बाल कल्याण क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांनी बालशक्ती व बालकल्याण या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत

 

अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :- बालशक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nca.wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.15 सप्टेंबर 2020  पर्यंत आहे,  असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.

ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना बालशक्ती पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो.

मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन वा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस बालकल्याण वैयक्तिक पुरस्कार दिला जातो.

जी संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे व बाल कल्याण क्षेत्रात किमान दहा वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी आहे, अशा अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला संस्थास्तरावरील पुरस्कार दिला जातो.

तरी बाल कल्याण क्षेत्रात काम करीत असलेल्या पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक