Posts

Showing posts from November 26, 2023

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

  रायगड , दि.01  ( जिमाका):-   किमान  आधारभूत किंमत धान खरेदी  योजनेंतर्गत   दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यां च्या  मार्फत  जिल्हा पणन अधिकारी ,  रायगड  यांच्या  अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार  संस्थांमार्फत   38 खरेदी केंद्रावर  खरीप व रब्बी पणन हंगाम  2023-2024 करिता    धानाची (भाताची) खरेदी  करण्यात  येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील  दि.9 नोव्हेंबर 2023   शासन निर्णयान्वये  भात खरेदीचा   धान-खरीप पणन  हंगाम कालावधी  दि.9 नोव्हेंबर 2023 ते  दि. 31 जानेवारी 2024, तर भरड धान्य खरीप पणन  हंगाम कालावधी  दि.9 डिसेंबर 2023 ते  दि. 31 जानेवारी 2024    असा असेल. तर रब्बी/उन्हाळी  हंगाम  केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील . भात खरेदीच्या वेळी  शेतकऱ्यांनी  आपल्याकडील जमिनीबाबतचा 7 / 12 चा उता ऱ्या ची व गाव नमुना  8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता  आणणे आवश्यक आहे.  या  उताऱ्यातील  धान्य व धानाखालील क्षेत्र  पाहून  धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेत

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

    रायगड(जिमाका)दि.01:-  रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरी ल) व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये नवीन विहिर या घटकाचा लाभ असल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओळीताखाली येवून पिक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद सत्यजीत बडे व कृषी विकास अधिकारी, रायगड जिल्हा प्ररिषद मिलिंद चौधरी यांनी केले आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सध्याची प्रचलित आदिवासी उपयोजना ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांत

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी संपन्न

       रायगड(जिमाका)दि.01:-   जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे    यांच्या   मार्गदर्शनानुसा र तसेच    जिल्हा शल्यचिकित्सक      डॉ.अंबादास देवमाने    यांच्या नियोजनानुसार जागतिक   एड्स   दिनानिमित्त    जनजागृतीपर   प्रभात   फेरीचे   आयोजन    करण्यात आले. त्यानुसार आज   दि.1 डिसेंबर जागतिक दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे अपर जिल्ह्याधिकारी सुनिल थोरवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ॲड. अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली.  प्रकल्प संचालक,   महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांचे   संयुक्त विद्यमाने    जिल्हा सामान्य रुग्णालय येथे    डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शनाखाली    01 डिसेंबर   जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त   रॅली व मॉब फ्लॅशचे   आयोजन करण्यात आले होते. या या प्रभात फेरीकरिता   जिल्