Posts

Showing posts from June 3, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 69 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 69.51 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 187.67   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 183.00 मि.मि., पेण-15.03 मि.मि., मुरुड-258.00 मि.मि., पनवेल-32.04 मि.मि., उरण-180.00 मि.मि., कर्जत-7.02 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-48.00 मि.मि., रोहा-20.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-86.00 मि.मि., महाड-35.00 मि.मि., पोलादपूर-18.00, म्हसळा-106.04मि.मि., श्रीवर्धन-100.00 मि.मि., माथेरान-9.05 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1112.18 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 69.51 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   5.97 % इतकी आहे. 00 00

अलिबाग येथे निवृत्ती वेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन

                                                                                                                                   अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- अवर सचिव, वित्त विभाग,मंत्रालय मुंबई यांचेकडील सुचनेनुसार मंगळवार दि.12 जून   रोजी सकाळी 11.00 वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान,अलिबाग येथे निवृत्तीवेतन धारकांसाठी   मेळाव्याचे   आयोजन करण्यात आले आहे.             तरी रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर रहावे, असे आवाहन फिरोज मुल्ला, जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.06-   किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला .    अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.                सुरुवातीला छ.संभाजी राजे व युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे विधीवत पुजन करुन मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळयावर सुवर्ण मुद्रांचा    अभिषेक करण्यात आला.    तसेच आर्मी जवानांकडून बँण्ड पथकाद्वारे ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली.              याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यसाय मंत्री महादेव जानकर, फिजीचे राजदूत रोंढीर कुमार, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद छत्रे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, युवराज शहाजीराजे, पानीपतहून आलेले मराठा बांधव आदि उपस्थित होते.                 शिवभक्तांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे यांनी सांगितले की, किल्ले रायगडची व्याप्ती व शिवरायांच्या रुजलेल्या विचारांमुळेच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्य तसेच देशभरातील लाखो शिवभक्त शिवरायांना अभिवादन करण्यास

सुधारीत वृत्त:मान्सून पर्यटक मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनां ट्रेकींगसाठी नाव नोंदणी बंधनकारक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 - मान्सूल पर्यटकांच्या कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटक येत असतात.   या ठिकाणी अपघात होऊन पर्यटकांच्या मृत्यू होण्याच्या घटना मागील वर्षी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मान्सून 2018 मधील येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे मृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली . आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून बचाव साहित्य व सूचना फलक लावण्यात यावेत. होमगार्ड, संयुक्त वन व्यवस्थापन समिती,जीवरक्षक नेमण्यात यावेत. अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच वन विभागाकडून प्रबळगड,पेठकिल्ला,इशाळगड या गड,किल्ल्यांवर जाण्यासाठी पर्यटकांची नोदणी करण्याच्या सूचना देखील दिल्या. या गडांवर जाण्याकरीता स्थानिक युवकांना गाईड म्हणून प्रशिक्षित करुन त्यांच्यासोबत ट्रेकिंगसाठी जाण्यासाठी नाव नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे.             यामध्ये पर्यटकांनी निसर्गाचा आनंद   मनसोक्त घ्यावा. मद्यपान करुन   धबधब्याच्या ठिकाणी जावून स्वताचा जीव धोक्यात घालू   नये.

खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी केली खारभूमी योजनांची पाहणी

Image
अलिबाग, दि. ०३   : राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी आज रायगड जिल्ह्यातील विविध खारभूमी योजनांना भेटी देऊन या योजनांची मान्सूनपूर्व पाहणी केली. या दौऱ्यात मंत्री श्री. रावते यांनी पोफेरी, माणकुले, हाशिवरे व नवीन मिळकत या खारभूमी योजनांची मान्सूनपूर्व पाहणी केली. मंत्री श्री. रावते यांनी आपल्या या दौऱ्यात पोफेरी (ता. अलिबाग) या खारभूमी योजनेच्या बांधाची तसेच उघाडीची पाहणी केली. या योजनेच्या पावसाळ्यापुर्वी करावयाच्या दुरुस्ती कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अलिबाग तालुक्यातील माणकुले, हाशिवरे येथील बांधाची पाहणी केली. खाडीमधून समुद्राचे खारे पाणी घुसून योजनेच्या लाभक्षेत्राच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी चर्चा करुन या योजनेविषयी करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली.    तसेच नवीन मिळकत खारभूमी योजनेच्या उघाडीची पाहणी करुन दुरुस्ती कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.   माणकुले, हाशिवरे या खारभूमी योजनेसाठी ९ कोटी ६८ लाख रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, असे मंत्री श्र