Posts

Showing posts from August 18, 2024

जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.22 :- राष्ट्रीय पशुधन अभियान समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पशुसंवर्धन विभाग रायगड यांच्यामार्फत शुक्रवार, दि.23 ऑगस्ट 2024 रोजी नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे सकाळी 11.00 वाजता जिल्हास्तरीय एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जिल्हातील इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यशाळेस उपस्थित राहून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजानांचा लाभ घेवून जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका साकारावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.  या कार्यशाळेस  जिल्हाधिकारी  किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाडे,  प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई विभाग, मुंबई, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, रायगड-अलिबाग, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील देशी पशुधनाच्या विविध जातींचा विकास करून त्यांची उत्पादकता वाढविणे व पशुपालकांमध्ये उद्योजकता विकसित करून नव उ‌द्योजक निर्माण करून पशुपालन हा प्राथमिक क्षेरातील प्रमुख उद्यो

जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.22 :- 'रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन' च्यावतीने शनिवार दि.24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता क्षात्रैक्य सभागृह, कुरुळ-अलिबाग येथे मा.न्यायमूर्ती श्री.अभय ओक (न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायलय, नवी दिल्ली) यांचे, 'जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व' या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रसाद पाटील यांनी दिली आहे.   या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती श्री.आर.आय. छागला (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.न्यायमूर्ती श्री. एम.एम.साठ्ये (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.ए. एस. राजंदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड उपस्थित राहणार आहेत.  तर विशेष निमंत्रित म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पदाधिकारी अॅड. राजेंद्र उमाप,अध्यक्ष, अॅड. डॉ.उदय वारुंजीकर उपाध्यक्ष, अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.गजानन चव्हाण, अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य  उपस्थित राहणार आहेत. ०००००००

जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना विविध दाखले वाटपासाठी शिबिरांचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.22 :-जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पीएम किसानचा लाभ देण्याकरिता दि.23 ऑगस्ट  ते दि.31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. आदिम जमातीच्या (कातकरी) विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM- JANMAN) ही मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाने 11 प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये 9 मंत्रालयाचा समावेश केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे व पीएम किसान चा लाभ देण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प., तहसिलदार सर्व, गट विकास अधिकारी-पंचायत समिती सर्व, तालुका कृषी अधिकारी सर्व व अग्रणी बँक व्

दि.28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जास्तीत जास्त नागरीकांनी लोक अदालतीचा लाभ घ्यावा

  रायगड (जिमाका)दि.21  :-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये दि.28 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. दि.28सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, ज