मतदार नोंदणीसाठी दिनांक 23 व 24 रोजी विशेष मोहिम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणनू मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिनांक 23 व 24 फेब्रुवारी  2019 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्यासाबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच नागरिकांना आपले नांव मतदार यादीत तपासणीसाठी दिनांक 1/1/2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तसेच सर्व नागरिकांनी आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी. मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते त्यामुळे मतदारांनी त्यांच्याकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव आहे की नाही याची तपासणी करावी.
तरी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक यांची नेमणूक करुन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत अवगत करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक