अलिबाग येथे निवृत्ती वेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:-अवर
सचिव, वित्त विभाग,मंत्रालय मुंबई यांचेकडील सुचनेनुसार मंगळवार दि.12 जून रोजी सकाळी 11.00 वाजता जंजिरा सभागृह, पोलीस
परेड मैदान,अलिबाग येथे निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन
घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर रहावे, असे आवाहन फिरोज मुल्ला,
जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment