कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील हरविलेली व्यक्ती दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका):- कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील प्रमोद जगन जोशी, वय-26 वर्ष, हा दि.18 जुलै 2021 रोजी सायंकाळी 19.45 वाजण्याच्या सुमारास कळंब नदीच्या गणपती घाटावर त्याच्या तीन मित्रांसह नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पोहण्याकरिता गेला असता तो या प्रवाहात वाहून गेला व अद्याप बेपत्ता आहे, अशी तक्रार त्यांच्यासेाबत असणारा त्याचा मित्र तुषार मंगल विरले, वय वर्षे 27, धंदा-शिक्षण, रा.देवपाडा, ता.कर्जत याने दि.19 जुलै 2021 रोजी  दुपारी 1.35 वा. नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.

       बेपत्ता असलेले प्रमोद जगन जोशी यांचे वर्णन पुढीलप्रमाणे– प्रमोद जगन जोशी, वय 26 वर्ष, रंग सावळा, नाक सरळ, केश कुरुळे, उभट, अंगावर नेसूस सफेद रंगाचा टि शर्ट, काळ्या रंगाची फूल ट्रॅक पँट घातलेले होते.

     या व्यक्तीचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तरी ही बेपत्ता व्यक्ती कोणालाही दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ नेरळ पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02148-238444 किंवा सहायक फौजदार,श्री. के.एन.सांगळे, मोबाईल क्रमांक 9822208037 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार, नेरळ पोलीस ठाणे, श्री.के. एन.सांगळे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक