स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हसळा तालुक्यात मोटारसायकल रॅली संपन्न

200 मोटारसायकलस्वारांनी दिला घरोघरी तिरंगा” चा नारा


 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत असून, त्याचा एक भाग म्हणून श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी श्री.अमित शेडगे यांच्या संकल्पनेतून आज सकाळी 8.30 वाजता म्हसळा तहसिलदार कार्यालय येथे क्रांतीवीरांना अभिवादन करुन मोटारसायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

यामध्ये मांदाट, पाष्टी खानगाव, कमावर, अवित, कॉझरी, तळवडे, आडीमहाडखाडी, केल्टे, घुम, भापट, गॉडघर, मैदडी, खरसई, वरवठणे, बनोटी, पाभरे, चारळ, देवघर, सकलप व म्हसळा शहराच्या परिसरातील एकूण 200 मोटारसायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. या मोटारसायकल रॅलीला अंजुमन हायस्कूल येथे म्हसळा तहसिलदार श्री. समीर घारे यांनी संबोधित करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्याबाबत आवाहन केले. तसेच सर्व मोटारसायकलस्वारांनी प्रत्येक गावामध्ये हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाबाबत संदेश पाठवावा, असे आवाहन करुन संविधान उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर म्हसळा शहरामध्ये अंजुमन हायस्कूल ते साई चेक पोस्ट पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या मोटारसायकल रॅलीमध्ये तहसिलदार समीर घारे, गटविकास अधिकारी श्री.पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उध्दव सुर्वे, निवासी नायब तहसिलदार श्री.गणेश तेलंगे, महसूल नायब तहसिलदार श्री.धर्मराज पाटील, नगरसेवक श्री.संजय कणिक, श्री.संजय दिवेकर, मांदाटणे सरपंच श्री.चंद्रकांत पवार, चिखलप सरपंच श्री.अनिल जोशी, केल्टे सरपंच श्री.गणेश बोले, बारळ सरपंच श्री.रमेश खोत, खरसई सरपंच श्री.निलेश मांदाडकर, रेवळी सरपंच श्री.अनंत कांबळे, श्री.रियाज फकीह, श्री.शेखर खोत, म्हसळा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. बाबू शिके तसेच म्हसळा तालुक्यातील शिक्षक, तहसिलदार व इतर कार्यालयातील / अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक