डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर-2023 निकाल जाहीर उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करावेत

 

 

रायगड(जिमाका)दि.8:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर-2023 परीक्षेचे आयोजन दि. 13 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दि. 07 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 02.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in) जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल व उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी दि.22 फेब्रुवारी 2024 अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड