निवृत्तीवेतनधारकांचे माहिती अद्यावतीकरण




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:- शासकीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारक  यांना शासनाने सातवा वेतन आयोग मंजूर केला आहे.  तसेच निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांना त्यांच्या वयोमानानुसार वाढीव लाभ देण्यात येणार आहे.  त्यासाठी निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये सर्व वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांच्या जन्म  दिनांकाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.  वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय रायगड-अलिबाग किंवा आपल्या तालुक्यातील उप कोषागार कार्यालयामध्ये खालील नमूद जन्म तारीख असलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा तसेच आपला मोबाईल क्रमांक सादर करावा.
आवश्यक कागदपत्र : जन्म तारखेची नोंद असल्यास आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्म तारखेचा दाखला, पारपत्र (Passport) सेवा पुस्तकाचे पृष्ठावर जन्म तारखेची नोंद आहे त्याची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, वय,राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality Domicificate) ज्यावर जन्म तारखेची नेांद आहे त्याची प्रत, वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) इत्यादी कागदपत्रासह माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.फिरोज मुल्ला यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक