Posts

Showing posts from July 18, 2021

कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील हरविलेली व्यक्ती दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका):- कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील प्रमोद जगन जोशी, वय-26 वर्ष, हा दि.18 जुलै 2021 रोजी सायंकाळी 19.45 वाजण्याच्या सुमारास कळंब नदीच्या गणपती घाटावर त्याच्या तीन मित्रांसह नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पोहण्याकरिता गेला असता तो या प्रवाहात वाहून गेला व अद्याप बेपत्ता आहे, अशी तक्रार त्यांच्यासेाबत असणारा त्याचा मित्र तुषार मंगल विरले, वय वर्षे 27, धंदा-शिक्षण, रा.देवपाडा, ता.कर्जत याने दि.19 जुलै 2021 रोजी   दुपारी 1.35 वा. नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.        बेपत्ता असलेले प्रमोद जगन जोशी यांचे वर्णन पुढीलप्रमाणे– प्रमोद जगन जोशी, वय 26 वर्ष, रंग सावळा, नाक सरळ, केश कुरुळे, उभट, अंगावर नेसूस सफेद रंगाचा टि शर्ट, काळ्या रंगाची फूल ट्रॅक पँट घातलेले होते.      या व्यक्तीचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तरी ही बेपत्ता व्यक्ती कोणालाही दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ नेरळ पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02148-238444 किंवा सहायक फौजदार,श्री. के.एन.सांगळे, मोबाईल क्रमांक 9822208037 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार, नेरळ पोलीस ठाणे, श्री.के

पनवेल तालुक्यातील शिरढोण, सांगुर्ली तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय, कर्नाळा इमारतीच्या बांधकामासाठी मौजे शिरढोण येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) :- पनवेल तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ व आदिवासी बहुल भागात मंडळ अधिकारी व तलाठी सजे यांना स्वत:चे कार्यालय उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे पनवेल तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय, कर्नाळा व तलाठी कार्यालय शिरढोण, सांगुर्ली   या संबंधित तलाठी/मंडळ अधिकारी, तलाठी सजा कार्यालयाच्या इमारतींच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी केली होती.                शासकीय कार्यालयांची स्वत:ची इमारती असावी, जेणेकरुन जनतेला योग्य सोयी-सुविधा गतीने पुरविता येतील, या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले.              त्यानुषंगाने मौजे शिरढोण, ता.पनवेल येथील स.नं.39 क्षेत्र 2-39-00 हेक्टर आर पैकी क्षेत्र 0-07-10 हेक्टर आर ही शासकीय   जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मंडळ अधिकारी कार्यालय, कर्नाळा व तलाठी कार्यालय शिरढोण, सांगुर्ली   करिता   हस्तांतरित करण्याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.         

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

  अलिबाग,जि.रायगड दि.20 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -23.20 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-6.60 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.95 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-19.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-45.50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.20 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 130 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 130.13 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2000.43 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 96.00 मि.मी., पेण- 187.00 मि.मी., मुरुड- 37.00 मि.मी., पनवेल- 182.20 मि.मी., उरण-77.00 मि.मी., कर्जत- 189.20 मि.मी., खालापूर- 183.00 मि.मी., माणगाव- 99.00 मि.मी., रोहा- 153.00 मि.मी., सुधागड-220.00 मि.मी., तळा- 87.00 मि.मी., महाड- 94.00 मि.मी., पोलादपूर- 68.00 मि.मी, म्हसळा- 53.00 मि.मी., श्रीवर्धन- 101.00 मि.मी., माथेरान- 255.70 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 82.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 130.13 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 63.65 टक्के इतकी आहे. 00000

इतर मागासवर्गीय उद्योजकांना सुवर्णसंधी..... उद्योजकांकरीता शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाच्या विविध कर्ज योजना

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे.                समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1 लाख ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज नाही)   व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज योजना परतावा योजना ( रु.10 लक्ष पर्यंत) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत)   या योजनांचा समावेश आहे.                 सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरिताही या विविध कर्ज योजनांचे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्टय प्राप्त झाले आहे.             थेट कर्ज योजना (भौतिक उद्दिष्ट 120)   व 20 टक्के बीज भांडवल योजना- (भौतिक उद्दिष्ट 59) या योजनांचे अर्ज शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय महामंडळाच्या रायगड ज

खावटी अनुदान योजना आदिवासींसाठी लाभदायक -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- करोना महामारीमुळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारांपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून या आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान वाटप योजना विशेष योजना म्हणून मंजूर केली असून ही योजना आदिवासींसाठी लाभदायक असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. काल दि. दि.18 जुलै रोजी रोहा तालुक्यातील कोलाड येथील ग.द.तटकरे हायसकूल सभागृह येथे झालेल्या खावटी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.   कोलाड येथे पालकमंत्री कु.आदिती   तटकरे यांच्या हस्ते   पात्र लाभार्थ्यांना खावटी अन्नधान्य कीट वाटप देवून   कार्यक्रम संपन्न झाला.     यावेळी जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार, पंचायत समिती रोहा उपसभापती रामचंद्र सकपाळ, कोलाडच्या सरपंच श्रीमती.बागवेकर, उपसरपंच श्री.उत्तम बाईत, आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सुरेश महाबळे,   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.खेडकर, तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी आ

शासनाच्या खावटी अनुदान योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- राज्य शासनाच्या वतीने गरीब समाज असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी सुरु करण्यात आलेल्या खावटी वाटप योजनेची सुरुवात रायगड जिल्ह्यातून करण्यात आली असून या योजनेतील एकही लाभार्थी वंचित राहू नये, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.   नुकतेच कर्जत तालुक्यातील पिंगळस शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे झालेल्या खावटी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कर्जत येथे पालकमंत्री कु.आदिती  तटकरे यांच्या हस्ते  पात्र लाभार्थ्यांना खावटी अन्नधान्य कीट वाटप देवून  कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, सदस्या सौ.रेखा भास्कर दिसले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.खेडकर, तहसिलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी बालाजी पुरी तसेच आश्रमशाळेचे शिक्षक वर्ग आदि उपस्थिती होते.  यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील 48 हजारहून अधिक लाभार्थ्यांना आदिवासी विभागांतर्गत खावटी अनुदान योजनेतून अन्नधान्य, किर

सुधागड तालुक्यातील तलाठी,मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका) :- सुधागड तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ व आदिवासी बहुल भागात मंडळ अधिकारी व तलाठी सजे यांना स्वत:चे कार्यालय उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे सुधागड तालुक्यातील नांदगांव, नवघर, परळी, हेदवली, वाघोशी, सिध्देश्वर बु., चिवे, माणगाव बु.   या गावांच्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तलाठी/मंडळ अधिकारी, तलाठी सजा कार्यालयाच्या इमारतींच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी केली होती.                शासकीय कार्यालयांची स्वत:ची इमारती असावी, जेणेकरुन जनतेला योग्य सोयी-सुविधा गतीने पुरविता येतील, या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले.             त्यानुषंगाने नांदगांव, नवघर, हेदवली, सिध्देश्वर बु. या गावांमध्ये प्रत्येकी 0.05.0 हेक्टर आर जमीन तर परळी, वाघोशी, चिवे या गावांमध्ये प्रत्येकी 0.02.0 हेक्टर आर जमीन आणि अशाच प्रकारे माणगाव बु. या गावामध्ये 525 चौरस फूट जमीन हस्तांतरित करण्याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्य हस्ते खावटी योजना कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- राज्य शासनाच्या वतीने गरीब समाज असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी खावटी वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना खावटी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ (दि.17 जुलै) रोजी तहसिल कार्यालय, खालापूर येथे पालकमंत्री कु.आदिती   तटकरे यांच्या हस्ते   पात्र लाभार्थ्यांना खावटी अन्नधान्य कीट वाटप देवून संपन्न झाला.                यावेळी आदिवासी विकास विभाग ठाणे अपर आयुक्त श्री.गिरीश सरोदे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.खेडकर, तहसिलदार इरेश चप्पलवार, खालापूरचे पोलीस उपअधीक्षक श्री. संजय शुक्ला तसेच खालापूर खावटी वाटप समिती प्रमुख श्री.रमेश चव्हाण, श्री. एस. डी.पाटील आदि उपस्थितीत होते.               यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 असून रुपये 2 हजार   लाभ मिळालेल्या लाभार्थीची संख्या 39   हजार 931 आहे तर जिल्ह्यासाठी एकूण 40 हजार 323 किट प्राप्त झाले आहेत. खावटी योजना आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना असून या योजनेचा अधि

पनवेल व कर्जत येथे मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न

  अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये (दि.15 जुलै) जागतिक युवा कौशल्य दिन साजरा संपन्न झाला.             यामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रायगड-अलिबाग श्री. मोहसीन वस्ता यांच्या हस्ते इंडक्शन किट वाटप करण्यात आले.                तसेच कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्येही जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला असून प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. शा. गि. पवार यांच्या हस्ते इंडक्शन किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका श्रीमती स्वाती खाडे व स्मिता स्वामी उपस्थित होत्या.               हे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त श्री. शा. गि. पवार यांनी सांगितले की, भविष्यात कोविड-19 ची तिसरी लाट निर्माण झाल्यास हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाची गरज लागणार आहे. तसेच प्रशिक्षण घेत असत

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -23.50 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-8.20 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-5.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-20.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-45.50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.80 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 186 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 186.51 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1683.79 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 123.00 मि.मी., पेण- 180.00 मि.मी., मुरुड- 270.00 मि.मी., पनवेल- 284.20 मि.मी., उरण-151.00 मि.मी., कर्जत- 194.60 मि.मी., खालापूर- 195.00 मि.मी., माणगाव- 207.00 मि.मी., रोहा- 202.00 मि.मी., सुधागड-166.00 मि.मी., तळा- 210.00 मि.मी., महाड- 89.00 मि.मी., पोलादपूर- 122.00 मि.मी, म्हसळा- 159.00 मि.मी., श्रीवर्धन- 163.00 मि.मी., माथेरान- 268.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 984.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 186.51 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 59.51 टक्के इतकी आहे. 00000