Posts

Showing posts from January 7, 2018

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 12:- जिजाऊ माँ साहेब  व स्वामी विवेकानंद यांच्या  जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.              यावेळी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उप जिल्हाधिकारी (सा.प्र.)श्रीधर बोधे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच जिल्हा माहिती व सूचना अधिकारी चिंतामणी मिश्रा तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ वेटकोळी व जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 00000 

हातमाग निर्मिती प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 12:- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग संचालक,हातमाग संस्था, पुणे येथे हातकागद निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी सन 2017-18या आर्थिक वर्षामध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात  आलेले आहे. इयत्ता आठवी,एस.एस.सी.एच.एस.सी. पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या किंवा ज्यांना प्रशिक्षण करण्याची इच्छा असलेल्या व 18 ते 45 वयोगटांतील इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व अन्य दाखल्यांसह संचालक, हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर,पुणे- 411005, फोन नं.020-25538838 या पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड अलिबाग यांनी केले आहे.  00000

अलिबाग तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पायाभूत प्रशिक्षणा अंतर्गत आज अलिबाग तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तहसिल कार्यालयाच्या कुलाबा सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. यशदा या संस्थेच्यावतीने रामेती खोपोली या संस्थेने हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अलिबाग सर्जेराव सोनावणे, नायब तहसिलदार संदिप पानमंद, संस्थेच प्राचार्य पी.डी.सिगेदार आदि मान्यवर उपस्थित होते. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये  कार्यक्षमता आणून व गतिमान प्रशासन करण्याकरीता सर्वांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. 23 सप्टेंबर, 2011 नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना पायाभूत प्रशिक्षण दिले जाते तर त्यापूर्वीच्या कर्मचाऱ्यांना उजळणी प्रशिक्षण दिले जाते. गरजांवर आधारीत निरंतर प्रशिक्षण देण्यात येते.   महाराष्ट्र राज्याचा प्रशिक्षण धोरणानुसार राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था तथा प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती खोपोली य

राज्यपालांचे आगमन व स्वागत

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 च्या समारोप समारंभासाठी मा.राज्यपाल सी.विद्यासागर यांचे खांदेश्वर नवी मुंबई हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पनवेल महानगर पालिका आयुकत सुधाकर शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. 00000

30 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप नवी आव्हाने पेलण्यासाठी पोलिसांनी अधिक स्मार्ट होणे आवश्यक -राज्यपाल सी. विद्यासागर राव

Image
                अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे सामाजिक सलोख्याला धोका होऊन निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अधिक स्मार्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांना सोशल मिडीयासंदर्भात अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन अद्यावत करणे आवश्यक आहे. तरच आपले राज्य सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राखून प्रगतित पुन्हा अग्रेसर राहिल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे  केले. राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांच्या समारोपप्रसंगी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी श्री. विद्यासागर येथे उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.             नवी मुंबई येथील सिडको क्रीडा मैदानावर आयोजित कार्यक्रमास राज्याचे पोलीस महासंचालक संजय बर्वे, अपर मुख्य सचिव गृह सुधीर श्रीवास्तव, अपर महासंचालक प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज,  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. विद्यासागर यांनी पोलीस दलाचे व खेळाडूंचे अभिनंदन व कौतूक

परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 11:- ना.दिवाकर रावते, परिवहन मंत्री, खारभूमी विकास हे शुक्रवार दि.12 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा  जिल्हा दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शासकीय निवासस्थान मेघदूत येथून शासकीय मोटारीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. सकाळी आठ वाजता गेट ऑफ इंडिया येथून स्पीड बोटने मांडवा, अलिबागकडे प्रयाण. साडे आठ वाजता मांडवा अलिबाग येथे आगमन व महर्षी विनोद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ:दि.बा.पाटील महाविद्यालय, अलिबाग). सकाळी अकरा वाजता मांडवा अलिबाग येथून स्पीड बोटने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. साडे अकरा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय निवासस्थान मेघदूत कडे प्रयाण. 00000

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित अर्ज 15 पर्यंत निकाली काढण्याच्या सुचना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 11:- भारत सरकारतर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण परिक्षा फि दिली जाते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांतील प्रलंबित अर्ज येत्या सोमवार दि.15 पर्यंत निकाली काढावयाचे आहेत. या संदर्भात समाज कल्याण आयुक्त, पुणे यांनी 9 जानेवारी 2018 रोजी परिपत्रकाद्वारे सुचना निर्गमित केल्या आहेत. तरी महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी दि.15 पर्यंत अर्ज मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच महाविद्यालयाकडील प्रलंबित पात्र विद्यार्थी हे शिष्यवृत्ती तसेच शिक्षण  व परिक्षा फी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची राहील. तरी 2015-16 व 2017-18 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत,असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 0000

डॉ.वर्तक यांना मत्स्योद्योगभूषण पुरस्कार

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या खार जमीन संशोधन केंद्राचे मत्सशास्त्रज्ञ डॉ.विवेक रोहिदास वर्तक यांना  मत्स्योद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विकास प्रतिष्ठान तर्फे वाशी येथे आयोजीत ग्लोबल कोकण महोत्सवात या महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त गोविंद बोडके,कोकण विकास प्रतिष्ठानचे संचालक संजय यादवराव, श्री.धारीया तसेच मत्स्य शेतकरी उपस्थित होते. डॉ.वर्तक यांनी मत्स्यव्यवसाय विषयक संशोधन करुन ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत प्रशिक्षणांच्या माध्यमातून यशस्वीपणे पोहचविण्याचे मत्स्यविषयक कौशल्य विकासाचे कार्य केल्याबद्दल  त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. वर्तक यांनी आपल्या यशामध्ये या पुरस्काराचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.तपस भट्टाचार्य, संधोधन संचालक डॉ.हळदणकर,विस्तार शिक्षण संचालक डॉ.भावे व खार जमीन शास्त्रज्ञ डॉ.दोडके यांचे असून हा संपूर्ण संशोधन केंद्राचा गौरव आहे असेही त्यांनी यावेळी  सांगितले. ०००००

इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ

            कोकण विभागातील इतर मागासवर्गीय समाज घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी, म्हणून शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे, हे महामंडळ खालीलप्रमाणे कर्ज योजना राबवित असते. रु.25 हजार पर्यंतची थेट कर्ज योजना-             उद्देश :- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला व पुरुष लाभार्थींना रु.25 हजार पर्यंतचे थेट कर्ज किरकोळ व छोट्या व्यवसायाकरीता उपलब्ध करुन देणे. बँकेमार्फत कर्ज मंजूर करतांना येणाऱ्या अडचणी व कर्ज वितरणास होणारा विलंब टाळणे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीबातील गरीब व अत्यंत गरजू व्यक्तींपर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ पोहोचविणे.             कर्जाची उत्तम मर्यादा :- रु.25 हजार लाभार्थींचा सहभाग व प्रशासकीय शुल्क भरावयाची आवश्यकता नाही.             व्याज दर :- द.सा.द.शे. 2 टक्के दराने व्याज.             कर्जाची पर

जिल्ह्यात मनाई आदेश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि. 24 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांना लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. 000000

डॉ.वर्तक यांना मत्स्योद्योगभूषण पुरस्कार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या खार जमीन संशोधन केंद्राचे मत्सशास्त्रज्ञ डॉ.विवेक रोहिदास वर्तक यांना  मत्स्योद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विकास प्रतिष्ठान तर्फे वाशी येथे आयोजीत ग्लोबल कोकण महोत्सवात या महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त गोविंद बोडके,कोकण विकास प्रतिष्ठानचे संचालक संजय यादवराव, श्री.धारीया तसेच मत्स्य शेतकरी उपस्थित होते. डॉ.वर्तक यांनी मत्स्यव्यवसाय विषयक संशोधन करुन ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत प्रशिक्षणांच्या माध्यमातून यशस्वीपणे पोहचविण्याचे मत्स्यविषयक कौशल्य विकासाचे कार्य केल्याबद्दल  त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. वर्तक यांनी आपल्या यशामध्ये या पुरस्काराचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.तपस भट्टाचार्य, संधोधन संचालक डॉ.हळदणकर,विस्तार शिक्षण संचालक डॉ.भावे व खार जमीन शास्त्रज्ञ डॉ.दोडके यांचे असून हा संपूर्ण संशोधन केंद्राचा गौरव आहे असेही त्यांनी यावेळी  सांगितले. ०००००

अपंग निवृत्तीवेतन व कुटूंबलाभ योजनेचा लाभ घ्या मुरुड तहसिलदारांचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10:- संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत शासनातर्फे इंदीरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना  राबविण्यात येतात. या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन  मुरुड तहसिलदार यांनी केले आहे. या योजनांची माहिती पुढील प्रमाणे- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना-             दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील 80 टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहूअपंगत्व (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व) असलेले लाभार्थी या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रक्कम 200 रुपये व राज्य शासनाकडून 400 रुपये असे एकूण 600 रुपये  प्रति महिना  निवृत्तीवेतन मिळेल. अशा लाभार्थ्यांनी त्वरीत तहसिल कार्यालय मुरुड अथवा संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा. निकष आणि अटी- वय 18 ते 65 वर्षाखालील अपंग., कुटूंबाचे उत्पन्न - कुटूंबाचे नाव ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट् असावे. आर्थिक सहाय्य,निवृत्ती वेतन- प्रतीमहा प्रती लाभार्थी रु.सह

जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना :सुशिक्षित बेरोजगारांना उत्खनन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य जिल्ह्यातून निवडणार 15 लाभार्थी; प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- राज्यातील जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना  दि.2 जानेवारी 2018 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून 15 लाभार्थ्यांची निवड करावयाची असून त्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये, राज्यात जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद  संधारणची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण,शेतकरी उत्पादन संस्था,नोंदणीकृत शेतकरी गटास, बेरोजगाराच्या सहकारी संस्था,विविध कार्यकारी संस्था यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्र सामुग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात  येणार आहे. आणि कर्जावरील व्याजाचे दायित्व  शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत राहील.             या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी 15 लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे.   ज्या लाभार्थ्यांकड

कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव डॉ. के.पी.क्रिष्णन यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव डॉ. के.पी.क्रिश्न्न, हे शनिवार दि.13 रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.13 रोजी सकाळी साडेदहा वाजता कर्जत येथे आगमन व साडे बारा वाजेपर्यंत आयटीआय कर्जत येथे भेट.मुक्काम कर्जत. ०००००

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शुक्रवार दि. 12 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.12 रोजी दुपारी साडे बारा वाजता हॉटेल गोविंद कामथ, नागोठणे जि.रायगड येथे आगमन. दुपारी तीन वाजता नागोठणे जि.रायगड येथून दापोलीकडे प्रयाण. ०००००

राज्यपाल विद्यासागर राव यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10:-  राज्याचे राज्यपाल श्री.विद्यासागर राव हे गुरुवार दि.11 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.11रोजी दुपारी सव्वा चार वा. खांदेश्वर हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन व मोटारीने पोलीस मुख्यालय नवी मुंबई, कळंबोलीकडे प्रयाण. दुपारी 4 वा 25 मि. नी पोलिस मुख्यालय, नवी मुंबई कळंबोली येथे आगमन व राखीव. दुपारी साडेचार वा. 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 च्या समारोप समारंभास उपस्थिती. कार्यक्रमानंतर मुंबईकडे रवाना. ०००००

30 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ उत्तम कायदा सुव्यवस्थेमुळे राज्यात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगार -मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

Image
                नवी मुंबई , दि. 9 :  महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे राज्य आहे. राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस दलाने राखलेली उत्तम कायदा व सुव्यवस्था होय, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे कौतूक केले. राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ना. फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथे करण्यात आले.  त्याप्रसंगी ते बोलत होते.             नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मधील ॲम्फि थिएटर मध्ये आयोजित कार्यक्रमास राज्याचे गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर,  आ. मंदाताई म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर,अपर मुख्य सचिव गृह सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतिश माथूर, अपर महासंचालक प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज,  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या संबोधनात उत्तम क्रीडा स्पर्धा आयोजनाबद्दल कौतूक करुन  ना. फडणवीस म्हणाले की, पोलीस हे अत्यंत तणावात

तटरक्षक दलातर्फे मच्छिमार बांधवांना सुरक्षेचे धडे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 8:-  भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनादिनानिमित्त रायगड व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना एका मेळाव्याचे आयोजन करुन सुरक्षविषयक मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त नवी मुंबई येथील  सरोवर विहार, सीबीडी बेलापूर येथे  मच्छिमारांचा मेळावा आयोजित  करण्यात आला. या मेळाव्यास  तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक विवेक वाजपेयी यांची उपस्थिती होती. यावेळी  तटरक्षक दल महाराष्ट्राचे  समादेशक मुकूल गर्ग,  कमांडंट आर. के. श्रीवास्तव, मच्छिमार संघटानांचे प्रतिनिधी  शिवदास नाखवा, हरिश्चंद्र  सुतार  आदी मान्यवर उपस्थित होते. तटरक्षक दलाच्या सामाजिक सहभागिता उपक्रमांचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  करंजा, उरण, मोरा, सानपाडा, वाशी, घनसोली, कोपरखैरणे, ऐरोली,  बेलापूर, दिवाळे या गावातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तटरक्षक दलाच्या वतीने मच्छिमारांना समुद्रात मोहिमेवर असतांना पाळावयाच्या सुरक्षानियम व उपाययोजनांची माहिती देण्यात आली. त्यात जहाजावर लाईफ जॅकेटचा वापर करणे. अग्निप्रतिबंधक उपकरणे व