जागतिक योग दिनानिमित्त योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ

जागतिक योग दिनानिमित्त
योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ
अलिबाग दि.16,(जिमाका):-जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य् अभियान अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त्‍ योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ  करण्यात आला. यावेळी एसओएस व्हिलेज व आयुष विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तिनवीरा, ता.अलिबाग येथील आदिवासी वाडीवरील मुलांसाठी योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
            या प्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, आर्ट ऑफ लिव्हींगचे योगमार्गदर्शक श्री.दामोदर पाटील,जिल्हा सामान्य रुग्णालय येथील योग प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक श्री.रुपेश पाटील,एसओएस व्हिलेजचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री. संजय कचरे व सौ.रिमा सावंत,शिक्षिका श्रीम.जिवीता पाटील,श्रीम तहसीन छापेकर, श्रीम.अस्मिता नाईक,श्रीम.योगिता पाटील, व मान्यवर उपस्थित होते.
            एसओएस व्हिलेजद्वारे राबविण्यात येणाऱ्या आदीवासी कुटूंब सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत निरनिराळया आदीवासी वाड्यांवरील मुलांकरीता बाल पंचायत व विशेष सहाय्यता वर्ग भरविण्यात येतात. या मुलांना मार्गदर्शन करतांना श्री.दामोदर पाटील यांनी दैनंदिन आयुष्यात योगाभ्यासाचा अंतर्भाव केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी तसेच शालेय अभ्यासात होणारे फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले तर सीमा रहेजा यांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकांना  उपस्थित मुलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
            या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र विविध शाळा,महाविद्यालये,जेष्ठ नागरिक संस्था,महिला बचत गट,शासकीय रुग्णालये व कार्यालये येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा फायदा जास्तीत जास्त  लोकांना घेता यावा यासाठी इच्छुक संस्थांनी आयुष विभाग,जिल्हा परिषद,अलिबाग या कार्यलयाशी संपर्क साधावा. असे आवाहन डॉ.चेतना पाटील,जिल्हा आयुष अधिकारी यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी केंद्राच्या शिक्षिका श्रीम.जिवीता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक