जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक तांत्रिक मान्यता 15 जुलै पर्यंत सादर करा-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड,दि.2(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 च्या कामांचा वेग वाढवावा लागणार असून सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या तांत्रिक मान्यता  15 जुलै पर्यंत सादर कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज दिले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा वार्षिक योजना 2019-20 च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या समवेत जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, अलिबाग उप वनसंरक्षक मनिष कुमार, रोहा उप वनसंरक्षक राकेश सपट, महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता पाटील,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डी.बी.वळवी, तसेच सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी विभाग निहाय झालेल्या कामकाज प्रक्रियेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला. आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांची शक्यता लक्षात घेता, सर्व प्रस्तांवाची पुर्तता करुन तांत्रिक मान्यता आदि सोपस्कार पूर्ण करावेत व विहित प्रक्रियांचा अवलंब करुन कार्यादेश देण्यात यावे जेणे करुन वेळेत काम सुरु झाले पाहिजे. त्या दृष्टीने यंत्रणांनी गतीमान पद्धतीने कामकाज करावे असे निर्देश डॉ.सूर्यवंशी यांनी दिले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक