Posts

Showing posts from January 13, 2019

जिल्ह्यात मनाई आदेश जारी

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.19:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मंगळवार दि. 29 जानेवारी 2019 च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.   अपर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी हे आदेश निर्गमित केले असून आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 00000

अंतोरे ग्रा.पं.निवडणूक कार्यक्षेत्रात 6 फेब्रुवारी रोजी सुटी जाहीर

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.18:- राज्य निवडणूक आयोगाच्या  आदेशान्वये अंतोरे ता. पेण या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाला आहे. त्यानुसार 6 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेबुवारी रोजी मतमोजणी  होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक कार्यक्षेत्रात सुटी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अंतोरे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात बुधवार दि.6 फेब्रुवारी रोजी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाची निवडचाचणी परीक्षा 2 फ्रेब्रुवारी रोजी

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.18:- जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवडचाचणी परीक्षा शनिवार दि. 2 फेब्रुवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर या केंद्रावर घेण्यात येईल.या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट www.navodaya.gov.in   व   www.nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेऊन दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वा. परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख संतोष चिंचकर मो.9881351601 यांचेशी संपर्क साधावा असे प्राचार्य पि.के.नारायणन यांनी कळविले आहे. 00000

पनवेल येथे आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.17:- प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) नागपूर, रायगड जिल्हा परिषद शिक्षण   विभाग व सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी पनवेल जि.रायगड व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.18 ते रविवार दि.20 दरम्यान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यंदाचे हे आठवे विज्ञान प्रदर्शन आहे.         या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजता सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी, शेडयुंग, पनवेल येथे होणार आहे. या उद्घाटनास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण,   विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, माजी पालकमंत्री सुनिल तटकरे यांची उपस्थित राहणार आहे.   तरअध्यक्षस्थानी केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,    खा.श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत.   कार्यक्रमाच

‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत वडखळ येथे लाभ वाटप : योजनांचा लाभ पोहोचल्याने गावांचा विकास-पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- ‘आमचा गाव आमचा विकास’, च्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या   विविध योजनांतर्गत आरोग्य, शिक्षण व उपजिविका क्षेत्रासाठी लाभार्थ्यांना लाभ वाटप झाल्याने गावांचा विकास होत आहे, प्रतिपादन   राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी वडखळ ता. पेण येथे (दि.16 रोजी) केले.   वडखळ ग्रामपंचातीने राबविलेला हा विकासात्मक कार्यक्रम स्तुत्य असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.             वडखळ ग्रामपंचायतींमार्फत आयोजित या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचेआमदार प्रशांत ठाकूर, पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रितम पाटील, पेण तहसिलदार अजय पाटणे, वडखळ सरपंच राजेश मोकल, उपसरपंच रविंद्र म्हात्रे, पेण गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, गोरगरीब जनतेचा विकास व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजना वडखळ ग्रामपंचातीमार्फत

मतदार जागृती बाबत नोडल अधिकाऱ्यांची कार्यशाळा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मतदार केंद्रस्तरावर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत नोडल अधिकारी यांची मतदार जनजागृतीत भूमिका, मतदार जनजागृती कार्यक्रम, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयात भावी मतदार व नवीन मतदार यांच्यासाठी निवडणूक साक्षरता क्लब स्थापना करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान केंद्रस्तरावर ‘चुनाव पाठशाळा’ स्थापन केल्या असून त्या मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, संस्था इ. मध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्यात येत आहेत. या मतदार जागृतीमंच मध्ये त्या-त्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी हे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय निमशासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन झाले आहेत. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वै

गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 6 लाख 24 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि.15 जानेवारी) अखेर जिल्ह्यातील 6 लाख 24 हजार 889   बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.15) दिवसाअखेर जिल्ह्यातील 34 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 17 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 274 विद्यार्थ्यांना तर 17 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 3925 विद्यार्थ्यांना अशा एकूण 4 हजार 199 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 24   हजार 410 मुले   व 3 लाख 479 मुली असे एकूण 6 लाख 24 हजार 889 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5884 शाळांपर्यंत पोहोचली आहे.

केंद्रीयमंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते हे   दि.18 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.18 रोजी दुपारी चार वा. माणगाव येथे आगमन.   सायंकाळी सहा वा. माणगाव येथून चिपळूण, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. रविवार दि. 20 रोजी रात्री एम.आय.डी.सी.महाड येथे आगमन व मुक्काम.   सोमवार दि. 21 रोजी सकाळी साडेनऊ वा. महाड एम.आय.डी.सी. येथून बोराज फाट ता.पोलादपूरकडे प्रयाण.   दुपारी दोन वा. बोराज फाट ता.पोलादपूर येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय कार्यशाळा ; लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ जीवनात बदल घडवतो- यावलकर

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- स्वतःचे घर हे जीवनात स्थैर्य निर्माण करते.केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात गटविकास अधिकारी व यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असते. या योजनांचा लाभ पोहोचवून तुम्ही लाभार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र सकारात्मक बदल घडवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभय यावलकर यांनी आज येथे केले.      येथील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत आवास योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध तांत्रिक, लेखाविषयक अडचणींबाबत कार्यान्वयन यंत्रणा असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी कोकण विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री.यावलकर बोलत होते. आवास सॉप्ट संदर्भातील तांत्रिक अडचणी, बांधकाम आणि लेखा विषयक बाबी संदर्भात पर्णकुटी,ओमकार फ्रेंड सर्कल पडवळवाडी वरसोली अलिबाग येथे ही   एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी कोकण विभाग उपआयुक्त भरत शेडगे, वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद कवळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यं

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   बुधवार दि.16 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- बुधवार दि.16 रोजी दुपारी पावणे चार वा. डोलवी येथे आगमन व श्री दत्तकृपा वाहन वाहतूक चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.   स्थळ : जे.एस.डब्ल्यू गोवा गेट डोलवी.   दु.चार वा.वडखळ ता.पेण ग्रुप ग्रामपंचायत येथे आगमन व ‘आमचा गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण व उपजिविका इत्यादी घटकांबाबतचे साहित्य वाटप कार्यक्रम.   स्थळ : ग्रुप ग्रामपंचायत वडखळ.   सायं. पाच वा. वडखळ येथून कर्जतकडे प्रयाण.   सायं.साडे सहा वा. कर्जत नगर परिषद निवडणूकी संदर्भातील भाजपा कार्यकर्ता आढावा बैठक व मार्गदर्शन.   रात्री साडेआठ वा. कर्जत येथून   पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण. 00000

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महामार्गाच्या कामाची पाहणी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- राष्ट्रीय महामार्ग क्र.66 अर्थात मुंबई-गोवा महामार्गाच्या सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामाची पळस्पे ते काराव दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज पाहणी केली. आजदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉ.सुर्यवंशी यांनी पळस्पे ता.पनवेल येथून पाहणीस प्रारंभ केला.    यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्री.अग्रवाल, पेण तहसिलदार अजय पाटणे तसेच अन्य   अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   सदर महामार्ग कामाची विविध टप्प्यांवर असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेले अडथळे तात्काळ दूर करावे, असे निर्देश डॉ.सुर्यवंशी यांनी संबंधिताना दिले.   तसेच जेथे जेथे काम करण्यात अडथळे निर्माण होत आहेत अशा सर्व स्थळांना डॉ.सुयवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली.   पळस्पे ता.पनवेल येथून पाहणी करत करत ता.पेण पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. 00000

तटरक्षक तलातर्फे मच्छिमार बांधवांचा मेळावा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- भारतीय तटरक्षक दलाच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवीमुंबई येथील भारतीय तटरक्षक दलाच्या सरोवर विहार या परिसरात मच्छिमार बांधवांचा मेळावा पार पडला.   यावेळी रायगड व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना सागरी सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले.   तसेच तटरक्षक दल व मच्छिमार बांधव यांच्यात मैत्रीपूर्ण व्हॉलीबाल सामनाही खेळण्यात आला.   याप्रसंगी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक विवेक वाजपेयी, महाराष्ट्र समादेशक मुकूल गर्ग यांची विशेष उपस्थिती होती.             या स्नेह मेळाव्यात करंजा, उरण, मोरा, सानपाडा, वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली,बेलापूर,दिवाळे येथून मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.   तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी व मच्छिमार बांधवांनी परस्पर उदबोधन सत्रात समुद्रातील सुरक्षा उपायांबाबत चर्चा व मार्गदर्शन केले.   त्यात लाईफ जॅकेट, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र हाताळणीबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.   मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करताना शासनाने दिलेले बायोमॅट्रिक ओळखपत्र सोबत बाळगावे तसेच समुद्रातील संशयास्पद हालचालींबाबत त

अलिबाग-साळाव मार्गे अवजड वाहतूक बंद : रोहा-चणेरा मार्गे वाहतूक करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- साळाव,उसर,नागोठणे , थळ या अलिबाग तालुक्यातील गावांमधील औद्योगिक कारखान्यांद्वारे होणारी अवजड-अति अवजड वाहतूक ही रोहा मार्गे वळविण्याचे आदेश असून देखील या अति अवजड वाहनांची अलिबाग-रेवदंडा-चौल-वावे रस्त्यावरुन होत असते.   या रस्त्याची भारवाहन क्षमता ही अति अवजड वाहनांसाठी नाही. परिणामी या रस्त्याची हानी होत आहे. या वाहतुकीमुळे सहाण- पाल्हे बाह्यवळणावरील सहाण पाल्हे पूल क्षतिग्रस्त होण्याची शक्यता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांच्या अहवालात नमुद करण्यात आली आहे. त्यानुसार   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग-साळाव व साळाव-अलिबाग ही अति अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असून ही वाहतूक   राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन रोहा-चणेरा मार्गे करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.   00000

निवृत्तीवेतनधारकांचे माहिती अद्यावतीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:- शासकीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारक   यांना शासनाने सातवा वेतन आयोग मंजूर केला आहे.   तसेच निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांना त्यांच्या वयोमानानुसार वाढीव लाभ देण्यात येणार आहे.   त्यासाठी निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये सर्व वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांच्या जन्म   दिनांकाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.   वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय रायगड-अलिबाग किंवा आपल्या तालुक्यातील उप कोषागार कार्यालयामध्ये खालील नमूद जन्म तारीख असलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा तसेच आपला मोबाईल क्रमांक सादर करावा. आवश्यक कागदपत्र : जन्म तारखेची नोंद असल्यास आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्म तारखेचा दाखला, पारपत्र (Passport) सेवा पुस्तकाचे पृष्ठावर जन्म तारखेची नोंद आहे त्याची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, वय,राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality Domicificate) ज्यावर जन्म तारखेची नेांद आहे त्याची प्रत, वा