Posts

Showing posts from December 8, 2019

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण 25 पर्यंत अर्ज मागितले

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) -   मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 110 वे सत्र दि.01 जानेवारी 2020 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे होणार आहे.   त्यासाठी मच्छिमार युवकांकडून 25 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.   या प्रशिक्षणचा कालावधी 01 जानेवारी ते 30 जून 2020 (6 महिने).   त्यासाठी   आवश्यक पात्रता याप्रमाणे : उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष.   (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडावी), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडावी). क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.   (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी),   उमेदवारास पोहता येणे   आवश्यक.     प्रशिक्षण शुल्क : प्रतिमाह 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र.   दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा)   रोजगार   स्वयंर

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) -महिला व बालकल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद या विभागाची माझी कन्या भाग्यश्री या योजनेमधील   जिल्ह्यातील एकूण 110 लाभार्थ्यांना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सभापती श्रीम.उमा मुंडे, सदस्य चित्राताई पाटील, प्रियदर्शनी पाटील, मानसी दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बा.क.नितिन मंडलिक या मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.               या कार्यक्रमाचे नियोजन महिला व बाल कल्याण विभागाच्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीम.रंजिता थळे,प्रकल्प विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीम.अपर्णा शिंदे यांनी केले.   कार्यक्रमाचे सूत्र संचलन बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे यांनी केले. 000000

जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) -जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकरिता राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या (जिल्हा वार्षिक योजना, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम,आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,डोंगरी विभाग विकास कार्यक्रम,मानव विकास कार्यक्रम व इतर कार्यक्रम) प्रशासकीय मान्यता, निधी वितरण,कामांचे सनियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच सर्व दस्ताऐवज संगणकीकृत करुन कागदरहीत कामकाज करण्यासाठी iPAS ( Integreated Planning Office Automation System) ही वेब वेस्ड संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.  नियोजन विभागाच्या दि.18/09/2019 च्या शासन निर्णयान्वये iPAS प्रणाली राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचे काम  ई.एस.डी.एस.सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा.लि.नाशिक या कंपनीमार्फत करण्यात येणार असून सदर प्रणालीचे रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणांकरिता प्रशिक्षण मंगळवार दि.17 डिसेंबर व बुधवार दि.18 डिसेंबर 2019 रोजी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे.              या प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी सकाळी 10.30

मुंब्रा ठाणे येथे दि. 13 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये सैन्यभरतीचे आयोजन

                अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) - मुंब्रा ठाणे येथे दिनांक 13  ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान  सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पुर्णत: पारदर्शक असून, यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची देवाण घेवाण होत नाही. दलाल किवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करु शकत नाही. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जर कुणी ही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरती करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तुची मागणी करत असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस स्टोश्न मध्ये तक्रार करावी. आधिक माहीतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,  रायगड अलिबाग दुरध्वनी क्रमांक 02141-222208 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग डॉ. पद्मश्री एस बैनाडे यांनी केले आहे. 

बीच गेम्स खेळांच्या स्पर्धाचे आयोजन

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) - जिल्हा क्रीडा अधिकारी,रायगड कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात दि.12 ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.  त्याअंतर्गत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.  त्यामध्ये बीच गेम्सचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विविध बीच गेम्स खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे.  शनिवार दि.14 डिसेंबर रोजी मुरुड बीच येथे बीच लगोरी,बीच रिंग टेनिस, बीच वुडबॉल.   रविवार दि.15 डिसेंबर रोजी उरण बीच येथे बीच कबड्डी,बीच व्हॉलीबॉल.  अलिबाग बीच येथे बीच व्हॉलीबॉल.  मुरुड बीच येथे बीच व्हॉलीबॉल.   सोमवार दि.16 डिसेंबर रोजी वरसोली बीच अलिबाग येथे बीच थ्रोबॉल.  मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी वरसोली बीच अलिबाग येथे बीच थ्रोबॉल.  मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी दिवेआगर बीच श्रीवर्धन येथे बीच कबड्डी,बीच वुडबॉल.   या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या संघानी क्रीडा अधिकारी सचिन निकम (8856093608) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाक्रीडा अधिकारी श्रीम.अंकिता मयेकर यांनी केले आहे. 00000

युथ हॉस्टेल राष्ट्रीय गोवा सायकल मोहिमेचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सायकलींग करुन केला शुभारंभ

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) - युथ हॉ स्टेल असोसिएशन ऑ फ इंडिया नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय गो वा सायकलींग मो हिमेचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी डॉ .विजय सूयर्वंशी यांनी शुक्रवारी सकाळी वरसोली येथील कवळे कॉ टेज मधून स्वतः सायकलींग करुन केला. देशातील जम्मू-काश्मिर, मेघालय, अरुणाचलप्रदेश, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक,हरियाणा, झारखंड, आदि एकूण 12 राज्यातील 40 सायकलीस्ट या मो हिमेत सहभागी झाले आहेत. या मध्ये 4 महिला सायकलीस्टचा देखील समावेश आहे. को कणच्या सागरी किनारपट्टीतून गो व्याला जाणाऱ्या या नऊ दिवसांच्या या मोहिमेचे नेतृत्व गुजराथ राज्यातील पहिली महिला विक्रमविर कन्या वृषाली पुरोहीत ही करीत असून कार्यक्रम अधिकारी एस.शैलेश हे आहेत. युथ हॉ स्टेल चळवळ ही देशातील युवकांना जो डणारी चळवळ असून, अलिबाग मध्ये युथ हॉ स्टेलच्या उभारणी करीता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असा विश्वास डॉ.सूर्यवंशी यांनी बो लताना व्यक्त केला. रायगड जिल्ह्यास असलेल्

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन

अलिबाग दि.11, रायगड जिल्ह्यामध्ये   गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी वैश्विक आरोग्य संरक्षक दिवसाचे औचित्य   साधून महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल कामोठे व महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल फॉर वुमन्स अँड चिल्ड्रन्स यांच्या विद्यमाने जिल्ह्यात ग्रांमपंचायत कार्यालय, वलप, ता.पनवेल, जिल्हा रायगड या ठिकाणी सकाळी नऊ ते पाच वाजता या दरम्यान महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान   भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात तज्ञ   डॉक्टर्स तपासणी करुन महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य   योजनेच्या लाभार्थी रुग्णांवर आवश्य्क शस्त्रक्रिया,कर्करोग, मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार,पोटाचे आजार, मेंदू व मज्जासंस्था विकार, स्त्रीरोग, अस्थिव्यंग, सर्जरी, जठर व आतडे शस्त्रक्रिया,त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू वगळून, कान नाक घसा तपासणी करण्यात येईल. या शिबीरामध्ये व्याधी निदान झाल्यास योजनेच्या मान्यताप्राप्त   रुग्णालयामध्ये ज्यांचे उत्पन्न एक लाख पेक्

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अलिबाग दि.11, भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय   प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. या असमान निधी योजनेंबाबत नियम अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. सन 2019-20 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत.   (Non Matching Schemes)   1.)ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना ग्रंथ, साधन सामग्री,फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य.,2.) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा,विकसित करण्यासाठी अर्थ सहाय्य.,3)महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थ सहाय्य,4.) राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्

बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान कार्यक्रमाचा सांगता समारंभ संपन्न

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.09 (जिमाका) - कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.07 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियानचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांचे हस्ते दि.07 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या अभियानामध्ये मुख्य:त्वे व्यापारी असोसिएशन, हॉटेल असेासिएशन, मॅन्युफक्चरिंग असोसिएशन, संस्था चालक/मालक, विटभट्टी चालक/मालक, गॅरेजेस, ढाबे यांना   कायद्यातील तरतुदींची माहिती देऊन जनजागृती करणे तसेच सेल्फी पाँईट प्रदर्शित करणे, टोल नाक्यावर हायवेवरती बाल कामगार प्रथेविरुध्द होर्डींग्ज प्रदर्शित करणे आणि वेगवेगळ्या स्तरावर चर्चासत्र आयोजित करणे, रॅली,पथनाट्य,स्वाक्षरी मोहिम राबविणे,विटभट्टी मालक/चालक यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे, आकाशवाणीच्या माध्यमातून जनजागृती करणे,स्थानिक केबल वरुन प्रथेविरुध्द संदेश देणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संपूर्ण महिनाभरात केलेल्या जनजागृती कार्यक्रमाची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी व्हनाळकर यांनी सर्व उपस्थितांना दिली.