राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दि.8 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत

 


 

         अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात.  या योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

              त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठान च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावर उपलब्ध करून घ्यावा.

            असमान निधी योजना सन-2020-21 साठी (Non Matching Schemes)- ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामुग्री, फर्निचर इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य,  महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाळ ग्रंथालयासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य, या योजनांचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे.

            या योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारित स्वरूपातील असावा.अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेतील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत जिल्ह्यातील ग्रंथालय अधिकारी कार्यालय दि. 08 जानेवारी 2021 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन संचालक ग्रंथालय,ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई श्रीमती शालिनी इंगोले यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड