सन 2021-22 मधील इयत्ता 6 वी साठी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या तारखेत बदल

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :-  जवाहर नवोदय, विद्यालय, माणगाव येथील इयत्ता 6 वी प्रवेशासाठी निवड चाचणी दि.16 मे 2021 रोजी घेण्यात येणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे निजामपूर, ता.माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी कळविले आहे. निवड चाचणीची सुधारित तारीख नंतर कळविण्यात येईल.

             जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी श्री.संतोष चिंचकर, मो.9881351601 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, एस.व्ही.बोभाटे यांनी  केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक