Posts

Showing posts from August 25, 2024

वातावरणीय बदल आणि जैवविविधता आधारित पध्दतींबाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.30:-   आगा खान एजन्सी फॉर हॅबीटेट, इंडिया ही संस्था वातावरणीय बदल आणि जैवविविधता आधारित पध्दतींबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य करत आहे. या संस्थेमार्फत रायगड जिल्हयामध्ये Climate Change Adaptation-Coastal Restoration Programm अलिबाग आणि मुरुड तालुक्यात राबवित आहे. या कार्यक्रमाबाबत जिल्हा ते ग्रामस्तरावरील विविध विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता जनजागृतीसाठी  सोमवार,दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा ते दु.3.00 वा. पर्यंत जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी दिली आहे. या कार्यशाळेस अलिबाग व मुरुड तालुक्यातील समुद्र व खाडी किनारी लगतच्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, संबंधित वन अधिकारी/कर्मचारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, कांदळवन कक्षातील अधिकारी/कर्मचारी, सहाय्यक आयुक्त, मत्स व्यवसाय अधिकारी, मच्छिमारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी, सागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक इ. अधिकारी/कर्मचारी व प्रतिनिधी य

गणेशोत्सव-2024 रायगड जिल्हा शांतता समिती बैठक सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्ह्यात 1 लाख 3 हजार 24 खासगी तर 273 सार्वजनिक मंडळाचे गणपती गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क

Image
    रायगड(जिमाका)दि.30:- जिल्ह्यात दि.07 सप्टेंबर पासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 03  हजार 24 खासगी तर 273 सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत. कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहनांची वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. गणेशोत्सव-2024 शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक गृह विभाग पांडूरंग गोपणे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सा.बा.वि.अलिबाग जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार