Posts

Showing posts from January 1, 2017

कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक  आदर्श आचारसंहितेचे पालन करावे                                                        ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.7 (जिमाका)  कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक  कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. कोंकण विभागातील पाच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून  आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी  आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.             यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा माणगाव प्रांत.विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर उपस्थित होते.  कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा  निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्दीचा दिनांक 10 जानेवारी 2017 (मंगळवार), नामनिर्देशन सादर करण्याचा अखेरचा दिनांक 17 जानेवारी 2017 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.18 जानेवारी 2017 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2017 (शुक्रवार),

आपली सुरक्षा परिवाराची रक्षा रस्ता सुरक्षा पंधरवडा विविध उपक्रमांचे आयोजन ---उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने

Image
आपली सुरक्षा परिवाराची रक्षा रस्ता सुरक्षा पंधरवडा विविध उपक्रमांचे आयोजन                                          ---उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने        अलिबाग दि.7 (जिमाका) जिल्ह्यात दि.  9 ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियान  राबविण्यात येणार आहे.  या निमित्त रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या पंधरवडा निमित्त होणाऱ्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रस्ता सुरक्षा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन     समिती सचिव तथा उ प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने यांनी केले आहे.             या संदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक झाली.  या बैठकीला विभागीय नियंत्रक एस.टी.महामंडळ पेण विभाग,विजय गीते, राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक प्रशांत फेगडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर व इतर अधिकारी उपस्थित होते.  य

महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे फायबर ऑप्टीकने जोडणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

Image
महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे फायबर ऑप्टीकने जोडणार                                                                                             -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिबाग,दि.02:- महाराष्ट्रात येत्या 2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजीटल (फायबर ऑप्टीक) करण्यात येतील. या माध्यमातून सर्व गावे डिजीटल होऊन त्या माध्यमातून जलद विकास आणि सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे शहर आणि ग्रामीण भेद दूर होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज खारघर, नवी मुंबई येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत बांधण्यात आलेल्या “ ग्राम विकास भवन ” संकूलाच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आ.प्रशांत ठाकूर, आ.श्रीमती मंदाताई म्हात्रे, माजी खा.रामशेठ ठाकूर, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले क