अलिबाग, पनवेल व पाली- सुधागड मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह ऑफलाईन प्रवेश

वृत्त क्र.342                                                                                              दिनांक:-23 जून 2017
अलिबाग, पनवेल व पाली- सुधागड
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह
ऑफलाईन प्रवेश
अलिबाग,दि.23,(जिमाका):- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, दिव्या अपार्टमेंट, आरसीएफ गेट समोर, वेश्वी, अलिबाग जि.रायगड. पनवेल-सेक्टर-10, प्लॉट नं.21, ग्रीन पार्क सोसायटी समोर, पनवेल तसेच पाली सुधागड, मधली आळी, राम मंदीर रोड, तळ्याच्या शेजारी, पाली सुधागड या शासकीय वसतीगृहात सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश प्रक्रीया ही ऑफलाईन (मॅन्यूअली) पद्धतीने होणार आहे. ऑफलाईन प्रवेशाकरिता वसतिगृहात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देणेत आलेले आहेत. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येऊन प्रवेश अर्ज घेवून नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृहात विहीत वेळेत जमा करणे आवश्यक आहे.
सन 2017-18  वसतिगृह प्रवेश  प्रक्रीया
बाब- शालेय विद्यार्थी- ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी -20 जून 2017 ते 1 जूलै 2017
इ.11 वी 10 वी नंतरचे अभ्यासक्रम -  20 जून 2017 ते 6 जूलै 2017, बी.ए.बी.कॉम.बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमाकरिता -20 जून 2017 ते 20 जूलै 2017, व्यावसायिक अभ्यासक्रम- 15 जून 2017 ते 14 ऑगस्ट 2017  पर्यंत राहील.
            हुशार, गरजू, होतकरु विद्यार्थ्यांनी  याचा लाभ घेण्यासाठी संबंधित वसतीगृहामध्ये संपर्क साधावा असे गृहपाल मागासवर्गी मुलांचे शासकीय वसतिगृह  अलिबाग, पनवेल व पाली सुधागड यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक