Posts

Showing posts from December 13, 2020

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- जिल्हा एड्स प्रतिबंध व   नियंत्रण   समितीची, एचआयव्ही/टीबी, ग्रेटर इन्व्हॉलमेंट ऑफ पीपल लिविंग विथ एचआयव्ही एड्स (जिपा) या समितीची आढावा बैठक (दि.15 डिसेंबर) जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाली.                       यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ठोकळ,   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन.एच.एम. डॉ.चेतना पाटील, वरिष्ठ वैद्यकीय   अधिकारी, एआरटी केंद्र अलिबाग डॉ. पांडुरंग शिंदे, आयसीटीसी इन्चार्ज/ रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, जिल्हा असिस्टंट एम अँड ई   डापकु रश्मी सुंकले, प्रतिनिधी महिला व बाल   विकास अधिकारी श्री. पंकज पाटील, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, पेण, प्रतिनिधी लोकपरिषद पनवेल, श्रीम.जयश्री मोकल, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, एन.एच.एम, रायगड, जिल्हा सहाय्यक लेखा, डापकु रवींद्र कदम, डॉट्स प्लस सुपरवायझर रायगड मनोज बामणे, संजय गांध

कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन व आय.आय.पी. यांच्यात सामंजस्य करार

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-     एकात्मिक बाल विकास प्रकल्प, रायगड जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन आणि आयपीसी ( भारतीय बालरोग तज्ञ संघटना ) यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, महाड, माणगाव व सुधागड तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या आरोग्य संदर्भात उपचार करण्यासंबंधी सामंजस्य करार दि.16 डिसेंबर रोजी करण्यात आला. या करारावर रायगड जिल्हा परिषद तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, स्वदेस फाउंडेशन तर्फे   मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य विभागाचे मुख्य व्यवस्थापक   डॉ. सुरेंद्र यादव, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, सुधीर वाणी तसेच आय.पी.सी. तर्फे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी स्वाक्षरी केली.   सामंजस्य करारानुसार पुढील पाच वर्षात कुपोषणमुक्त दक्षिण रायगड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.यामध्ये भारतीय बाल रोग तज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करून जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विका

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी जातप्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑनलाईनच सादर करणे आवश्यक

  वृत्त क्रमांक:-   1436                                                               दिनांक :- 16 डिसेंबर 2020                 अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- मा.निवडणूक आयोगाकडील दि.11 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झालेला आहे.         या निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दि.15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून दि.18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.                जात प्रमाणपत्रांची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया दि. 01 ऑगस्ट 2020 पासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरणे, आवश्यक दस्तऐवज स्कॅन करुन अपलोड करणे व त्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे. ही पूर्तता केल्यावर अर्जाची प्रिंट काढून विहित मार्गान

जवाहर नवोदय विद्यालयात इ.6 वी व इ.9 वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ

             अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयात सत्र 2021-22 करिता इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.15 डिसेंबर 2020 पर्यंत होती. परंतु आता नवोदय विद्यालय समितीच्या पत्रानुसार ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्यात आली असून इयत्ता 6 वी साठी मंगळवार, दि.29 डिसेंबर 2020   तर इयत्ता 9 वी साठी गुरुवार, दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   ऑनलाईन फार्म भरण्यासाठी www.navodayagov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.               रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व प्राचार्य श्री.बोभाटे   यांनी केले आहे. ००००००

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दि.8 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत

             अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात.   या योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.                त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठान च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावर उपलब्ध करून घ्यावा.             असमान निधी योजना सन-2020-21 साठी (Non Matching Schemes)- ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामुग्री, फर्निचर इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, “ राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा ” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य,   महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आय

दिव्यांग व्यक्तींना दर बुधवार-गुरुवारी होणार दिव्यांग प्रमाणपत्र वितरण

                अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ (यू.डी.आय.डी.कार्ड) बनवून मिळण्यासाठी दर आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दर बुधवारी केवळ अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी करण्यात येईल, त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केवळ 50 अस्थिव्यंग रुग्णांना टोकन देऊन तपासणी करून त्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र वितरित करता यावे, यासाठी विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सूचना देऊन तसे आदेश देण्यात आले आहेत.             तसेच दर गुरुवारी अस्थिव्यंग सोडून इतर सर्व (नेत्रदोष, कर्णबधीर, मानसिक दोष इ.) दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाण्याची व्यवस्था केली जाईल.               या कामासाठी लागणारे संगणक, प्रिंटर आदि आवश्यक साधनसामुग्रीकरिता आराेग्य प्रशासनाला आरसीएफकडून सहकार्य मिळणार आहे.                 अस्थिव्यंग रुग्णांना जिने चढताना अडचण येऊ नये, म्हणून दर बुधवारी अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी तळमजल्यावरील ओपीडी नं.14 मध्ये जिल्हा शल्यचिकित्स

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागास वर्ग उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करावेत-उपायुक्त विशाल नाईक

             अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.             ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी दि. 01 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे , याची नोंद घ्यावी. तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावेत. तद्नंतर त्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपद्धतीने जिल्हाधिकां ऱ्या च्यामार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत. जुन्या पद्धतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी , असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रा

राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याला दि.20 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ

      अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- राज्यात दि.12 व 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या रोजगार महामेळाव्यास दि. 20 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 80 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मा.मंत्री महोदय श्री. नवाब मलिक साहेब यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, कोणत्याही विषयातील पद्वी तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगार