Posts

Showing posts from February 4, 2024

जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळावा पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा

  रायगड(जिमाका) दि.10:-   जिल्हा परिषद रायगड पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद रायगड येथे दि. 13 फेब्रुवारी 2024  रोजी केंद्र पुरस्कृत अस्कॅड  (ASCAD)  योजनेंतर्गत माहिती प्रशिक्षण व संपर्क घटक योजनेंतर्गत जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास जास्तीत जास्त पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे, आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले  आहे. या मेळाव्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, प्रादेशिक सहआयुक्त (पशुसंवर्धन) मुंबई विभाग, मुंबई डॉ.प्रशांत कांबळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे  उपस्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करणार आहेत.  या मेळाव्यामध्ये पशुधनातील विविध रोग प्रादूर्भाव व त्यांचे  नियंत्रण, पशुधनातील लसीकरणाचे महत्त्व, भारत पशुधन प्रणालीद्वारे पशुधनाची नोंदणी तसेच प्राण्यांपासून माणसांना व माणसांपासून प्राण्यांना होणाऱ्या रोगांबाबत (  ZONOTIC DISEASES )प्रामुख्याने  बर्ड फ्लू ,  ग्लॅन्डर्स ,  रेबीस इत्यादी बाबत जनजागृती तसेच पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या विष

एच.आय.व्ही. एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेतून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली अलिबागमध्ये जनजागृती

  रायगड(जिमाका)दि.10:-   जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,रायगड अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.अंबादास देवमाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अलिबाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या ठिकाणी  एचआयव्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेचा माध्यमातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. स्थलांतरित कामगार व स्थानिक युवकांना, नागरीकांना लैंगिक आजाराबाबतचे सविस्तर मार्गदर्शन तसेच एचआयव्हीची लागण महत्त्वाचा चार कारणांमुळे होते जसे एचआयव्ही व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने, एच आय व्ही व्यक्तीची सुई व सिरिंज चा वापर केल्याने, एचआयव्ही गर्भवती मातेपासून होणाऱ्या बाळाला लागण होते. तसेच रक्त पेढीतुन एच आय व्ही मुक्त रक्त न घेतल्या मुळे एचआयव्ही ची लागण होऊ शकते. म्हणून प्रत्येक नागरिकांनी शासकीय दवाखान्यातील समुपदेशन व तपासणी केंद्रातून एचआयव्हीची तपासणी करणे आवश्यक आहे, असे कलाकारांनी आपल्या पथनाट्यातून सांगितले. त्याचबरोबर लैंगिक आजरा विषयी काही शंका असल्यास शासकीय टोल फ

13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

  रायगड(जिमाका)दि.10:-  राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील 5 लाख 44 हजार 396 मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम मंगळवार, दि.13फेब्रुवारी 2024 रोजी राबविण्यात येणार असून या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे यांनी केले आहे.  त्याकरिता 6 लाख अल्बेडॅझोल गोळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. 3 हजार 518 शाळा, 3 हजार 322 अंगणवाड्यांमधून अल्बेडॅझोल गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील एकूण 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभाग नोंदविणार आहेत. तसेच शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे. जंत दोषामुळे बालकांमध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्य

रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आयोजन महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-- जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे

Image
  रायगड(जिमाका)दि.9:-  सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे दि.12 फेब्रुवारी ते दि.16 फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी 4 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत पोलीस परेड मैदान अलिबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे. आगरी, कोळी संस्कृतीसह विविध लोककला याबरोबरच विशेष निमंत्रितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि.12 फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मर्दानी खेळ, पोवाडे यांचा समावेश आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा कोळी स

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री रायगड जिल्ह्यातील 4 उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान

Image
    रायगड(जिमाका)दि.8:-  उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मे.नाईक ओशियनिक एक्सपोर्टस् प्रा.लि., एम,5,एमआयडीसी,तळोजा,मे. एच के एस एमपेक्स,प्लॉट नं3, पनवेल इंडस्ट्रीयल को-ऑप इस्टेट लि., नवी मुंबई फायनरी, मे.गंधार ऑईल  फायनरी (इंडिया), टी-10, एम.आय.डी.सी. तळोजा ता. पनवेल,  मे. कपुर ग्लास इंडिया प्रा. लि. , 200/201/212 ,  जवाहर को-ऑप इंडस्ट्रीयल

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर-2023 निकाल जाहीर उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करावेत

    रायगड(जिमाका)दि.8:-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर-2023 परीक्षेचे आयोजन दि. 13 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दि. 07 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 02.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर ( www.mscepune.in ) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल व उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी दि.22 फेब्रुवारी 2024 अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अनुराधा ओक यांनी केले आहे. 0000000

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे कोकण विभागासाठी वरदान

       रायगड(जिमाका)दि.8:-  राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या नैसर्गिक अडचणीमुळे सिंचनाअभावी पिक उत्पादनातील घट टाळण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेचा विस्तार करून या योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. कोकण विभागासाठी एकूण 855 लक्षांक असून यामध्ये ठाणे -125, पालघर-120, रायगड-210, रत्नागिरी-210, सिंधुदुर्ग-190 शेततळयांचा समावेश आहे. लाभार्थीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे :-  अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.20 हेक्टर जमीन आवश्यक आहे, क्षेत्रधारणेस कमाल मर्यादा नाही, अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील, अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी निवड  :- महाडीबीटी पोर्टलवर ( mahadbtmahait.gov ) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अर्जाद्वारे लाभार्थी निवड होते. शेततळ्या

जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची --पालकमंत्री उदय सामंत

Image
रायगड(जिमाका)दि.7:-  खेळ हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे .  खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते. खिलाडू वृत्ती जोपसल्यास कुठल्याही संकटाचा सामना करता येतो, जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची असल्याचे  प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.   डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवाच्या समारोप व  बक्षीस वितरण कार्यक्रम  प्रसंगी  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार भरत गोगावले, कुलगुरु प्रा.डॉ.कारभारी काळे, कुलसचिव अरविंद किवळेकर, छत्रपती पुरस्कार प्राप्त सुप्रिया गाढवे, क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड, डॉ.अतुल लोंढे,आदि उपस्थित होते.  या रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य आणि नैपुण्य प्राप्त सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करुन पालकमंत्री  सामंत म्हणाले की,  आपले शरीर ही आपली संपत्ती आहे. क्रीडा महोत्सव हे केवळ बक्षिस मिळविण्यासाठी नसून या माध्यमातून आपले शरीर आणि मन बळकट होत असते. प्रत्येकाने आपले आरोग्य टिकविण्यासाठी खेळाचा आपल्या जीवनात समावेश करणे आवश्यक आहे.  खे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विकास कामासाठी पुरेसा निधी देणार-- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Image
    रायगड(जिमाका)दि.6:-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत विकासासाठी आवश्यक असे प्रस्ताव तयार करावेत. या सर्व प्रस्तावाना शासनस्तरावरून मंजुरी देण्यात येईल. तसेच विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव-2023 च्या समारोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी विश्वनाथ काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांच्यासह क्रीडा विभागातील सर्व सह समन्वयक आणि  विविध समित्यांचे समन्वयक  उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तंत्रशास्त्र विद्यापीठाचे महत्व खूप मोठे आहे.  पुढीलवर्षी विद्यापीठांतर्गत किमान 3 हजार विद्यार्थी जगातल्या वेगवेगळया देशात पाठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्या

उच्च न्यायलय, मुंबई येथे पेंशन लोक अदालतीचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.5 :-मा.सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील दि. 03 फेब्रुवारी 2024 रोजीच्या ई-मेल नुसार दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पासून उच्च न्यायलय, मुंबई येथे पेंशन लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या अदालतीमध्ये पेन्शनसंदर्भात प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येतील, अशी माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. ०००००००

रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव-2023 चा दुसरा दिवस अत्यंत उत्साहात संपन्न

    रायगड(जिमाका)दि.5 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे (दि.4 फेब्रुवारी) रोजी रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव-2023 दिवस दुसरा उत्साह पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात व अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यामध्ये कबड्डी खो-खो फुटबॉल व बुद्धिबळ या खेळांचा समावेश असून आज झालेल्या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत बुद्धिबळाचे तीन फेऱ्या पूर्ण असून सर्व स्पर्धक आपापल्या परीने उत्कृष्टपणे खेळ खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत.  तसेच खो-खोच्या स्पर्धेमध्ये काल आणि आजच्या सत्रामध्ये एकत्रित रित्या 36 सामने झाले आहेत.  आत्तापर्यंत मुंबई, पुणे ,कोल्हापूर, नांदेड व नागपूर येथील विद्यापीठांच्या संघांनी आपले वर्चस्व राखले आहे. या सर्व सामन्यांमध्ये मुले व मुली यांचे सामने अतितटीचे होताना दिसून येत आहेत.  तसेच खेळाडूंना प्रेक्षकांचा व परिसरातील नागरिक व विद्यार्थी हे उत्स्फूर्त पाठिंबा देऊन खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कबड्डीच्या मुले आणि मुलींचे 30 सामने झाले असून हे सामने कबड्डी मॅटवर खेळविण्यात येत असून दिवस रात्र चालणाऱ्या या रोमहर्षक सामन्यांचा प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद

दि.03 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा

           रायगड(जिमाका)दि.5 :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग  ए.एस.राजंदेकर व  न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. दि.03 मार्च 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरण

पनवेल तालुक्यातील अनाधिकृत शाळा घोषित

           रायगड(जिमाका)दि.5 :- पनवेल तालुक्यामध्ये शासनाची मान्यता न घेता काही सस्थांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केल्या आहेत, या शाळांमध्ये कोणीही आपल्या मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पनवेल एस.आर.मोहिते यांनी केले आहे.   वास्तविक पाहता शाळा सुरु करण्यापूर्वी संस्थांनी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र सोबत दिलेल्या यादीतील शाळांनी शासनाची मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत आहेत. तसेच या सर्व शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.    अनधिकृत शाळा प्राथमिक :-  मुंबई विभाग-   मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल, ओवे,नॉलेज अॅन्ड सिफटेल ओवे. केळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल, त पाचनंद, पिस एज्युकेशन टेस्ट कुर्ला, ठाणे.  अर्कम इंग्लिश स्कूल, तळोजा,अलहमद  चॅरीटेबल ट्रस्ट.  ओसीन ब्राईट कॉन्व्हेट हाय तळोजा,   एज्युकेअर अॅन्ड वेल्फेअर सोसायटी तळोजा.  ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली,   ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली.  सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे,   डिस्पेस ऑफ बिलीव्हर