Posts

Showing posts from February 17, 2019

कृषि सेवक भरतीबाबत निवेदन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 :- महाराष्ट्र शासन कृषि सेवक भरती सन 2018-19 ची संगणक आधारीत परीक्षा 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावरुन आपले हॉल तिकिट उपलब्ध करुन घ्यावे व त्यात दिलेल्या सुचनेनुसार आपणास देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे याची सर्व परिक्षार्थींनी नोंद घ्यावी. 00000

मतदार नोंदणीसाठी दिनांक 23 व 24 रोजी विशेष मोहिम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणनू मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिनांक 23 व 24 फेब्रुवारी   2019 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्यासाबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच नागरिकांना आपले नांव मतदार यादीत तपासणीसाठी दिनांक 1/1/2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच सर्व नागरिकांनी आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी. मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते त्यामुळे मतदारांनी त्यांच्याकडे ओळखपत्र असले तरीही मतदा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- मा.ना. रविंद्र चव्हाण बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचा   जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.21 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मंत्रालय येथून शासकीय वाहन क्र. एम.एच.-01-ए.एन.-0991 (सिल्वर इनोव्हा) ने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. दुपारी सव्वा तीन वा. गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व स्पीड बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. दुपारी पाऊणे चार वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने इंदापूर,जि. रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वा. वाजता इंदापूर,जि.रायगड येथे आगमन व संजय ढवळे यांची कन्या चि.सौ.का. निशिगंधा हिच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: संजीवनी अपार्टमेंट, विद्यानगर, इंदापूर, जि.रायगड. सायंकाळी सहा वाजता इंदापूर येथून नेरळ,जि.रायगड कडे प्रयाण. रात्रौ साडे आठ वाजता नेरळ येथे आगमन व   सुरेश दादा टोकरे यांची कन्या चि.सौ.का. सायली हिच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: मु.आंबिवली, पो.नेरळ, ता.कर्जत, जि.रायगड. रात्री नऊ वाजता नेरळ येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- मंगळवार दि.19 रोजी   सकाळी आठ वा. अनमोल प्लाझा जांभूळपाडा जि.रायगड येथे आगमन व राखीव.   स.साडे नऊ वा. भेलीव ता.सुधागडकडे प्रयाण.   स.साडे दहा वा. भेलीव येथे आगमन व पुलाचे भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती.    स.अकरा वा. जांभूळपाडा ता.सुधागड ग्रामपंचयायतीस भेट.   स.साडे अकरा वा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनअंतर्गत कानीव्हली-वांद्रोशी रस्त्याचे भूमिपुजन स्थळ : भालगुल फाटा.   दुपारी बारा वा.भैरव कुंभारघर रस्त्याचे भूमिपुजन.   स्थळ : भैरव फाटा ता.सुधागङ   दु.साडेबारा वा. ताडगाव-घोडगाव रस्ता लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.   दु. एक वा. उद्धर रस्ता भूमिपुजन व कार्यकर्ते बैठक.   दु. दोन वा.रोठ किल्ला ता.रोहा किल्ला व धाटाव येथे कार्यकर्ते बैठक.   दु. तीन वा. आयपीसीएल मार्गे शिहू ता.पेणकडे प्रयाण. दु. चार वा. शिहू ता.पेण येथे कार्यकर्ते

पोलीस भरती प्रक्रियेत बदल

अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-   राज्यातील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.   यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,   महाराष्ट्र पोलीस दलातील   कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला आहे.   त्यात बुद्धिमान उमेदवारांची आवश्यकता, भरती प्रक्रियेत शारीरिक   चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना आदी बाबी विचारात घेऊन   गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेत बदल केला आहे.   त्यानुसार, नवीन पद्धतीत उमेदवारांची लेखी परीक्षा आधी घेण्यात येणार आहे.   लेखी परीक्षेत उत्तीर्ण   उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात   आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल. याबदलांमुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने   पार पडेल. जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी कळविले आहे. 00000

डूबी- हातपाटीद्वारे रेती उत्खनन परवान्यासाठी अर्ज मागविले

अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-   जिल्ह्यातील   खाडी, नदी पात्राच्या तटीय क्षेत्रातील स्थानिक पारंपारिक पद्धतीने डूबी, हातपाटीद्वारे रेती उत्खनन व्यवसाय करणाऱ्यांना रेती उत्खनन   परवाना देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा खनिकर्म शाखेकडून जारी केलेल्या सुचनेनुसार,   सागरी किनारपट्टी विनिमय क्षेत्रातून (सी.आर.झेड.) नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी वळू,रेती निर्गती धोरण निश्चित केले आहे.   त्यानुसार   पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक वक्तींना वा अशा व्यक्तींच्या संस्थांना   विनालिलाव पद्धतीने   रेती उत्खननाचे परवाने देण्यात येतात. सन 2018-19 करीता   महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांचेकडून रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी, बाणकोट नदी,   कुंडलिका नदी- रेवदंडा खाडी, अंबानदी, धरमतर खाडी, पाताळगंगा नदी, राजपुरी खाडी (मांदाड नदी) व काळ नदी या खाडी पात्रातील जल सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले आहेत. या खादी नदी पात्रातून रेती उत्खनन परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.   या करीता मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम   बोर्ड, मुंबई यांच

पोलीस भरती प्रक्रियेत बदल

अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-  राज्यातील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.  यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्र पोलीस दलातील  कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला आहे.  त्यात बुद्धिमान उमेदवारांची आवश्यकता, भरती प्रक्रियेत शारीरिक  चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना आदी बाबी विचारात घेऊन  गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेत बदल केला आहे.  त्यानुसार, नवीन पद्धतीत उमेदवारांची लेखी परीक्षा आधी घेण्यात येणार आहे.  लेखी परीक्षेत उत्तीर्ण  उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात  आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल. याबदलांमुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने  पार पडेल. जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी कळविले आहे.

डूबी- हातपाटीद्वारे रेती उत्खनन परवान्यासाठी अर्ज मागविले

अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-  जिल्ह्यातील  खाडी, नदी पात्राच्या तटीय क्षेत्रातील स्थानिक पारंपारिक पद्धतीने डूबी, हातपाटीद्वारे रेती उत्खनन व्यवसाय करणाऱ्यांना रेती उत्खनन  परवाना देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा खनिकर्म शाखेकडून जारी केलेल्या सुचनेनुसार,   सागरी किनारपट्टी विनिमय क्षेत्रातून (सी.आर.झेड.) नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी वळू,रेती निर्गती धोरण निश्चित केले आहे.   त्यानुसार   पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक वक्तींना वा अशा व्यक्तींच्या संस्थांना   विनालिलाव पद्धतीने   रेती उत्खननाचे परवाने देण्यात येतात. सन 2018-19 करीता   महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांचेकडून रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी, बाणकोट नदी,   कुंडलिका नदी- रेवदंडा खाडी, अंबानदी, धरमतर खाडी, पाताळगंगा नदी, राजपुरी खाडी (मांदाड नदी) व काळ नदी या खाडी पात्रातील जल सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले आहेत. या खादी नदी पात्रातून रेती उत्खनन परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.   या करीता मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम   बोर्ड, मुंबई यांच्या व