अलिबाग तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पायाभूत प्रशिक्षणा अंतर्गत आज अलिबाग तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
तहसिल कार्यालयाच्या कुलाबा सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. यशदा या संस्थेच्यावतीने रामेती खोपोली या संस्थेने हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अलिबाग सर्जेराव सोनावणे, नायब तहसिलदार संदिप पानमंद, संस्थेच प्राचार्य पी.डी.सिगेदार आदि मान्यवर उपस्थित होते.

शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये  कार्यक्षमता आणून व गतिमान प्रशासन करण्याकरीता सर्वांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. 23 सप्टेंबर, 2011 नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना पायाभूत प्रशिक्षण दिले जाते तर त्यापूर्वीच्या कर्मचाऱ्यांना उजळणी प्रशिक्षण दिले जाते. गरजांवर आधारीत निरंतर प्रशिक्षण देण्यात येते.  
महाराष्ट्र राज्याचा प्रशिक्षण धोरणानुसार राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था तथा प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती खोपोली या संस्थेमध्ये वेगवेगळे प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या प्रशिक्षणास एकूण 75 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी यावेळी मार्गदर्शन संस्थेमार्फत विक्रम खोपडे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर या बाबतची सविस्तर  माहिती दिली.
सन 2015-16 पासून वर्ग-1, 2, 3 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भात 16 प्रशिक्षणे  घेण्यात आली. यामध्ये 1442 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले तर  2016-17 मध्ये वर्ग-3 साठी पायाभूत प्रशिक्षणाचे 150 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच  वर्ग-4 साठी पायाभूत प्रशिक्षणाचे 40 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.  2016-17 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत महसूल, ग्रामविकास व पशुसंवर्धन विभागाचे 14 प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यामध्ये 1200 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
2017-18 मध्ये रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 16 कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये 1770 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी  प्रशिक्षण कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षणार्थींचे स्वागत नायब तहसिलदार संदिप पानमंद यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे प्राचाय्र पी.डी.सिगेदार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती अर्चना नारनवर यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक