Posts

Showing posts from May 22, 2022

रायगड जिल्हा प्रशासनाची “परिवर्तन” कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध

अलिबाग, दि.28 (जिमाका):-  रायगड जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 2) ही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून सर्व नागरिकांना  https://raigad.gov.in/en/ parivartanebook/  या लिंकवर वाचण्याकरिता विनामूल्य उपलब्ध आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी दि.01 मे 2022 रोजी संपन्न झाले. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीतील राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 1) ही कार्यपुस्तिकादेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर 24 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्यानंतर प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहन्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात  “ परिवर्तन ”  घडवून आणण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कामकाजास उत्साहाने सुरुवात केली. शेतकरी,

कोकण किनारपट्टीवरील 31 ऑगस्टपर्यंत वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद

  अलिबाग,  दि.28 (जिमाका): -   कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील समुद्रकिनाऱ्यांवर दि.26 मे 2022 पासून ते दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुरुड येथील जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान या बंदी कालावधीतही व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स   किंवा बोटिंग सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी येतात.   दरम्यान हा निर्णय मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेमुळे घेतलेला नसून मान्सून काळात दरवर्षीप्रमाणे करावयाची कार्यवाही आहे. पावसाळा तसेच समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे. 00000

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी; जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 890 लाभार्थ्यांनी केली नोंदणी

अलिबाग, दि.27 (जिमाका): - शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण रु.6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 1) जमीन धारण करणारी संस्था, 2) संविधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी/माजी व्यक्ती, 3) आजी/माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा/राज्यसभा आजी/माजी सदस्य, विधानसभा/ विधान परिषद आजी/माजी सदस्य, महानगरपालिकेचे आजी/माजी महापौर, जिल्हा परिषदेचे आजी/माजी अध्यक्ष, 4) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी/ कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्गातील कर्मचारी), 5) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, 6) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्गातील कर्मचारी

तहसिलदार आयुब तांबोळी आणि पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची केली पाहणी

Image
अलिबाग, दि.27 (जिमाका): - खालापूर तालुक्यातील अतिदूर्गम भागात असलेल्या दरडग्रस्त भागाची खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. दरवर्षी खालापूरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यावर्षी पाऊस पडण्यापूर्वी दरडग्रस्त भाग ताडवाडी (बोरगाव खुर्द) या भागाची पाहणी करून तहसिलदार आयुब तांबोळी व इतर अधिकाऱ्यांनी पोखरवाडी येथील बंधाऱ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा केली, तर आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी जागा प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर उपलब्ध होणाऱ्या सोयींबाबत चर्चा केली. यावेळी खालापूरचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, वावर्ले तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 30 मे रोजी साधणार अनाथ बालकांशी ऑनलाईन संवाद

Image
    अलिबाग, दि.27 (जिमाका): - प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत दि.30 मे 2022 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांना स्नेह प्रमाणपत्र व प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र देण्यात येणार असून विविध लाभांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत अनाथ बालकांसाठी विविध लाभ देण्यात येतात. या अंतर्गत प्रधानमंत्री श्री.मोदी हे सोमवार, दि.30 मे 2022 रोजी देशभरातील अनाथ बालकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हर्च्युअल पद्धतीने) संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होणार आहेत. या बालकांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे वितरण करण्यात येणार आहे. 00000

जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, गरीब कल्याण अन्न योजना, “एक देश एक रेशनकार्ड” योजनांची यशस्वी अंमलबजावणी

अलिबाग, दि.27 (जिमाका): - केंद्र शासनामार्फत सुरु असलेल्या योजनांबाबत पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे मंगळवार, दि.31 मे 2022 रोजी लाभार्थ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, एक देश एक रेशनकार्ड योजना, या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील सदस्यांना मोफत गॅस जोडणी देण्यात येते. त्यामुळे लाकूडतोड कमी होवून पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होईल. तसेच धूराचे प्रमाण कमी झाल्याने महिलांचे आरोग्य सुधारेल. या योजनेमध्ये आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातील 62 हजार 801 लाभार्थ्यांना मोफत गॅस जोडणी पुरविण्यात आलेली आहे. तसेच मार्च 2022 अखेर रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 570 इष्टांक होता. रायगड जिल्हयात एकूण 1 हजार 790 नवीन गॅस जोडणी देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यात 114% गॅस कनेक्शन पूर्ण झाले आह

प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी

Image
अलिबाग, दि.27 (जिमाका): - रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्यात योजनेच्या अनुदानातून 7 हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी 2 हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश घुले यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व आदिम जमाती घरकुल योजना या घरकुल योजना राबविण्यात येतात. यामधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमीहीन किंवा कच्चे घरात वास्तव्य करणाऱ्या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो. 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्याला 9 हजार 813 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामधील 9 हजार 675 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 7 हजार 333 घरकुले ब

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद

Image
  अलिबाग,  दि.27 (जिमाका): -  भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या वतीने देशभरात  “ आझादी का अमृतमहोत्सव ”  अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासकीय यंत्रणांनी लाभार्थींवर लक्ष केंद्रित करून कोणताही नागरिक मागे राहू नये यासाठी त्यांच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण करण्यात येत आहेत. यानुषंगाने दि.31 मे 2022 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे शिमला, हिमाचल प्रदेश येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हास्तरावर पंचायत राज संस्था (PRI), स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसह निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दि.31 मे 2022 रोजी पंतप्रधान श्री.मोदी यांच्या शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी राज्य व जिल्हा दूरदृष्यप्रणालीद्वारे (Online) जोडले जाणार असून या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, महापौर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, इतर लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे. पंतप्रधान श्री.मोदी यांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयो

कर्जत तहसिलदार कार्यालय व रक्षा सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे दि.28 मे रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन

  अलिबाग,  दि.26 (जिमाका): -   तहसिलदार कर्जत कार्यालय व कर्जत तालुका आणि परिसरात शोध आणि विमोचन कार्यामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यात सदैव अग्रेसर असलेली रक्षा सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वादळ, पूरपरिस्थिती उपाययोजना व प्राथमिक प्रथमोपचार अशा आपत्ती व्यवस्थापन विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगड जिल्हा व परिसरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती येऊन खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी व वित्तहानी झाली. कर्जत तालुक्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयावर सजग करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (NDRF) देण्यात येणार आहे. शनिवार, दि.28 मे 2022 रोजी हे कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रशिक्षणात सहभागी होऊन आपत्ती व्यवस्थापन कार्यात अग्रेसर कार्य करावे. अधिक माहितीसाठी रक्षा सामाजिक विकास मंडळ 9421008778, 02148223704 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी  https://forms.gle/ 3aVPf9Ua863bG3gt5  या लिंकवर क्लिक करू

एकात्मिक आदिवासी विकास साधणारा प्रकल्प रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम होत असल्याचा अभिमान - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
सुधागड तालुक्यातील माणगाव खुर्द येथे  आदिम जमातीचे बहुउद्देशीय संकुल उभारण्यासाठी जागा प्रदान अलिबाग, दि.25 (जिमाका): - रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील मौजे माणगांव खुर्द येथील सुमारे 17 हेक्टर गुरचरण जमीन आदिम जमातीच्या बहुउद्देशीय संकुल उभारणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांना प्रदान करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील कातकरी या आदिम जमातीमधील सुमारे 37 हजारांहून अधिक कुटुंबांचा विकास यामुळे होणार आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या आदिम जमातीस विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या बहुउद्देशीय संकुल उभारणीची प्रक्रिया राज्यात सर्वप्रथम रायगड जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण व गौरवास्पद बाब असल्याने अभिमानाची भावना जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी 2021 च्या अर्थसंकल्पात केली होती. त्याची अंमलबजावणी होत असताना या प्रकल्पासाठी अनुकूल जागा महसूल विभागाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोकोपयोगी उपक्रम, शासकीय बां

रायगड जिल्ह्यामधील आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि दरड प्रवण गावांमध्ये सुरक्षा कार्यात त्यांच्यासाठी महिलांचा सहभाग हवा - डॉ.नीलम गोऱ्हे

Image
कोविड काळातील एकल महिलांसाठी अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन अलिबाग, दि.25 (जिमाका): - येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेली दरड प्रवण गावे आणि सातत्याने भूस्खलन होणारे भाग यामध्ये प्रशासनाने बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेक वेळा आपत्ती आल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी काही प्रमाणात आधीच पूर्वतयारी करून ठेवणे आवश्यक आहे. शहरी भागातील नद्यांमध्ये साठलेला गाळ दूर करून शहरी भागात पूर येणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्य करताना पुरुषांसोबत महिलांनाही प्रशिक्षण देऊन बचाव कार्यात समाविष्ट करून घेण्यात यावे, अशा सूचना आज विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला केल्या. आज अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काळातील उपाययोजना विषयावरील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस आमदार महेंद्र दळवी, मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती सुप्रदा फातरपेकर, मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका शितल म्हात्रे, किशोर जैन, ज

जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरू असलेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत --खासदार श्रीरंग बारणे

Image
    अलिबाग, दि.24 (जिमाका): सर्वसामान्य गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे, हा त्यांचा हक्क आहे.   त्यांना हा हक्क मिळवून देणे हे शासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. यानुषंगाने जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरू असलेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व विभागाच्या खातेप्रमुखांना आज येथे केल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक समिती अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे,   सर्वश्री आमदार भरत गोगावले, आ.रविंद्र पाटील, आ.महेंद्र थोरवे, आ.महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक (रोहा) आप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालि

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन

    अलिबाग, दि.24 (जिमाका): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 25 मे 2022 रोजी सकाळी 11.45 वा. विविध शासकीय विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे करण्यात आले आहे, असे उप सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, मुंबई यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 0000000

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पनवेल येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हे सेक्टर 10, प्लॉट नं.21 ग्रीन पार्क सोसायटी समोर कळंबोली,   ता.पनवेल, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच   भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील   विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.   शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व विद्यार्थीनींना छत्री, रे

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच   भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील   विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.   शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व विद्यार्थीनींना छत्

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या तळा येथील मुलांचे शासकीय वसतिगृहातमोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हे बोरघर हवेली, तालुका क्रीडा संकुल जवळ ता.तळा,   जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाची मान्य संख्या 100 आहे. या वसतिगृहात इ.8   वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:- अनुसूचित जाती- 80 टक्के अनुसूचित जमाती- 03 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गातील दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग- 02 टक्के, अनाथ- 02 टक्के, अपंग- 03 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहामध्ये नाष्टा व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे. नाश्ता :- दररोज पाहे/ शिरा/उपीट इ. पैकी एक आलटून पालटून तसेच उकडलेली दोन अंडी, एक सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध दररोज नाष्ट्यासाठी विनामूल्य देण्यात येते.   भोजन व्यवस्था :- दुपार व सायंकाळी जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड, सलाड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. वसतिगृहामध्ये 8 वी ते 10

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हे गौरीनंदन अपार्टमेंट, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर, वरसोली- अलिबाग, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाची मान्य संख्या 75 आहे. या वसतिगृहात इ.8   वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:- अनुसूचित जाती- 80 टक्के अनुसूचित जमाती- 03 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गातील दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग- 02 टक्के, अनाथ- 02 टक्के, अपंग- 03 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहामध्ये नाष्टा व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे. नाश्ता :- दररोज पाहे/ शिरा/उपीट इ. पैकी एक आलटून पालटून तसेच उकडलेली दोन अंडी, एक सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध दररोज नाष्ट्यासाठी विनामूल्य देण्यात येते.   भोजन व्यवस्था :- दुपार व सायंकाळी जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड, सलाड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. वसतिगृह

ई-बाईक्स आणि ई-वाहनांना मोटार वाहन करातून 100 टक्के सूट

    अलिबाग, दि.24 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण- 2021 लागू केले असून ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100 टक्के सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 2(u) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकल्सची व्याख्या दिली असून त्यानुसार 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटर पेक्षा कमी आहे, अशा ई-बाईक्सना नोंदणीपासून सूट आहे. अशा प्रकारे वाहन उत्पादन कारणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची (Vehicle Model) चाचणी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 126 मध्ये विहित केलेल्या मान्यताप्राप्त संस्था (Testing agency) जसे की ARAI, ICAT CIRT इत्यादी या संस्थांकडून घेणे अनिवार्य आहे. काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करतात. तसेच ज्या ई बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे, अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅट पेक्षा जास

समर्पित आयोगाच्या भेटीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन

    अलिबाग, दि.23 (जिमाका):- नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी गठित समर्पित आयोग दि.25 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देणार आहे. या भेटीदरम्यान नागरिक, संस्थांची मते जाणून घेणार असून निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगर पालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी हा समर्पित आयोग विभागनिहाय भेटी देणार आहे. हा आयोग कोकण भवन येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दु

प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या ई-पोर्टलद्वारे ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावा

        अलिबाग,दि.23 (जिमाका):- राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एस. द्वारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा.             जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत. संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयामध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी तगादा लावत आहेत.            तेव्हा सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी, अनुसूचित जाती

इ.1 ली ते इ.8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना कार्यान्वित

  अलिबाग, दि.23 (जिमाका) :- समग्र शिक्षांतर्गत इ. 1 ली ते इ. 8 वी मध्ये शिकणारी कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, यासाठी शासनाने समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरु केली आहे. इ. 1 ली ते इ. 8 वी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 1 लाख 74 हजार 456 विद्यार्थ्यांना 9 लाख 77 हजार 173 पाठ्यपुस्तके शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक)   श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे. 0000000

जिल्ह्यातील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अदालतीचे आयोजन

  जिल्ह्यातील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अदालतीचे आयोजन अलिबाग, दि.23 (जिमाका) :- महालेखापाल, मुंबई यांच्या निर्देशानुसार सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग यांनी जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी निवृत्तीवेतन अदालत आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत गुरुवार, दि.26 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वा. जंजिरा सभागृह, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे निवृत्तीवेतन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.                      जिल्ह्यातील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी   या अदालतीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी माधव रामा सराई यांनी केले आहे. ००००००००