कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 
आदर्श आचारसंहितेचे
पालन करावे
                                                       ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले






अलिबाग दि.7 (जिमाका)  कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक  कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. कोंकण विभागातील पाच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून  आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी  आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
            यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा माणगाव प्रांत.विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर उपस्थित होते.
 कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा  निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्दीचा दिनांक 10 जानेवारी 2017 (मंगळवार), नामनिर्देशन सादर करण्याचा अखेरचा दिनांक 17 जानेवारी 2017 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.18 जानेवारी 2017 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2017 (शुक्रवार), मतदानाचा दिनांक 3 फेब्रुवारी 2017 (शुक्रवार), मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक 6 फेब्रुवारी 2017 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 9 फेब्रुवारी 2017 (गुरुवार) असा आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग,कोकण भवन, पहिला मजला, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई दूरध्वनी क्र.022-27571501 हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तसेच उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील 5 जिल्हयांमध्ये दि.4 जानेवारी 2017 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. याची सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी आणि सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. या कोकण विभाग मतदार संघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या 5 जिल्हयांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्यात येत असून दि.23 नोव्हेंबर 2016 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. मतदार यादीनुसार कोकण विभाग शिक्षक मतदार एकूण 37644 मतदार आहे. यात रायगड जिल्ह्यातील 10009 मतदारांचा समावेश आहे.  तर  जिल्ह्यात-28 मतदान केंद्र असतील.
जिल्ह्यातील 28 मतदान केंद्र
 1) अलिबाग तहसिल कार्यालय, 2) आवास राजिप मराठी शाळा, 3) हाशिवरे राजिप मराठी शाळा, शिरवली पाडा, 4) पेझारी राजिप मराठी शाळा जुनी इमारत, 5) रेवदंडा राजिप मराठी मुलींची शाळा, 6) कर्जत तहसिलदार कार्यालय), 7) खालापूर तहसिलदार कार्यालय, 8) महाड तहसिलदार कार्यालय, 9) माणगाव तहसिल कार्यालय, 10) गोरेगाव राजिप कन्याशाळा, 11) तळा तहसिल कार्यालय, 12) म्हसळा तहसिल कार्यालय, 13) मुरुड तहसिल कार्यालय, 14) पनवेल तहसिल कार्यालय, 15) पनवेल तहसिल कार्यालय, सभागृहातील पूर्वेकडील बाजू, 16) पनवेल तहसिल कार्यालय सभागृहातील मध्य बाजू, 17) पनवेल तहसिल कार्यालयातील पश्चिमेकडील बाजू, 18) पनवेल तहसिल कार्यालय,दुसरा मजला उत्तरेकडील खोली क्र.1, 19) पनवेल तहसिल कार्यालय,दुसरा मजला दक्षिणेकडील खोली क्र.1 20) पेण तहसिल कार्यालय, 21) पोलादपूर तहसिल कार्यालय, 22) रोहा तहसिल कार्यालय, 23) राजिप ऊर्दू शाळा नागोठणे, 24) सुधागड-पाली तहसिल कार्यालय, 25) श्रीवर्धन तहसिल कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 26) राजिप मुलांची शाळा बोर्ली पंचतन, 27) उरण तहसिल कार्यालय, 28) सेकंडरी स्कूल चिरनेर.
 भारत निवडणूक आयोगाकडील कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दिनांक 7 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. 
000 000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक