Posts

Showing posts from May 9, 2021

पनवेल कोविड रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे आयोजन जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी केले मार्गदर्शन

    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता गवळी, डॉ.राजपूत, डॉ.प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह सर्व नर्सिंग स्टाफ सह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या सत्राचे प्रमुख वक्ते जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी करोना आजार आणि मानसिक समुपदेशन यावर मार्गदर्शन करताना रुग्णांची आजारादरम्यान असणारी मानसिक स्थिती, त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती, सोशल मीडियाद्वारे मिळणारी अपूर्ण माहिती याचा सविस्तर अभ्यास करून लोकांना करोना रुग्णांशी कसे बोलावे, कोणती माहिती द्यावी, अपेक्षा वास्तव कशा ठेवता आल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित आणि परिस्थितीसदृश्य माहिती पोहोचणे किती गरजेचे आहे त्यासोबतच रुग्णांसोबतचा आवश्यक असणारा संवाद, हा रुग्णाची प्रकृती सुधारण्यातला मोठा घटक असून त्यावर सर्वांनी लक्ष द्

संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे अभिवादन

    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- संत बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी आज रायगड जिल्हा परिषद,अलिबाग इमारत, स्वागत कक्ष येथे अभिवादन केले. यावेळी कनिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र गायकवाड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश गिते, स्वीय सहाय्यक पाडूरंग घायतडक, श्रीम. शबाना शेख, श्रीम.रीना पाटील, श्रीम.दिपाली जैतू आदि उपस्थित होते. ००००००

संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :-संत बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.        यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रवींद्र मठपती, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.मेश्राम, तहसिलदार सतीश कदम   तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 0000

सन 2021-22 मधील इयत्ता 6 वी साठी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या तारखेत बदल

    अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :-   जवाहर नवोदय, विद्यालय, माणगाव येथील इयत्ता 6 वी प्रवेशासाठी निवड चाचणी दि.16 मे 2021 रोजी घेण्यात येणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे निजामपूर, ता.माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी कळविले आहे. निवड चाचणीची सुधारित तारीख नंतर कळविण्यात येईल.               जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी श्री.संतोष चिंचकर, मो.9881351601 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, एस.व्ही.बोभाटे यांनी   केले आहे. ०००००

म्हसळा तालुक्यातील मौजे घोणसे येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- म्हसळा तालुक्यातील घोणसे येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.      या पार्श्वभूमीवर मौजे घोणसे, ता.म्हसळा येथील स.नं.60, क्षेत्र 0.91.0 हे.आर. पैकी 0.05.0 हे.आर. या सरकारी गोठण, ग्रामपंचायत देवघर यांच्याकडे निहीत असलेल्या शासकीय मिळकत या मिळकतीमधील 0-05-0 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायतीकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात आली असून ही जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घोणसे, ता.म्हसळा करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.     000000

तळा तालुक्यातील मौजे गिरणे येथील नवीन आरोग्य उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.10 (जिमाका):- तळा तालुक्यातील मौजे गिरणे येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.      या पार्श्वभूमीवर मौजे गिरणे ता.तळा येथील गट नं.116 एकूण क्षेत्र 0.08.00 हे.आर. पैकी 0.05.00 हे.आर. जमीन महसूल   मुक्त व सारामाफीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन आरोग्य उपकेंद्र गिरणे, ता.तळा करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.   000000

म्हसळा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील नवीन आरोग्य उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.10 (जिमाका):- म्हसळा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.      या पार्श्वभूमीवर मौजे पांगळोली ता.म्हसळा येथील स.नं./हि.नं.18/1,क्षेत्र 0.17.0 हे.आर. मिळकतीपैकी 0-05-0 हे.आर. इतके क्षेत्र, ग्रामपंचायत पांगळोली यांच्याकडील ही जमीन ग्रुप ग्रामपंचायत संदेरी, ता.म्हसळा यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करण्यात आली असून ही जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन आरोग्य उपकेंद्र पांगळोली, ता.म्हसळा करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.   000000