Posts

Showing posts from October 30, 2022

“ग्रंथोत्सव” पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

Image
तरुणांसाठी होणार विशेष सत्रांचे आयोजन अलिबाग, दि.5 (जिमाका):- जिल्ह्यात दि.14 व दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी डोंगरे वाचनालय सभागृह येथे होणाऱ्या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली काल दि.4 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी सुप्रसिद्ध लेखक-साहित्यिक रविंद्र तांबोळी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सुचिता पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्या तथा साहित्यिका श्रुती देसाई, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपशिक्षणाधिकारी श्री.संतोष शेडगे, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षीच्या ग्रंथोत्सवात आबालवृद्धांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यासाठी नाविन्यपूर्ण सत्र आयोजित करावेत, तरुण वर्गासाठी विशेष सत्रांचे आयोजन करावे, या ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांच्या विषयांबाबत नागरिकांकडूनही सूचना मागवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी उपस्थितांना दिल्या. तसेच ज

अन् कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर फुलले हसू...!

Image
अलिबाग, दि.5(जिमाका):- उरण तालुक्यातील अनेक कातकरी वाड्यावर आज उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जातीच्या दाखल्यांचे वाटप संपन्न झाले. रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, उरण तहसिलदार श्री. भाऊसाहेब अंधारे आणि त्यांच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज दि.5 नोव्हेंबर 2022 रोजी डुंबा ची कातकरीवाडी जासई, कोल्हापूर कातकरीवाडी चानजे, लिंबाची कातकरीवाडी, डावूर नगर कातकरीवाडी उरण येथील कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी श्री.संतोष घरत,जासई, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी हे उपस्थित होते. जातीचे दाखले वाटप केल्यानंतर कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर अनमोल आनंद झळकत होता. उरण सामाजिक संस्थेने आदिवासी कातकरी बांधवांसाठी मागील दोन वर्षात केलेले काम पाहून दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उरण सामाजिक संस्था व असे काम करणाऱ्या अन्य सामाजिक

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “निक्षय मित्र” बनण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक (सहकारी कॉर्पोरेट, निवडून आलेले प्रतिनिधी, वैयक्तिक संस्था) क्षयरुग्णांना सहाय्य देवून मदत करुन आपण निक्षय मित्र बनू शकता. तरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी निक्षय मित्र बनण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान सुरु केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि.9 सप्टेंबर 2022 रोजी  “ प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान ”  या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना, संस्थांना क्षयरोग मुक्त भारत बनण्यासाठी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये निक्षय मित्रांच्यामार्फत क्षयरुग्णांना 6 महिने ते 3 वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येणार आहे. या आहारात पुढील विकल्प निश्चित करण्यात आ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे आवाहन

  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांकडून अर्ज केले जात असून, दि.3 नोव्हेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर 2 हजार 385 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विभागाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2022-23 या वर्षाकरिता प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही प्रणाली आणली आहे. विद्यार्थ्यांनी विहीत वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील 2 हजार 355 विद्या

विशेष लेख: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी शासनाचे पाठबळ..!

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थिनींना अर्थसहाय्य अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींसाठी केंद्र शासनातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. केंद्र शासनाने अल्पसंख्याक संवर्गात शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन आणि मुस्लिम या समुदायांचा समावेश केला आहे. या समुदायातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता  “ मेरिट कम मीन्स बेस्ड ”  म्हणजे  “ गुणवत्ता आणि गरजेनुसार शिष्यवृत्ती ”  ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ शासकीय आणि नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना दिला जातो. खासगी शैक्षणिक संस्थांची निवड राज्य सरकारांनी करावयाची आहे. देशभरात अशा 60 हजार शिष्यवृत्ती दिल्या जातात. प्रत्येक राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक सवंर्गाची संख्या लक्षात घेवून शिष्यवृत्तींची संख्या निर्धारित केली जाते. महाराष्ट्रासाठी ही संख्या 5 हजार 709 असून प्रत्येक अल्पसंख्याक समुदायातील 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पात्रता

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते “समग्र रायगड” कॉफी टेबल बुकच्या ई-बुकचे उद्घाटन संपन्न

Image
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर  ई-फ्लिपिंग बुक नागरिकांकरिता विनामूल्य उपलब्ध   अलिबाग, दि.31 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  “ समग्र रायगड ”  या कॉफी टेबल बुकच्या ई-बुक चे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपन्न झाले. आजपासून हे कॉफी टेबल बुक नागरिकांकरिता  https://raigad.gov.in/ samagraraigad/  येथे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावेळी आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. हे कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मीडिया आर अँड डी चे श्री.दिलीप कवळी यांचे विशेष सहकार्य लाभले असून कॉफी टेबल बुकचे ई- फ्लिपींग बुक तयार करण्याकरि

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केले अभिवादन

Image
अलिबाग, दि.31 (जिमाका):-  भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी हे उपस्थित होते. 00000

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित “राष्ट्रीय एकता दौड”ला उस्फूर्त प्रतिसाद

Image
  अलिबाग, दि.31 (जिमाका):-  देशाचे पहिले गृहमंत्री   लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे  “ राष्ट्रीय एकता दौड ” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ, अलिबाग तहसिलदार मीनल दळवी,  जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.सुहास व्हनमाने, क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे , प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, यतीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या एकता दौडचा समारोप अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आला. यावेळी जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग, पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यासह विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी व कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. 00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन

  इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत   अलिबाग, दि.31 (जिमाका):-  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पुणे, नगर, नाशिक इत्यादी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, प्रगतशिल शेतकरी, कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी ठिकाणी शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन महाड उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. तरी महाड, पोलादपूर, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील प्राधान्याने महिला शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सात दिवसात अर्ज करावे, असे आवाहन महाड उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी केले आहे. 00000