ई-श्रम'पोर्टलवर असंघटीत कामगारांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त श्री.पवार यांचे आवाहन


 

अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- असंघटीत कामगारांचा राष्ट्रीयस्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्रशासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले असून नागरी सुविधा केंद्रामार्फत नोंदणींचे कामकाज जिल्ह्यात करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2021 पासून नोंदणीचे कामकाज करण्यात आले असून आत्तापर्यंत 42 हजार 830  असंघटीत कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली अशा असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त, रायगड श्री.प्र.ना. पवार यांनी केले आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.32 डिसेंबर 2021 पर्यंत असंघटीत कामगारांची नोंदणी करण्याबाबतचे निर्देश दिले असून असंघटीत क्षेत्रातील उदा.स्वयंरोजगार, फळ-भाजी विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, शेतमजूर, फेरीवाले, पशुसंवर्धन, मध गोळा करणे, मीठागरावरील कामगार, कुकुटपालन, मत्स्य प्रक्रिया व मच्छीमार, बांधकाम मजूर, विटभट्टी कामगार, मातीकाम कामगार, वाळु माती उपसा कामगार, बांधकाम रंगकाम, पीओपी कामगार, केबल टीव्ही व्यवसायिक, पथनाट्य कामगार विमा एजंट, बँक एजंट, पत्रकार, बचतगट, किरणा दुकानदार, दुधवाले, पानवाले, आशा-अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, धोबी, काथ्या प्रक्रिया, खाणकामावरील मजूर, भात गिरणी , कचरा गोळा करणार, सफाई कामगार, बोट/नावेचा व्यवसाय, डिलीव्हरी बॉय, कुरियर सेवा, बस/कार/ट्रक चालक अशा विविध 300 उद्योगांमध्ये काम करणारे कामगार स्वतः अथवा नागरी सुविधा केंद्रामार्फत आपली नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करु शकतात. नोंदणीकरिता कोणतेही शुल्क नसून ज्या असंघटीत कामगारांचे वय 16 ते 59 वर्षाच्या दरम्यान आहे, अशी व्यक्ती आपली नोंदणी करु शकतात. त्याकरिता आधारकार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल क्रमांक (स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा) इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. असंघटीत कामगार आपली नोंदणी ई-श्रम पोर्टल URL-eshram.gov.in याद्वारे करु शकतात.

नोंदणी करण्याबाबत या कार्यालयाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नागरी सुविधा केंद्रामार्फतही कँपचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांनी आपली नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करावी असे आवाहन कामगार उप आयुक्त प्र.ना. पवार,रायगड-पनवेल यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक