Posts

Showing posts from September 20, 2020

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-   पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.              यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिदार सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी-पालकमंत्री कु.आदिती तटकरे

    अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात   ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने काम करीत असून आतापर्यंत या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी पूर्ण झाली असून लवकरच या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” या मोहिमेबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आढावा घेतला.   त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे   उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करताना काही अडचण असल्यास करोना टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष

निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :-   महाराष्ट्र कोषागार नियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि.01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दि.01 ते दि.30 नोव्हेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय सादर करावा लागतो.   सद्य:स्थितीत कोविड-19 विचारात घेता राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.   तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्याबाबत झालेल्या या बदलाची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत हयातीचा दाखला कोषागारात सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला यांनी केले आहे. 000000

गोरेगाव,नांदवी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचा सक्रिय सहभाग

अलिबाग,जि.रायगड दि.23 (जिमाका) :-  सध्या रायगड जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असतानाच मृत्यूच्या आकडेवारीत भर पडत आहे. वाढता मृत्यूदर नियंत्रणात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्यात दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान राबविण्याचा निर्णय घेतला.         त्यानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात दि.15 सप्टेंबर पासून स्थानिक लोकप्रतिनिधी,आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी यांच्यासह, सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवक यांच्या माध्यमातून या मोहिमेस जोरदारपणे सुरुवात करण्यात आली. दरम्यान या मोहिमेस जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो, याची चाचपणी करण्यासाठी बुधवार, दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी गोरेगाव,नांदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या मोहिमेत स्वत: सहभागी झाले. त्यांनी घरांना भेटी देत कोविड - 19 विषयी जनजागृती केली व प्रत्यक्षात थरमल स्कॅनर, ऑक्सिमीटरद्वारे घरातील सदस्यांची आरोग्य  तपासणी केली.   या

"माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मानतर्फे झिराड आणि चेंढरे या गावात स्वतः ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली.

        यावेळी ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी तसेच शरीर तापमान मोजण्यात आले.      त्यांच्यासमवेत तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दीप्ती पाटील-देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घासे, मंडळ अधिकारी जितेंद्र कांबळे ग्रामसेवक सुदेश राऊत, निलेश गावंड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे, वरिष्ठ सहाय्यक देवेंद्र झेंडेकर, ग्रामसेवक प्रशासक अपर्णा शिंदे, आरोग्य सहाय्यक उदय गाडे, आशाताई ,अंगणवाडी सेविका,  आरोग्य सेवक यांची उपस्थिती होती.

अतिवृष्टीची पूर्व सूचना*

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 21 व 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत  रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून  सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.  आपत्ती व्यवस्थापन कक्ष,  जिल्हाधिकारी कार्यालय-अलिबाग

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.21 (जिमाका) :-    जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती उपलब्ध होवू शकेल. तहसिल कार्यालय, अलिबाग-02141-222054, तहसिल कार्यालय, पेण-02143-252036, तहसिल कार्यालय, मुरुड-02144-274026, तहसिल कार्यालय, पनवेल-022-27452329, तहसिल कार्यालय, उरण-022-27222352, तहसिल कार्यालय, कर्जत-02148-222037, तहसिल कार्यालय, खालापूर-02192-275048, तहसिल कार्यालय, माणगाव-02140-262632, तहसिल कार्यालय, तळा-7066069317, तहसिल कार्यालय, रोहा-02194-232232, तहसिल कार्यालय, पाली

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 34 हजार 617 जणांनी केली करोनावर मात*

अलिबाग,जि.रायगड दि. 20 (जिमाका):-* स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 34 हजार 617 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 637 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 115, पनवेल ग्रामीण-749, उरण-197, खालापूर-279, कर्जत-253, पेण-469, अलिबाग-582, मुरुड-41, माणगाव-364, तळा-45, रोहा-371, सुधागड-68, श्रीवर्धन-45, म्हसळा-44, महाड-132, पोलादपूर-57 अशी एकूण 5 हजार 811 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 978, पनवेल ग्रामीण-4 हजार 443, उरण-1 हजार 454, खालापूर-1 हजार 957, कर्जत- 1 हजार 155, पेण-2 हजार 722, अलिबाग-3 हजार 276, मुरुड-277, माणगाव- 1 हजार 217, तळा-91, रोहा-1 हजार 661, सुधागड-281, श्रीवर्धन-283, म्हसळा-239, महाड- 1 हजार 306, पोलादपूर-277 अशी एकूण 34 हजार 617 आहे.                        आज दिवसभरातही पन