Posts

Showing posts from December 19, 2021

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):- राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-   रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1.55 वा. ठाणे निवासस्थानाकडून रेमंड हेलिपॅड ठाणे येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.00 वा. रेमंड हेलिपॅड ठाणे येथून हेलिकॉप्टरने सासवणे रेमंड हेलिपॅड अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड, ता.अलिबाग येथे आगमन. दुपारी 2.25 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड अलिबाग येथून थळ आर.सी.एफ., राजमाळा, ता.अलिबाग येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.40 वा. थळ आर.सी.एफ., राजमाळा, ता.अलिबाग येथे आगमन व आमदार महेंद्र दळवी यांचे सुपूत्र चि.अभिराज यांच्या हळदी समारंभास उपस्थिती. दुपारी 3.15 वा. थळ आर.सी.एफ.,राजमाळा, ता.अलिबाग येथून मोटारीने सासवणे रेमंड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड ठाण्याकडे प्रयाण. 00000

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य देणे हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) :   शासन निर्णयानुसार मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 4 आक्टोबर, 2021 च्या आदेशान्वाये सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाने महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून आधार क्रमांकाव्दारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. राज्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.   जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हयातील सर्व कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्यासाठी नातेवाईकांकडून अर्ज दाखल करणे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे इ.मार्गदर्शन करण्यासाठी गावापापतळीवरील आशा कार्यकर्तीमार्फत अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परि

चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) : दि.24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. शासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील दि.17 डिसेंबर, 2021 च्या आदेशानुसार या वर्षाचा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी केंद्र शासनाने Consumer Know Your Rights अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्यानुसार शासनाच्या विविध योजना व ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्यामधील हक्काचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज चित्ररथ व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या चित्ररथास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष रविंद्र नगरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उप नियंत्रक, वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड   व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या कार्यक्रमास तहसिलदार महसूल सचिन शेजाळ, तहसिलदार सर्वसाधारण विशाल दौंडकर, सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे,   सहा.आयुक्त, समाजकल्याण सुनिल जाधव,   रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01 जानेवारी 2022 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे सुरु होणा-या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणां तर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205   अश्वशक्तीचे इं जि न असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी दि. 01 जानेवारी 2022 ते दि.30 जून 2022 ( 6 महिने) आवश्यक   पात्रता- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मा

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यातील युवतींकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण व प्रात्यक्षिके कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका) :-  आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रायगड अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग येथे (दि.22 डिसेंबर 2021) रोजी जिल्ह्यातील युवतींकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण व प्रात्यक्षिके कार्यक्रम संपन्न झाला.             या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.  जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक युवतींशी संवाद साधताना म्हणाले की, प्रत्येक गोष्टी करताना स्वतःला सिद्ध करणे म्हणजे स्वयंसिद्धा, वैयक्तिक स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचे असते.  सध्या युवा पिढीचे फिजिकल, सायकॉलॉजिकल, सोशल, इमोशनल डेव्हलपमेंट होणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक युवतीला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. याकरिता जिल्हा क्रीडा कार्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी ना

ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोना व ओमिक्रॉन व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):-   ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची वाढती संख्या व करोना व ओमिक्रॉन व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत. विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर सक्त दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हॉटेल, कॉटेजेस, व्यापारी व परिवहन क्षेत्रात कार्यरत सर्व संघटनांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन कोव्हिड-19 साथरोगाबाबत शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे पालन करण्याबाबत सूचना तहसिलदार अलिबाग श्रीम. मीनल दळवी यांनी दिल्या आहेत.  या आदेशांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापना यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी या साथरोगापसून संरक्षण करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे इ. कोव्हिड अनुरुप आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):-   नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त पदाची पोटनिवडणूक मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.06 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आली होती. या स्थगित करण्यात आलेल्या निवडणूका संदर्भातील कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दि.17 डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये जाहीर केला आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या पदासाठीची पोटनिवडणूक दि.18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेला अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ- मंगळवार, दि.28 डिसेंबर 2021 ते सोमवार, दि.3 जानेवारी 2022 (दि.01/01/2022 व दि.02/01/2022 या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून), वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ- मंगळवार, दि.4 जानेवारी 2022, वेळ सकाळी 11.00 पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि. दि.6 जानेवा

ई-श्रम'पोर्टलवर असंघटीत कामगारांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त श्री.पवार यांचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):-  असंघटीत कामगारांचा राष्ट्रीयस्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्रशासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले असून नागरी सुविधा केंद्रामार्फत नोंदणींचे कामकाज जिल्ह्यात करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2021 पासून नोंदणीचे कामकाज करण्यात आले असून आत्तापर्यंत 42 हजार 830  असंघटीत कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली अशा असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त, रायगड श्री.प्र.ना. पवार यांनी केले आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.32 डिसेंबर 2021 पर्यंत असंघटीत कामगारांची नोंदणी करण्याबाबतचे निर्देश दिले असून असंघटीत क्षेत्रातील उदा.स्वयंरोजगार, फळ-भाजी विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, शेतमजूर, फेरीवाले, पशुसंवर्धन, मध गोळा करणे, मीठागरावरील कामगार, कुकुटपालन, मत्स्य प्रक्रिया व मच्छीमार, बांधकाम मजूर, विटभट्टी कामगार, मातीकाम कामगार, वाळु माती उपसा कामगा

जिल्ह्यातील बांधकाम व असंघटित कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर व कामगार उपायुक्त श्री.पवार यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यातील असंघटित कामगार वर्गाची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची विशेष मोहीम सुरू आहे, तरी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी  www.mahabocw.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करावी तसेच असंघटित कामगारांनी जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्र/वैयक्तिक स्वरुपात  URL-eshram.gov.in  या संकेतस्थळावर ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त, रायगड श्री.प्र.ना. पवार यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मु. पाली आंबेवाडी, पो. गोळवाडी या दुर्गम गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने कामगार उप आयुक्त, रायगड-पनवेल कार्यालयामार्फत विशेष मोहीमही नुकतीच राबविण्यात आली.  या मोहिमेंतर्गत ज्या वीटभट्टी कामगारांनी अद्याप इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नाही, अशा कामगारांना नो

जिल्ह्यातील बांधकाम व असंघटीत कामगारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे कामगार उप आयुक्त प्र.ना. पवार यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील मु. पाली आंबेवाडी, पो. गोळवाडी या दुर्गम गावातील विटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने कामगार उप आयुक्त रायगड-पनवेल कार्यालयामार्फत विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ज्या विटभट्टी कामगारांनी अद्याप इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नाही, अशा कामगारांना नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करुन मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्याच बरोबर 78 नोंदीत कामगारांची मंडळाच्या माध्यमातून 'एचएलएल' संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना अत्यावश्यक संचामधील सोलर टॉर्च, मॉस्कीटो नेट, प्लॅस्टिक मॅट, टिफीन, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, गॅल्वनाइज टंक तसेच राज, हेअरींग प्रोटेक्शन, सेफ्टी हेल्मेट, मास्क, सेफ्टी हॅन्डग्लॉज, सेफ्टी हानेंस, रिफलेक्टर जॅकेट इत्यादीचे वाटप करण्यात आले. तसेच या विशेष