Posts

Showing posts from June 11, 2017

मे-2017 मध्ये 3 लाख 38हजार ध्वजदिन निधी संकलन

मे-2017 मध्ये 3 लाख 38हजार  ध्वजदिन निधी संकलन अलिबाग दि.16 (जिमाका):-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन अंतर्गत रायगड जिल्हयात मे-2017 मध्ये रुपये 3 लाख 38 हजार 759 रुपये इतका ध्वजदिन निधी  संकलित करण्यात आला आहे.  मागील महिन्याच्या अखेर झालेला संकलन निधी 13 लाख 06 हजार 213 रुपये असा एकूण  16 लाख 44 हजार  972 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 30.21 इतकी आहे. जिल्हयाला या वर्षासाठी रुपये 54 लाख 45 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 000

जागतिक योग दिनानिमित्त योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ

जागतिक योग दिनानिमित्त योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ अलिबाग दि.16,(जिमाका):-जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य् अभियान अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त्‍ योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ  करण्यात आला. यावेळी एसओएस व्हिलेज व आयुष विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तिनवीरा, ता.अलिबाग येथील आदिवासी वाडीवरील मुलांसाठी योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.             या प्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, आर्ट ऑफ लिव्हींगचे योगमार्गदर्शक श्री.दामोदर पाटील,जिल्हा सामान्य रुग्णालय येथील योग प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक श्री.रुपेश पाटील,एसओएस व्हिलेजचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री. संजय कचरे व सौ.रिमा सावंत,शिक्षिका श्रीम.जिवीता पाटील,श्रीम तहसीन छापेकर, श्रीम.अस्मिता नाईक,श्रीम.योगिता पाटील, व मान्यवर उपस्थित होते.             एसओएस व्हिलेजद्वारे राबविण्यात येणाऱ्या आदीवासी कुटूंब सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत निरनिराळया आदीवासी वाड्यांवरील मुलांकरीता बाल पंचायत व विशेष सहाय्यता वर्ग भरविण्यात येतात. या मुलांना मार्गदर्शन करतांना श्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथील शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथील शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन अलिबाग दि.16,(जिमाका):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि.रायगड येथे शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत अ.भा.व्यवसाय परीक्षा दिलेल्या परीक्षार्थी ह्यांना आवाहन करण्यात येते की, एप्रिल-2016 च्या परीक्षेपर्यंत सर्व अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र ह्या संस्थेत प्राप्त झालेली आहे. तरी संबंधित उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांना मूळ गुणपत्र व फोटो पासपोर्ट साईज घेऊन, प्रमाणपत्र संस्थेतून सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावे असे असे आवाहन संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री. एस.व्हि.पाटील,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि.रायगड यांनी केले आहे. 0000000000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग दि.16,(जिमाका):-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत शनिवार 17 जून 2017 रोजी दुपारी 2.15 वाजता वकिल संघटना कक्षामध्ये Mediation Awareness Programme मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे एल.डी.हुली,सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 000000 

रायगड जि. प. चा अभिनव उपक्रम

Image
लेख क्र. 22                                                                                                            दि.13.6.2017 रायगड जि. प. चा अभिनव उपक्रम होय, मी सुध्दा जि. प. शाळेतच शिकलो   जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम,शिक्षणाचा दर्जा,देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा याची माहिती देण्याबरोबरच जि.प.शाळेत वि द्या र्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी जिल्हा परिषद रायगड मार्फत राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम… होय, मी सुध्दा जि. प. शाळेतच शिकलो  या विषयी थोडक्यात…             नुकत्याच  शाळा सुरु झाल्या आणि मुलांसोबत पालकांचीही धांदल सुरु झाली. नवीन वर्गात प्रवेश केलेला विद्यार्थी आणि त्याच्यासोबतच विद्यार्थी दशेत गेलेले पालक असे एकूण चित्र जवळपास सर्वत्र दिसून येते.  अगदी ग्रामीण भागात हमखासपणे हेच चित्र आहे.  तर शहरी भागामध्ये यात काहीसा बदल आपणास दिसून येतो तो म्हणजे अगदी नर्सरी, के. जीत प्रवेश घेण्यासाठी देखील परिसरातील उत्तमोत्तम असलेली शाळा निवडण्याची  धांदल दिसून येत आहे.               पण आमच्या रायगड जिल्ह्यात मात्र एक वेगळाच अभिनव उपक्रम