Posts

Showing posts from June 30, 2019

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि.रायगड   दि.3 - (जिमाका)   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) तर्फे मातंग समाजातील   व पोटजातीतील लोकांकरिता उद्योग व्यवसाय स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन देत असते.   त्यात मातंग समाजातील मांग,मातंग, मीनी-मादीग, मादींग, दानखाणी, दानखाणी मांग, माग महाशी, मदारी,राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 या पोटजातींचा समावेश आहे.   या जातीतील वय 18 वर्षे ते   50 वर्षे वयोगटातील इच्छुक व्यक्तींकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.   यात बँकेकडून मंजूर अनुदान योजनेतून 50 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते.   या योजनेसाठी जिल्ह्याला 60 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे.   तर बीज भांडवल योजनेअंतर्गत पन्नास हजार ते सात लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट आहे.   तरी इच्छुक अर्जदारांनी आपला   कर्ज प्रस्ताव आवश्यक त्या   दस्तऐवजासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्यायभवन, मराठी शाळेच्या मागे गोंधळपाडा अलिबाग   जि.रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक तांत्रिक मान्यता 15 जुलै पर्यंत सादर करा-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड,दि.2(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 च्या कामांचा वेग वाढवावा लागणार असून सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या तांत्रिक मान्यता   15 जुलै पर्यंत सादर कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज दिले.             येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा वार्षिक योजना 2019-20 च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या समवेत जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, अलिबाग उप वनसंरक्षक मनिष कुमार, रोहा उप वनसंरक्षक राकेश सपट, महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता पाटील,   उप मुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डी.बी.वळवी, तसेच सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.             यावेळी विभाग निहाय झालेल्या कामकाज प्रक्रियेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला. आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांची शक्यता लक्षात घेता, सर्व प्रस्तांवाची पुर्तता करुन तांत्रिक मान्यता आदि सोपस्कार पूर्ण करावेत व विहित प्रक्रियांचा अवलंब करुन कार्यादेश देण्यात यावे जे

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)- राज्याचे युवा धोरण – 2012 मधील शासन जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्था व व्यक्तिंकडून मंगळवार दि.30 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. पुरस्काराचे स्वरूप- जिल्हास्तर युवा पुरस्कार- जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रू. 10 हजार (प्रति युवक व युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्रए, सन्मानचिन्ह, रोख रक्कम- रु. 50 हजार अशा स्वरूपाचा असेल. पात्रतेचे निकष – ·                     अर्जदार युवक/युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पर्यंत असावे. ·         जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्य ·         पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस व

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 172 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 172.41 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 874.70 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 64.00 मि.मि., पेण-214.00 मि.मि., मुरुड-145.00 मि.मि., पनवेल-234.20 मि.मि., उरण-227.00 मि.मि., कर्जत-136.00 मि.मि., खालापूर-157.00 मि.मि., माणगांव-270.00 मि.मि., रोहा-188.00 मि.मि., सुधागड-124.00 मि.मि., तळा-235.00 मि.मि., महाड-100.00मि.मि., पोलादपूर-172.00, म्हसळा-260.00मि.मि., श्रीवर्धन-45.00 मि.मि., माथेरान-187.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2758.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 172.41 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   27.83 टक्के इतकी आहे. 0000

महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभिया: बचतगटांना केलेल्या पतपुरवठ्यामुळे ग्रामविकासाला चालना-दिलीप हळदे

Image
दि.2 - (जिमाका)   गावा-गावात तयार केलेल्या बचतगटांना बँकानी पतपुरवठा   केल्यास बचतगटांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड-अलिबाग यांच्यावतीने स्व.प्रभाकर पाटील सभागृह जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.             यावेळी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, गटविकास अधिकारी अविनाश घरत, कोकण विभागाचे आर्थिक समावेशक सल्लागार श्री.कासवटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.निखिलकुमार ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट, एन.आय.आर.डी.चे हैद्राबाद येथील प्रशिक्षक एल रामचंद्र रेड्डी, पी.मोहनीया   आदी उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना श्री.हळदे म्हणाले की, जिल्ह्य

जिल्हा परिषदेत आज(दि.2) जिल्हास्तरीय बॅंकर्स कार्यशाळा

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत   रायगड जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय बॅंकर्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील   स्व. प्रभाकर पाटील सभागृहात   सकाळी 10 ते सायं. 5 या वेळात ही कार्यशाळा होणार आहे, असे   प्रकल्प संचालक. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा अभियान सहसंचालक यांनी कळविले आहे. 00000

अलिबाग पं.स. ची गुरुवारी(दि.4)मासिक सभा

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- अलिबाग पंचायत समितीची मासिक सभा गुरुवार दि.4 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. या सभेस संबंधितांना उपस्थितीचे आवाहन पंचायत समिती सभापती  सौ. प्रिया नथुराम पेढवी यांनी व गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग यांनी केले आहे. 00000

शेतकरी, पशुपालकांचा सन्मान करुन साजरा केला कृषिदिन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- जिल्ह्यातील उपक्रमशिल शेतकरी व पशुपालकांचा सन्मान करुन रायगड जिल्ह्यात कृषि दिन आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास 36 शेतकरी व 35 आदर्श पशुपालक यांच्या सन्मान करण्यात आला. तसेच   सासवणे ता. अलिबाग येहील पोल्ट्री व्यावसायिक व पशुखाद्य उत्पादक, औषध निर्माता डॉ. श्याम ढवण यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ मिळावी यासाठी ऑनलाईन मार्केटिंग करता यावी यासाठी ‘रायगड कृषि बाजार’ या मोबाईल ॲप चे प्रकाशनही आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून हे ॲप शेतकऱ्यांना डाऊनलोड करता येऊन वापरता येणार आहे. या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, महिला बालकल्याण सभापती उमा मुंढे, समाजकल्याण सभापती राजाराम डामसे, जि.प. सदस्या चित्रा पाटील,योगि

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वाढदिवस फलक रायगड जि.प.प्रशासनाचा उपक्रम

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतंत्र वाढदिवस फलक आजपासून सुरु केला आहे. या फलकाचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.               रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपली हळदे यांच्या संकल्पनेतुन हा वैशिष्टयपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे.   आज या फलकाच्या अनावरण प्रसंगी जि.प.अध्यक्ष आदितीताई तटकरे, उपाध्यक्ष ॲङआस्वाद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गजऋषी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई आदी उपस्थित होते.   जिल्हा परिषदेच्या स्वागत कक्षात हा कार्यक्रम पार पडला.   यावेळी आज (दि.1 जुलै) वाढदिवस असलेले शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल गवळी, वरिष्ठ सहाय्यक सीमा राजेंद्र गायकवाड, कनिष्ठ सहाय्यक   मंगला पवार, राजाराम फडतरे, शिपाई राकेश पाटील यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा

33 कोटी वृक्ष लागवड अभियान : लावलेल्या झाडाचे संगोपन हे प्रत्येकाचे कर्तव्य --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
             अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत  यावर्षी  राज्यात सर्वत्र आज एकाच दिवशी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न होत आहे.  त्यासाठी   लावलेले झाड हे माझे आहे या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी   यांनी आज अलिबाग तालुक्यातील वावे येथे केले.           33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे येथील परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड   करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपवनसरंक्षक अलिबाग मनिष  कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम.शारदा पोवार, तहसिलदार अलिबाग सचिन शेजळ, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए.एस. निकत   यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.                   जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी पुढे म्हणाले की, वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शासकीय यंत्रणा,