बीच गेम्स खेळांच्या स्पर्धाचे आयोजन



अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी,रायगड कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात दि.12 ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.  त्याअंतर्गत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.  त्यामध्ये बीच गेम्सचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विविध बीच गेम्स खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे.  शनिवार दि.14 डिसेंबर रोजी मुरुड बीच येथे बीच लगोरी,बीच रिंग टेनिस, बीच वुडबॉल.   रविवार दि.15 डिसेंबर रोजी उरण बीच येथे बीच कबड्डी,बीच व्हॉलीबॉल.  अलिबाग बीच येथे बीच व्हॉलीबॉल.  मुरुड बीच येथे बीच व्हॉलीबॉल.   सोमवार दि.16 डिसेंबर रोजी वरसोली बीच अलिबाग येथे बीच थ्रोबॉल.  मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी वरसोली बीच अलिबाग येथे बीच थ्रोबॉल.  मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी दिवेआगर बीच श्रीवर्धन येथे बीच कबड्डी,बीच वुडबॉल.   या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या संघानी क्रीडा अधिकारी सचिन निकम (8856093608) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाक्रीडा अधिकारी श्रीम.अंकिता मयेकर यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड