Posts

Showing posts from January 30, 2022

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत - सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

    अलिबाग, दि.03,(जिमाका):- सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. महाडीबीटी हे या संकेतस्थळाचे नाव असून http:/mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ हे संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांच्यामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सन 2021-22 साठी शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी व सन 2020-21 करिता नूतनीकरण करण्यासाठी हे संकेतस्थळ पुनःश्च चालू करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज तात्काळ नोंदणीकृत करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. या डीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांना देय होणारा शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता, शिक्षण फी, परीक्षा फी, इतर अनुज्ञेय फी, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर थेट वितरीत केला जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावे. महाडीबीटी ची वैशिष्ट्ये:- ·     

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

      अलिबाग, दि.03, (जिमाका):- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वछता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी दरवर्षी विविध पुरस्कार स्पर्धा घेतली जाते. सन-2021 च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2022 असून जिल्ह्यातील पत्रकारांनी या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी दि.01 जानेवारी ते दि.31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील स्पर्धेकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in येथेही उपलब्ध आहेत. 000000

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग,दि.02(जिमाका) :-   राज्यमंत्री उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा गुरुवार, दि. 0 3 फेब्रुवारी 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे- गुरुवार, दि. 0 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने दमखाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. दमखाडी रोहा येथे आगमन व श्री गणपती मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा. दुपारी 12.00 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने वरसगावकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. वरसगाव येथे आगमन व नवज्योत मित्र मंडळास माघी गणेशोत्सवानिमित्त भेट. दुपारी 1.30 वा. वरसगाव येथून शासकीय वाहनाने मुगवली, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. मुगवली येथे आगमन व श्री स्वयंभू गणपती मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सव समारंभास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. मुगवली, ता.माणगाव येथून शासकीय वाहनाने गणेशनगर, ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. गणेशनगर येथे आगमन व श्री गणेश मंदिर जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा समारंभास उपस्थिती. सायं. 4.30 वा. गणेश

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात जारी केले निर्बंध शिथिलतेचे आदेश दैनंदिन जनजीवन होणार पुन्हा गतिमान.. मात्र नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन

          अलिबाग, दि.02, (जिमाका):- शासन महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभागाकडील आदेशान्वये ज्या जिल्ह्यांमध्ये दि.30 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोससह 90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण तसेच दोन्ही डोसचे 70 टक्के लसीकरण झाले आहे, अशा जिल्ह्यांच्या यादीत रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे. शासनाने मुंबई, रायगड, पुणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिलतेचे निर्देश दि.01 फेब्रुवारी 2022 पासून रात्री 12.00 वाजल्यापासून लागू केले आहेत.               त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशानुसार रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दि.01 फेब्रुवारी 2022 पासून रात्री 12.00 वाजल्यापासून पुढीलप्रमाणे निर्बंध शिथिलतेचे आदेश शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत लागू केले आहेत.             जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाईन तिकिटासह खुली राहतील. भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांचे लसी