Posts

Showing posts from June 18, 2017

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे वाहन लिलाव

वृत्त क्र.344                                                                                                   दिनांक:-23 जून 2017 प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे वाहन लिलाव अलिबाग,दि.23,(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय,पनवेल या कार्यालयात महाराष्ट्र कर कायदा 1958 तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूदी वापरुन वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहन अटकाव केलेली आहेत. अशी वाहन या कार्यालयासमोर असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवण्यात आली आहेत. वायुवेग पथकाने अटकावून ठेवलेल्या व थकित कर असलेल्या एकूण 30 वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतूदी वापरुन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल या ठिकाणी 30 जून 2017 रोजी दुपारी 12.30 वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती कार्यालयात अभियोग कक्षात उपलब्ध आहे.  तरी इच्छुकांनी लिलावात भाग घ्यावा. असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे. 000000

अलिबाग-रेवदंडा,साळाव, मुरुड खाडीपूल वाहतुकीस सुस्थितीत

वृत्त क्र.343                                                                                                        दिनांक:-23 जून 2017 अलिबाग-रेवदंडा,साळाव, मुरुड खाडीपूल वाहतुकीस सुस्थितीत अलिबाग दि. 23 (जिमाका),  अलिबाग- रेवदंडा-साळाव-मुरुड रस्त्यावरील  रेवदंडा खाडीपूल वाहतुकीसाठी सुस्थितीत व सुरक्षित असून वाहतुकीस कुठलाही धोका नाही. अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,अलिबाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.             सदरील रेवदंडा खाडीवरील पुलास भेगा पडून पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांत  व सोशल मिडीयावर प्रसारित झाले होते. त्यानुसार या पुलाची पाहणी करण्यात आली. यात  सदर पुलाची भेग,  पूलाचे दोन गाळयामधील एक्सपांशन जॉइन्ट उघडे पडल्यामुळे दिसत आहे. त्याचा  पुलाच्या सुरक्षिततेवर कुठलाही प्रतिकुल परिणाम होत नाही. पूलाला कोणत्याही प्रकारचा  स्ट्रक्चरल धोका नाही. पूलाला पडलेली भेग भरुन घेण्यात आली असून पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत व सुरक्षित आहे. वाहतुकीस कुठलाही धोका नाही अशी माहिती  त्यांनी दिली आहे. 000000000000

अलिबाग, पनवेल व पाली- सुधागड मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह ऑफलाईन प्रवेश

वृत्त क्र.342                                                                                                 दिनांक:-23 जून 2017 अलिबाग, पनवेल व पाली- सुधागड मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह ऑफलाईन प्रवेश अलिबाग,दि.23,(जिमाका):- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, दिव्या अपार्टमेंट, आरसीएफ गेट समोर, वेश्वी, अलिबाग जि.रायगड. पनवेल-सेक्टर-10, प्लॉट नं.21, ग्रीन पार्क सोसायटी समोर, पनवेल तसेच पाली सुधागड, मधली आळी, राम मंदीर रोड, तळ्याच्या शेजारी, पाली सुधागड या शासकीय वसतीगृहात सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश प्रक्रीया ही ऑफलाईन (मॅन्यूअली) पद्धतीने होणार आहे. ऑफलाईन प्रवेशाकरिता वसतिगृहात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देणेत आलेले आहेत. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येऊन प्रवेश अर्ज घेवून नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृहात विहीत वेळेत जमा करणे आवश्यक आहे. सन 2017-18  वसतिगृह प्रवेश  प्रक्रीया बाब- शालेय विद्या

पोलादपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया सुरु

वृत्त क्र.341                                                                                             दिनांक:-23 जून 2017 पोलादपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज भरणे  प्रक्रीया सुरु अलिबाग,दि.23,(जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलादपूर मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट-2016 करीता मंजूर असलेल्या-इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वेल्डर, शिटमेटलवर्कर तसेच सुईंग टेक्नॉलॉजी या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज  भरणे प्रक्रीया  सुरु झाली असून 2 जुलै 2017 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत online पद्धतीने http://admission.dvel.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यांत आली आहे. तसेच online पद्धतीने भरलेले अर्ज 3 जुलै 2017  सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विहीत शुल्क आकारुन निश्चित (comfirmatio)  करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व  फिटर ट्रेड करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण, वेल्डर, शिटमेटलवर्कर ट्रेड करिता इयत्ता 10 वी उत्तीर्ण,अनुतीर्ण तर कटींग व  सुईंग करिता 8 वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक  पात्रता आहे. तरी प्रवेशोच्छुक उमेदवारां

शिक्षणाचा अधिकार अंतर्गत प्रवेशास मुदतवाढ

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com फेसबुक :-dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad वृत्त क्र.340                                                                                                       दिनांक:-23 जून 2017 शिक्षणाचा अधिकार अंतर्गत प्रवेशास मुदतवाढ अलिबाग,दि.23,(जिमाका):- सक्तीचा शिक्षणाचा अधिकार  अधिनियम (RTE)2009 अंतर्गत 25% आरक्षणामधून प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रीया रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली होती.  यात बहूतांश शाळेत 25%  प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण करुनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालकांना पाल्याचे प्रवेशाचे नविन अर्ज भरण्यासाठी दि.30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे.  पालकांनी संबंधित तालुक्यांतील गट शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेशाचे नवीन अर्ज भरावेत. असे आवाहन शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे. 000000

रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज-डॉ.राजू पाटोदकर

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com फेसबुक :-dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad विशेष लेख क्र.24                                                                                            दिनांक :- 23/06/2017 (26 जून सामाजिक न्याय दिनानिमित्त लेख) रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज         राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे 26 जून. हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लौकिकास शाहू महाराजांचे कार्य हे दिपस्तंभासारखे असून त्यांनी त्याकाळी घेतलेले निर्णय आजही दूरदृष्टीची साक्ष देतात.             राजर्षी शाहू महाराजांनी सुमारे 100 वर्षापूर्वी घेतलेले निर्णय हे लोकाभिमुख, लोकोपयोगी असे होते. ज्याची उपयुक्तता आजही आपणास दिसून येते. सुक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन असलेल्या या राजांनी लोकसेवांचा नवा आदर्श निर्माण केला. त्याबद्दलचा हा लेख. ....   महात्मा ज्योतिबा फ

4 कोटी वृक्ष लागवड जिल्हयाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक - जिल्हा‍धिकारी पी.डी.मलिकनेर

Image
वृत्त क्र.337                                                                                                       दिनांक:-22 जून 2017 4 कोटी वृक्ष लागवड जिल्हयाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक                                                                                - जिल्हा‍धिकारी पी.डी.मलिकनेर             अलिबाग दि.22 (जिमाका), चार कोटी वृक्ष लागवड ही महत्वाची मोहिम असून रायगड जिल्हयाचे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज येथे केले. चार कोटी वृक्ष लागवड संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.             यावेळी प्रांताधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड विठ्ठल इनामदार, रोहा रविंद्र बोंबले तसेच उपवन संरक्षक रोहा विजय सुर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, अधिक्षक कृषि अधिकारी के.बी.तरकसे, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प पेण गजेंद्र अहिरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर तसेच इतर अधिका

मतदार नोंदणी विशेष मोहिम सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

Image
वृत्त क्र.338                                                                                                       दिनांक:-22 जून 2017  मतदार नोंदणी विशेष मोहिम सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा                                           -   जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर  अलिबाग, दि.22 :-    भारत निवडणूक आयोगाने लोकशाही अधिक बळकट व्हावी व मतदाराला  जागृत करुन त्याचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतुने विशेष मतदार नोंदणी अभियान 1 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत राबविण्यात येणार असून सर्व संबंधित मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  ते बोलत होते.  यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकरी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, उपजिल्हाधिकारी श्रीमती जयमाला मुरुडकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  ही मतदार मोहीम रायगड जिल्हयात गावपातळीपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे. तसेच  या मो

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

वृत्त क्र.339                                                                                                       दिनांक:-22 जून 2017 राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम अलिबाग दि.22,(जिमाका):- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे दि.23 जून 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2017 रोजी सकाळी 6.00  वाजता मलबार हिल मुंबई येथून वाहनाने अलिबाग -जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता अलिबाग येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 9.30 वाजता अलिबाग येथून रेवदंडा ता. अलिबागकडे प्रयाण. 10.00 वाजात रेवदंडा ता.अलिबाग येथे आगमन व डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचेकडे सदिच्छा भेट. सोईनुसार रेवदंडा ता.अलिबाग येथून जळगांव कडे प्रयाण. 00000

रायगड जिल्हयातील सरासरी पाऊस

रायगड जिल्हयातील सरासरी पाऊस          अलिबाग दि.21  (जिमाका),   रायगड जिल्हयात  दिनांक 21 जून 2017 पर्यंत 4564.58 मि.मि. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी 285.29  आहे. तर आज दिनांक 21 जून 2017 रोजी पडलेला पाऊस पुढील प्रमाणे आहे.             अलिबाग 1.00 मि.मि., पेण-5.10 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-4.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-101.20 मि.मि., खालापूर-4.00 मि.मि., माणगांव-8.00 मि.मि., रोहा-15.00 मि.मि., सुधागड-18.33 मि.मि., तळा-9.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-16.00, म्हसळा-16.80 मि.मि., श्रीवर्धन-16.00 मि.मि., माथेरान-5.20 मि.मि., एकूण-143.63 मि.मि. पाऊस पडला असून त्याची सरासरी-8.98 येवढी आहे.             000000

जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत आयुष विभागामार्फत जागतिक योग दिन व योग जानजागृती अभियान साजरे

जिल्हा सामान्य  रुग्णालय अंतर्गत आयुष विभागामार्फत जागतिक योग दिन व योग जानजागृती अभियान साजरे अलिबाग,दि.21,(जिमाका):- जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त  जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग येथे आज  योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अनिल फुटाणे,अति.जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.सुहास कोरे,निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क), डॉ.जगदिश दिवकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र रा.जि.प.अलिबाग,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, डॉ.अर्चिस पाटील व डॉ.वैशाली पाटील,आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी, डॉ.रश्मी गंभीर,होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी,डॉ.अब्दुल बारी शेख,युनानी वैद्यकीय अधिकारी,आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगमार्गदर्शक श्री.दामोदर पाटील व श्रीम.स्मिता देवळे, सामान्य् रुग्णालयातील प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक श्री. रुपेश पाटील व श्रीम.दिपाली म्हात्रे तसेच जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त  अधिकारी, कर्मचारी व परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             जागतिक योगदिनानिमित्त

र.वा.दिघे स्मृती पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

र.वा.दिघे स्मृती पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन अलिबाग,दि.21,(जिमाका):-कोकणातील साहित्यिक कै. र.वा.दिघे यांच्या नावाने कोकणातील साहित्यिकांसाठी गेल्या 9 वर्षापासून पुरस्कार देण्यात येत आहे.5000/- रुपये,स्मृतीचिन्ह् असे पुरस्काराचे स्वरुप असून 19 जुलै रोजी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1 मे 2016 ते 15 जून 2017 या कालावधीत ज्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा लेखकांनी 25 जून 2017 पर्यंत आपली पुस्तके दोन प्रतीत अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, रामनारायण पत्रकार भवन, ता.अलिबाग जि.रायगड या पत्त्यावर पाठवावेत,असे आवाहन अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी केले आहे.संपर्कासाठी फोन नं.9370690626,9767341291 असा आहे. 00000

शासकीय अद्यापक विद्यालय सासवने-अलिबाग डि.एड.ऑनलाईन प्रक्रीयेस मुदतवाढ 30 जून पर्यंत अर्ज करावेत

शासकीय अ द्या पक वि द्या लय सासवने-अलिबाग डि.एड.ऑनलाईन प्रक्रीयेस मुदतवाढ 30 जून पर्यंत अर्ज करावेत अलिबाग दि.21,(जिमाका):-सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी D.EI.ED.(D.ED.)प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश घेण्याची मुदत  18 जून 2017 अशी होती आता ती मुदत 30 जून 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.तरी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http://www.mscert.org.in   या संकेतस्थळा भेट  देवून  D. EI.ED. या लिंकवर क्लिक करुन या अध्यापक विद्यालयाची निवड करुन अधिकाधिक  ऑनलाईन अर्ज भरावेत. या विद्यालयाची प्रथम वर्षाची रु.3300/- (वार्षिक शुल्क) इतकी शासकीय फी आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात येत आहे. संपर्कासाठी प्राचार्य श्री. वसावे-7350565990 व श्री. बांडे, सहाय्यक शिक्षक-9423093824, 7798556359. श्री.पाखरे, सहाय्यक शिक्षक -8446900960,8975694459 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 0000

शेत जमीन विकण्यासंबंधी जमीन मालकांना आवाहन

शेत जमीन विकण्यासंबंधी जमीन मालकांना आवाहन             अलिबाग दि.20 (जिमाका):-  सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजुरांना  शेतजमीन उपलब्ध करुन देण्याकरीता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण  व स्वाभीमान योजना राबविली जात आहे. ज्या जमीन मालकांना त्यांचेकडील कसण्यास योग्य असलेली जमीन विकावयाची असेल, त्यांनी संबंधित जिल्हयाचे प्रादेशिक उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे साध्या कागदावर अर्ज करावा. ठळक अटी:- जमीन मालकी बाबतचा सातबारा, जमीनीवरती कसल्याही प्रकारचे कर्ज नसावे.,जमीन शासकीय दर (रेडी रेकनर) प्रमाणे खरेदी करण्यात येते., खरेदी किंमत जास्तीत जास्त  रु.3.00 लक्ष प्रती एकर राहील.असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,रायगड अलिबाग यांनी प्रसिद्घी पत्रकान्वये कळविले आहे. 000000000

माणगांव तहसिल कार्यालयातर्फे चावडी वाचन कार्यक्रम संपन्न

माणगांव तहसिल कार्यालयातर्फे चावडी वाचन कार्यक्रम संपन्न             अलिबाग दि. 20 (जिमाका)   राष्ट्रीय भुमी अभिलेख अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गत माणगांव तालुक्यांतील 186 गावांपैकी 39 गावांमध्ये चावडी  वाचन कार्यक्रम राबविण्यात आला. खातेदारांना मंडळ अधकारी, तलाठी यांच्या हस्ते 7/12 वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकामी तहसिल कार्यालय माणगांव येथे  वेळोवेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांची सभा घेण्याबाबत माणगांवच्या  तहसिलदार श्रीमती उर्मिला पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. चावडी वाचन कार्यक्रम यशस्वी राबविण्याकरिता सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे.             तसेच महाराजस्व  अभियानांतर्गत दिनांक 9 जून 2017 रोजी माणगांव येथे विविध 692 दाखले वाटप करण्यात आले. तसेच सर्व नागरिकांना अद्यायावत गाव न.नं.व 7/12 ची प्रिंट संबंधित तलाठी यांचेकडून प्राप्त करुन अचूक असल्याची खात्री करावे असे आवाहनही करण्यात आले. सर्व महा-ई सेवा, सेतू केंद्रांना सर्व प्रकारचे दाखले त्वरित देण्यात यावेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.       

रायगड जिल्हयातील सरासरी पाऊस

रायगड जिल्हयातील सरासरी पाऊस          अलिबाग दि.20  (जिमाका),   रायगड जिल्हयात  दिनांक 20 जून 2017 पर्यंत 4123.29 मि.मि. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी 257.71  आहे. तर आज दिनांक 20 जून 2017 रोजी पडलेला पाऊस पुढील प्रमाणे आहे.             अलिबाग 9.00 मि.मि., पेण-2.80 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-33.80 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-21.00 मि.मि., तळा-15.00 मि.मि., महाड-47.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-41.00 मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-2.10 मि.मि., एकूण-297.66 मि.मि. पाऊस पडला असून त्याची सरासरी-18.60 येवढी आहे.             000000

जिल्हा न्यायालयात मध्यस्ती जागृती कार्यक्रम संपन्न

Image
जिल्हा न्यायालयात मध्यस्ती जागृती कार्यक्रम संपन्न   अलिबाग दि.19   (जिमाका):-    विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने नुकताच   प्रमुख जिल्हा न्यायाधीश   मु.गो.सेवलीकर यांच्या अध्यक्षतेखाली   मध्यस्ती जागृती   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश व.स्तर एल.डी.हुली, जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, वकील जे.एच.चेऊलकर, श्रीराम ठोसर,उपस्थित होते.             यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड यांनी आपल्या न्यायालयीन कामकाजात आलेले पोटगीचे   प्रकरण मध्यस्ती मार्फत कसे निकाली निघाले याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील , विधिज्ञ जे.एच.चेऊलकर, श्रीराम ठोसर यांनीही वेगवेगळया पध्दतीने मध्यस्ती प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले.             यावेळी राष्ट्रीय विधी व प्राधिकरण दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेली प्रार्थना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली.    दिवाणी न्यायाधीश व.स्तर श्री. हुली यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्यस्ती   संकल्पनेचा हेतू स्पष्ट   केला. क

रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी

रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी    अलिबाग दि.19, (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र वगळून) दिनांक 15 जून 2017 रोजी सकाळी 8.00 पासून ते 28 जून  2017 रात्रौ 24.00 वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. दि. 26 जून 2017 रोजी  मुस्लीमबांधवांचा रमजान ईद हा सण साजरा होणार आहे. तसेच खोपोली पोलीस ठाणे हद्दीत खोपोली नगरपरिषद चतुर्थ श्रेणी वसाहत,जुना मच्छिमार्केट इंदिरानगर येथील राहणाऱ्या श्रीम. अलका विलास भालेराव, व इतर 22 महिला यांनी जातीयवादी समाजकंटकांकडून चालू असलेल्या दहशतवादामुळे दलित बौद्ध समाजातील महिला मुलींची अब्रु धोक्यात असून त्यांच्या जिवीतास धोका असल्याने संबंधीतांवर योग्यती  कारवाई करावी अन्यथा दिनांक 21 जून 2017 रोजी पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पटांगण खोपोली येथे आमरण उपोषण करणार असल्याबाबत कळविले आहे. तसचे वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील श्री.प्रफुल्ल्‍ विठोबा म्हात्रे, उपसभापती कृषी उत्पन्न्‍ बाजार समिती पेण,श्री.जयप्रकाश

26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन

26  जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन अलिबाग,दि.19(जिमाका):- रोजी छ.राजश्री शाहू महाराज यांचा 26 जून रोजी जन्म् दिवस प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त् दि.26 जून 2017 रोजी पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  राजस्व् सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक, यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या  कार्यक्रमामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत शाळा,तालुका,जिल्हास्तरावर गुणांनुक्रमे सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रथम येणाऱ्या अनु.जाती,विजाभज,व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.असे सहाय्यक आयुक्त्, प्रसाद खैरनार समाज कल्याण,विभाग,रायगड अलिबाग, यांनी कळविले आहे. 000000000

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्र

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम अलिबाग,दि.19(जिमाका)-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 20 जून 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि.20  रोजी दुपारी 3.00 वाजता मुंबई येथून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 7.00 वाजता हॉटेल रॅडिसन अलिबाग जि.रायगड  येथे आगमन व मुक्काम. बुधवार दि.21 जून 2017 रोजी सकाळी 7.45 वाजता हॉटेल रॅडिसन येथून अलिबागकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता चिंतामणराव केळकर विद्यालय,अलिबाग रेवदंडा बायपास रोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी 9.15 वाजता हॉटेल रॅडिसनकडे प्रयाण. 10.00 वाजता हॉटेल रॅडीसन येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता हॉटेल रॅडिसन येथून मुंबईकडे प्रयाण.     00000