Posts

Showing posts from August 7, 2022

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2022-23 चा लाभ घ्यावा

    अलिबाग, दि.11 (जिमाका):- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इ. 01 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णय क्र. पपका-2007/270/07 असक, दि.23 जुलै 2008 अन्वये राज्यातील अल्पसंख्यक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु झाली आहे. यावर्षी NSP 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि.20 जुलै 2022 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख- दि.30 सप्टेंबर 2022 तर शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख- दि.26 ऑक्टोबर 2022 ही आहे. अटी व शर्ती:- इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्या व सर्व

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेचे आयोजन माझा गणेशोत्सव…माझा मताधिकार..!

    अलिबाग, दि.11 (जिमाका):- दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने “ माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ” या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर “ माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ” या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आह

जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Image
अलिबाग, दि.09 (जिमाका):-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण या कार्यालयांतर्गत आदिवासी संघटनांनी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत आदिवासी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था/गटांना यांत्रिकी बोट व मत्स्यजाळी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, या योजनेंतर्गत एकूण 10 गटांना प्रति गट रक्कम रुपये 3 लाख 50 हजार अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 8 गटांना 60 टक्के रक्कम प्रति गट रुपये 2 लाख 10 हजार याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामधून 8 गटांनी यांत्रिकी बोट खरेदी केलेली असून त्याचे वितरण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या हस्ते व अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मत्स्य बोट वितरण करताना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सर्व आदिवासी बांधवांना देण्यात आली. तसेच आदिवासी बांधवांना उद्योग व व्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले व त्याकरिता प्रकल्प कार्यालय सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी यावेळी उपस्थितांना दिले. 00000

“महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता” यात्रेचे आयोजन

Image
  अलिबाग, दि.09 (जिमाका):-  राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत  “ महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्टअप धोरण 2018 ”  जाहीर करण्यात आले आहे. नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता, तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यात "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या प्रतिभागींपैकी प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. तसेच सर्वोत्तम 10 (अव्वल 3 विज

पेण येथे राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग सेमिनार संपन्न

Image
अलिबाग, दि.09 (जिमाका):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या  “ घरोघरी तिरंगा ”  अभियानांतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक,पुणे, नंदुरबार व रायगड येथून जवळजवळ 42 जणांनी सहभाग घेतला. या सेमिनार द्वारे  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”  चा संदेश देण्यात आला. या सेमिनारचे उद्घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंदार पनवेलकर यांनी केले. या सेमिनार मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग चे अध्यक्ष श्री.सुरेश कोळी, श्री.सागर कोळी, श्री.संदीप माने यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक तसेच पेण तालुका क्रीडा अधिकारी सौ.अंकिता मयेकर यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. हे संपूर्ण सेमिनार रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हसळा तालुक्यात मोटारसायकल रॅली संपन्न

Image
200 मोटारसायकलस्वारांनी दिला  “ घरोघरी तिरंगा ”  चा नारा   अलिबाग, दि.09 (जिमाका):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात  “ घरोघरी तिरंगा ”  अभियान राबविण्यात येत असून, त्याचा एक भाग म्हणून श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी श्री.अमित शेडगे यांच्या संकल्पनेतून आज सकाळी 8.30 वाजता म्हसळा तहसिलदार कार्यालय येथे क्रांतीवीरांना अभिवादन करुन मोटारसायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मांदाट, पाष्टी खानगाव, कमावर, अवित, कॉझरी, तळवडे, आडीमहाडखाडी, केल्टे, घुम, भापट, गॉडघर, मैदडी, खरसई, वरवठणे, बनोटी, पाभरे, चारळ, देवघर, सकलप व म्हसळा शहराच्या परिसरातील एकूण 200 मोटारसायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. या मोटारसायकल रॅलीला अंजुमन हायस्कूल येथे म्हसळा तहसिलदार श्री. समीर घारे यांनी संबोधित करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्याबाबत आवाहन केले. तसेच सर्व मोटारसायकलस्वारांनी प्रत्येक गावामध्ये  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”  अभियानाबाबत संदेश पाठवावा, असे आवाहन करुन संविधान उद्देशिकेचे वाचन क