानकर्ता म्हणून नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या raigad.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवाहन केले आहे. 0000

घ्या उखाणा.. ! स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :-   ‘उखाणा घेणे’ हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी येणाऱ्या नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा आयोजित करण्यात आली आहे.   ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दि.10 सप्‍टेंबर, 2020 पर्यंत पाठवावा.   उखाणे निवडीचे निकष खालीलप्रमाणे असतील : उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा 'मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. आपण सर

स्वदेस फाउंडेशन चे ग्रामविकासाचे कार्य उल्लेखनीय..! -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :-   जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण ,पाणी व शाश्वत उपजीविका या क्षेत्रातील स्वदेस फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय असून याचा मोठा लाभ रायगड जिल्ह्याला झाला आहे, असे  प्रशंसनीय उद्गार जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी काल (दि.2 सप्टेंबर) काढले. जिल्हा प्रशासन व स्वदेस फाउंडेशन यांच्यादरम्यान वेबेक्स ॲप द्वारे ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे उपस्थित होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, स्वदेस फाउंडेशनने जास्तीत जास्त गावांमध्ये पाणी योजना राबवाव्यात, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी योजना बंद होत्या. परंतू   स्वदेस फाउंडेशनच्या सौर उर्जेवर आधारित असणाऱ्या योजना सुरळीत सुरू होत्या, त्यासाठी त्यांनी स्वदेसचे   आभार मानले व जिल्हा पर

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मी. पावसाची नोंद

         अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.16 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 3 हजार 139.38 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.                 आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-         अलिबाग-9.00   मि.मी., पेण-20.00 मि.मी., मुरुड-9.00 मि.मी., पनवेल-12.00 मि.मी., उरण-29.00 मि.मी., कर्जत-33.40 मि.मी., खालापूर-24.00 मि.मी., माणगांव-5.00 मि.मी., रोहा-12.00 मि.मी., सुधागड-22.00 मि.मी., तळा-9.00 मि.मी., महाड-13.00 मि.मी., पोलादपूर-9.00 मि.मी., म्हसळा-27.00मि.मी., श्रीवर्धन-18.00 मि.मी., माथेरान-55.20 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 306.60 मि.मी.इतके असून सरासरी 19.16 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण  पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 97.61 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सप्टेंबर महिन्यातील शिबीर कार्यक्रम जाहीर

         अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे आयोजित केली जाणारी शिबिरे, अनुज्ञप्ती व नवीन वाहन नोंदणी कामकाज पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि.रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सप्टेंबर,2020 या कालावधीचा शिबीर (कॅम्प) कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे-             सोमवार दि.7 व 21 सप्टेंबर, 2020 रोजी महाड, बुधवार दि.9 सप्टेंबर, 2020 रोजी श्रीवर्धन, शुक्रवार दि.11 व 25 सप्टेंबर, 2020 रोजी अलिबाग, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर, 2020 रोजी माणगाव, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर, 2020 रोजी मुरुड, शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर, 2020 रोहा 0000

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरु

         अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशाकरिता स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित होते तथापि करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सद्य:स्थितीत राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच ऑनलाइन परीक्षा घेण्याकरिता परिस्थिती अनुकूल नाही. यामुळे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा रद्द करून त्याऐवजी विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.            एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल इयत्ता सहावीच्या वर्गात नवीन प्रवेश व इयत्ता सातवी, इयत्ता नववी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या प्रथम सत्राच्या एकूण नऊशे गुणांची गुणपत्रिका mtpss.org.in या लिंकवर अपलोड करावयाची आहे. कोणत्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याकरिता विद्यार्थ्यांचे कोणते गुणपत्रक लिंकवर अपलोड करावयाचे आहे,

स्मार्ट कार्डसाठी जेष्ठ नागरिकांनी त्वरीत नजिकच्या बस आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा*

अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- दि.1 डिसेंबर 2020 पासून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकांनी त्वरित नजीकच्या आगारातील संबंधित आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून स्मार्ट कार्ड नोंदणी करावी,  असे आवाहन राज्य परिवहन, रायगड विभाग, पेणच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येतात. सध्या करोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात येत आहेत. करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना बस आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे या योजनेला दि.30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 00000

नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी च्या नागपूर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाड-अलिबाग आगाराकडून बस व्यवस्था*

           अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी ची परीक्षा रविवार, दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील महाड-अलिबाग आगाराकडून दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी प्रवासी मागणीनुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.            तरी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी च्या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी आगार व्यवस्थापक, महाड-अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन, रायगड विभाग, पेणच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे. 0000

*पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा*

          अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी  दि.1 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत तालुकास्तरीय सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या अधिनस्त असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 व श्रेणी-2 यांच्या स्तरावर 100%  अनुदानावर प्राप्त झालेल्या लसींचा आपल्या पशुधनासाठी पुरेपूर लाभ घ्यावा व आपल्या पशुधनाचे लाळ-खुरकत रोगापासून संरक्षण करावे, यासंदर्भात काही सूचना अथवा तक्रार असल्यास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद  डॉ.आर्ले यांनी केले आहे.            महाराष्ट्र शासनाकडून पशुधनामधील संसर्गजन्य लाळ-खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या रोगावरील लसीकरण कालबद्ध वेळेत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केंद्र पुरस्कृत असून राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 पासून राबविण्यात येणार आहे.          

स्वाधारगृह योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड दि.31 (जिमाका) :- शासनाने पिडीत महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वित करण्यात केली आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास क्षेत्रात   स्वाधारगृह योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व स्वयंसेवी संस्थांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.             स्वाधार योजनेकरिता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेस महिला व बालविकास क्षेत्रातील किमान 5 वर्षे कामाचा अनुभव असावा. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे. योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी. संस्था नीती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी.   नीती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा तसेच योजना राबविण्याचे निकष दि.23 मार्च 2018 मधील शासन निर्णयानुसार असावेत.             प्रत्येक स्वाधा