एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन

 

इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

 

अलिबाग, दि.31 (जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पुणे, नगर, नाशिक इत्यादी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, प्रगतशिल शेतकरी, कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी ठिकाणी शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन महाड उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

तरी महाड, पोलादपूर, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील प्राधान्याने महिला शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सात दिवसात अर्ज करावे, असे आवाहन महाड उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक