जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 177 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 177.69 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 4009.96 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 117.00 मि.मि.,
पेण-135.00 मि.मि., मुरुड-185.00 मि.मि., पनवेल-140.00 मि.मि., उरण-230.00 मि.मि.,
कर्जत-155.00 मि.मि., खालापूर-268.00 मि.मि., माणगांव-260.00 मि.मि., रोहा-257.00 मि.मि.,
सुधागड-142.00 मि.मि., तळा-175.00 मि.मि., महाड-91.00मि.मि., पोलादपूर-114.00, म्हसळा-180.00मि.मि.,
श्रीवर्धन-140.00 मि.मि., माथेरान-254.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2843.00
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 177.69 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 127.60 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment