Posts

Showing posts from September 1, 2019

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 126 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 126.20 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 4136.16 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 125.00 मि.मि., पेण-105.00 मि.मि., मुरुड-94.00 मि.मि., पनवेल-188.04 मि.मि., उरण-103.00 मि.मि., कर्जत-151.04 मि.मि., खालापूर-102.00 मि.मि., माणगांव-110.00 मि.मि., रोहा-158.00 मि.मि., सुधागड-138.00 मि.मि., तळा-147.00 मि.मि., महाड-56.00मि.मि., पोलादपूर-140.00, म्हसळा-99.00मि.मि., श्रीवर्धन-100.00 मि.मि., माथेरान-203.04 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2019.12 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 126.20 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   131.61 टक्के इतकी आहे. 0000

आगामी विधानसभा निवडणूक तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- आगामी विधानसभा निवडणूक 2019 तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहायक निवडणूक अधिकारी तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रोसेंटर-1 पनवेल, जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर-1 उरण अश्विनी पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पाडूरंग शेळके,   आदी सर्व अधिकारी, तहसिलदार व निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकारी उपस्थित होते.   यावेळी मतदार यादी अद्यावतीकरण, तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयक कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. 00000

रायगड जिल्हा मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी ऑनलाईन फॉर्म भरण्यास 10 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत

अलिबाग दि.04 सप्टेंबर :-   रायगड जिल्हा होमगार्ड अंतर्गत पथक,उपपथका मधील पुरुष, महिला होमगार्ड सदस्य नोंदणी दि.16 व 17 सप्टेंबर 2019 रोजी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे सकाळी 7.00 पासून घेण्यात येणार आहे. नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि.10 सप्टेंबर पर्यंत ( https://dnyanjyotisatara.in/hgmaha/login 1 php ) या संकेत स्थळावर जाऊन HGS ENROLLMENT मधील ONLINE ENROLLMENT FORM   मध्ये ऑनलाईन फॉर्म भरावे.   Print Registration Form   मध्ये जाऊन फॉर्मची प्रिंट काढून सदरची प्रिंट मूळ कागदपत्रांसह व त्यांच्या छायांकित प्रतिसह रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय अलिबाग येथे कवायत मैदानावर   अलिबाग, पेण,रोहा, खालापूर (चौक), मुरुड तालुक्यातील उमेदवारांनी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी   सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित रहावे.   तर महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, सुधागड-पाली तालुक्यातील उमेदवारांनी   मंगळवार दि.17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित रहावे. होमगार्ड नोंदणीकरिता पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण.   वयोमर्यादा 20 त

पेण तालुक्यातील नामदेव महादेव पाटील व इतर यांच्या उपोषणाबाबत

अलिबाग दि.04 सप्टेंबर :- पेण तालुक्यातील नामदेव महादेव पाटील व इतर रा.खरोशी यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे निफाड व मौजे खरोशी येथील जमिनीच्या 7/12 मध्ये झालेल्या बदलांबाबत   कार्यवाही करण्यासाठी दि.13/08/2019 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.   या कारणासाठी उपोषण करण्याची नोटीस दिल्यानंतर जिल्हाधिकारी रायगड यांनी अर्जदार नामदेव महादेव पाटील व इतर यांच्या अर्जानुसार सर्व कागदपत्रांची तपासणी केली आहे.   त्यानुसार वेळोवेळी उपोषण कर्ते यांच्याशी चर्चा केली असून त्यांना लेखी पत्राद्वारे देखील उत्तर देण्यात आले आहे.   नामदेव महादेव पाटील व इतर यांनी केलेल्या अर्जानुसार तपासणी केली असता सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे याबाबत सुनावणी सुरु आहे.   दि.24/09/2019   पर्यंत मा.उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्याने सद्यस्थितीत प्रकरणी कोणतीही कार्यवाही करता येत नाही.   ही वस्तुस्थिती उपोषण कर्ते यांना वारंवार समाजावून सांगितलेली आहे.             जिल्हा प्रशासनामार्फत उपोषण कर्ते यांचे अर्जानुसार वस्तुस्थितीचे अनुषंगाने मूळ दस्तांऐवजासह जिल्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 177 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 177.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 4009.96 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 117.00 मि.मि., पेण-135.00 मि.मि., मुरुड-185.00 मि.मि., पनवेल-140.00 मि.मि., उरण-230.00 मि.मि., कर्जत-155.00 मि.मि., खालापूर-268.00 मि.मि., माणगांव-260.00 मि.मि., रोहा-257.00 मि.मि., सुधागड-142.00 मि.मि., तळा-175.00 मि.मि., महाड-91.00मि.मि., पोलादपूर-114.00, म्हसळा-180.00मि.मि., श्रीवर्धन-140.00 मि.मि., माथेरान-254.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2843.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 177.69 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   127.60 टक्के इतकी आहे. 0000

येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    येत्या 48 तासात जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असून मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोलसमुद्रात जाऊ नये, सर्व विभाग, दरडग्रस्त व नदी काठावरील भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 0000