Posts

Showing posts from April 2, 2017

देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत. --- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Image
दिनांक :-08/04/2017                                                                                                        वृत्त क्र.188 देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत.                            --- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अलिबाग दि. 8 :- (जिमाका)     बँक असो की पतसंस्था या औद्योगिक व व्यापारी क्षेत्रासाठी काम करत असतात. देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन , वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. अलिबाग येथील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महौत्सवी वर्ष  सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हाणून ते बोलत होते.             अलिबाग येथील जयमाला गार्डन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, जे.एन.पी.टी.चे विश्वस्त महेश बादली, संस्थेचे संस्थापक गिरीष तुळपुळे, पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली ओक, रघुजीराजे आंग्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर जैन, ॲड.महेश मोहिते, कमळ नागरी पंतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी, तसेच ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.