Posts

Showing posts from December 30, 2018

महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना.शेखर चरेगांवकर हे   जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.6 रोजी सायं. सात वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व   मुक्काम.   सोमवार दि.7 रोजी सकाळी साडे नऊ वा. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.     स्थळ : आदर्श भवन, भाऊ जगे उद्यानासमोर श्रीबाग.   सकाळी 11 वा. अलिबाग येथून माथेरान ता.कर्जतकडे रवाना.   दुपारी दीड वा.माथेरान येथे आगमन व राखीव.   दोन वा. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित प्रशिक्षण वर्गास उपस्थिती.   स्थळ : हॉटेल उषा एस कॉट माथेरान.   सायंकाळी सहा वा. माथेरान येथे राखीव व मुक्काम.   मंगळवार दि.9 रोजी सकाळी नऊ वा.माथेरान येथून कराड जि.साताराकडे प्रयाण. 00000

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   सोमवार दि.7 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- सोमवार दि.7 रोजी सकाळी सव्वा दहा वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन व राखीव.   सकाळी साडे दहा वा.   मौजे नेरळ ममदापूर येथील बांधकाम परवानगीबाबत बैठक. सकाळी 11 वा.   जिल्हा नियोजन समिती बैठक. स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.   दुपारी चार   वा. अलिबाग येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण. 00000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 59 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवार (दि.04 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 59 हजार 202 बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.  जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (शुक्रवार दि.3) दिवसाअखेर जिल्ह्यातील 27 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 11 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 269 विद्यार्थ्यांना तर 16 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 2 हजार 762 विद्यार्थ्यांना अशा एकूण 3 हजार 31 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 90 हजार 585 मुले  व 2 लाख 68  हजार 617 मुली असे एकूण 5 लाख 59 हजार 202 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5457 शाळांपर्यंत पोहोचली आहे.
पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   शनिवार दि.5 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.5 रोजी सायं. पाच वा. अलिबाग येथे आगमन व जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती.   सायं. साडे सहा   वा. अलिबाग येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण. 00000

अंतोरे ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- मा.राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये ग्रामपंचायत अंतोरे ता.पेण या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढील प्रमाणे.   तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्दी सोमवार दि. 7 जानेवारी 2019. नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर   करणे बुधवार दि. 16   ते मंगळवार दि.22 जानेवारी वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (रविवार दि.20 जानेवारी हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून).    नामनिर्देशनपत्र छाननी करणे बुधवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.     नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम   दिनांक शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत.   निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 3 वा.नंतर.   आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक बुधवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच पर्यंत.   मतमोजणी गुरुवार दि. 7 फेब्रुवारी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नि

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 21 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- महिलांना आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडता यावी यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याचा 3 रा सोमवार हा महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.   त्याअनुषंगाने जानेवारी महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.21 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडित महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज, त्या सोबत आवश्यक कागदपत्र अरावे.   न्याय प्रविष्ठ प्रकरणे,विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदापत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर इत्यादी विषयावरील अर्ज स्विकारले जात नाहीत.     अधिक माहितीसाठी महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, डॉ.वाजे हॉस्पिटल शेजारी, श्रीबाग नं.2, रायगड-अलिबाग, (दूरध्वनी क्र.02141-225321) वर प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम.डी.गायकवाड यांनी केले आहे. 00000

धोकवडे येथे 7 पासून कायदा सेवा व मदत केंद्र

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदे विषयक सेवा व मदत केंद्र धोकवडे ग्रामपंचायतीच्या आवारात दि. 7 जानेवारी पासून सुरु करण्यात येणार आहे.   कायदे विषयक मदत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेस विनामूल्य व तातडीने मिळणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत देशात अशाप्रकारे कायदे विषयक सेवा व मदत केंद्र सुरु करण्यात येत आहेत.   अलिबाग तालुक्यात धोकवडे ग्रामपंचायतीमध्ये हे केंद्र सुरु करण्यात येत आहे. धोकवडे ग्रामपंचायत कार्यालयात सोमवाद दि. 7 रोजी साडेतीन वा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या केंद्रामध्ये सर्वसामान्य लोकांना कायदे विषयक सर्व सहाय्य मोफत प्राप्त होईल. अनुसूचित जाती, जमातीतील व्यक्ती, स्त्री अथवा लहान मुले,अपंग व्यक्ती, तुरुंगातील कैदी, कामगार अथवा ज्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखा पेक्षा कमी अशा व्यक्ती यांना मोफत कायदे विषयक सहाय्य मिळू शकते.    सदर केंद्रामध्ये अनुभवी वकील सल्ला देण्याकरिता उपलब्ध राहतील.   तसेच दोन व

गोवर रुबेला लसीकरण मोहिम: जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 56 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात गुरुवार (दि.03 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 56 हजार 171  बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.  जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (गुरुवार दि.3) दिवसाअखेर जिल्ह्यातील 25 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 9 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 209 विद्यार्थ्यांना तर 16 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 2 हजार 259 विद्यार्थ्यांना अशा एकूण 2 हजार 468विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 88 हजार 960 मुले  व 2 लाख 67  हजार 211 मुली असे एकूण 5 लाख 56 हजार 171 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5430 शाळांपर्यंत पोहोचली आहे.

गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 53 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.02 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 53 हजार 703   बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (बुधवार दि.2) दिवसाअखेर जिल्ह्यातील 28 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 14 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 645 विद्यार्थ्यांना तर 14 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 2 हजार 405 विद्यार्थ्यांना अशा एकूण 3   हजार 50 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 87 हजार 681 मुले   व 2 लाख 66   हजार 22 मुली असे एकूण 5 लाख 53 हजार 703 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5405 शाळांपर्यंत पोहोच

मुरूड जंजिरा परिसर मेडिकल-टुरिझमसाठी विकसीत होणार, राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पर्यटन विभाग, महिंद्रा समूह यांच्यात करार

Image
मुंबई, दि. २ - रायगड जिल्ह्यातील अभेद्य जलदुर्गाचा मुरूड जंजिरा परिसर मेडिकल-टुरिझम दृष्ट्या विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा उद्योग समुह यांच्या दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी आणि पर्यटकांना आकर्षित करणारा असा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता वेद सिंघल, महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, महिंद्रा लाईफस्पेसेसचे अध्यक्ष अरूण नंदा, व्यवस्थापकीय संचालक संगीता प्रसाद, वैभव जांभेकर आदींची उपस्थिती होती.   मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वारसा स्थळ म्हणून मुरूड जजिंरा परिसराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामध्ये आता या पर्यटन प्रकल्पामुळे परिसरातील अनेकविध बाबींना चालना मिळणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला ‘लोकसंवाद’मधून राज्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2-   :   प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   ‘ लोकसंवाद ’ कार्यक्रमात केली.             शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आजपासून ‘ लोकसंवाद ’   कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्याक्रमाच्या पहिल्या भागात जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास ,   शबरी घरकुल ,   पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांदापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालया तील एनआयसी केंद्रात रायगड जिल्ह्यातील लाभार्थी मेदा केळकर, जमनी एस.वाघमारे, ज्ञानेश्वर जे.वाघमारे, मोहिनी के.कांबळे राजू परशुराम वाघमारे, केसरीनाथ भोईर, सिंधुबाई भगत, तुकाराम शांताराम नाईक तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्

गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 50 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.01 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 50 हजार 653  बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.  जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.1) दिवसाअखेर जिल्ह्यातील 23 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 14 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 256 विद्यार्थ्यांना तर 9 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1 हजार 853 विद्यार्थ्यांना अशा एकूण 2  हजार 109 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 85 हजार 985 मुले  व 2 लाख 64  हजार 668 मुली असे एकूण 5 लाख 50 हजार 653 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5377 शाळांपर्यंत पोहोचली आहे.

चारा साक्षरता अभियानास प्रारंभ

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:-  शेतकऱ्यांना चारा, चाऱ्याचे उत्पादन, साठवणूक, चाऱ्याची पौष्टिकता वाढवणे तसेच नवीन सकस चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज (दि.1 जानेवारी 2019) पासून जिल्हाभरात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला. येत्या 10 तारखेपर्यंत हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.  या वेळी जिल्हा नियेाजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. म्हस्के,  जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी शिंदे इनामदार  आदी  मान्यवर उपस्थित होते. या अभियानात शेतकऱ्यांना उपलब्ध हिरव्या चाऱ्याची साठवणूक, मूरघास करुन वर्षभर चारा पुरविणे, चारा बियाणे, वैरण उत्पादन याबाबत चित्ररथाद्वारे माहिती दिली जाणार आहे.  या अभियानाचे वेळापत्रक याप्रमाणे दि.1 जानेवारी अलिबाग तालुका, दि.2 रोजी मुरुड, दि.3 रोजी महाड,  दि.4 पोलादपूर, दि.5 रोजी पेण व माणगाव,  दि.8 रोजी रोहा, म्हसळा

जावळी ता.माणगाव येथे उद्यापासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.1:- रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड-अलिबाग व श्री गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, जावळी संचलित, इंग्लिश स्कूल जावळी व जिल्हा विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   गुरुवार दि . 3 ते   शनिवार दि. 5 जानेवारी या कालावधीत जावळी   ता.माणगाव जि. रायगड येथे जिल्ह्याचे 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन   आयोजित करण्यात आले आहे.           ‘ जिवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ ( Science Solution for Challenges in life) हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे.     या अनुषंगाने उच्च   प्राथमिकस्तर (इ.6 वी ते 8 वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या (इ.9 वी ते 12 वी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासोबत अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा सन 2018-19, राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन   व स्पर्धा, राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा, लोकसंख्या शिक्षण शिक्षकांच्या श

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..! आज ‘लोकसंवाद’ मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 1-   शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल , संगणक , टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या   devendra.fadnavis   या फेसबुक पेजवर , Dev Fadnavis   या ट्विटर हॅण्डलवर आणि   Devendra.Fadanavis   या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या   facebook.com/MahaDGIPR   या फेसबुक पेज आणि   youtube.com/maharashtradgipr   यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) ,   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना , प्रधानमंत्री पीक विमा योजना

गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 48 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.01- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.31 डिसेंबर) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 48 हजार 544   बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (सोमवार दि.31) दिवसाअखेर जिल्ह्यातील 26 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 14 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 868 विद्यार्थ्यांना तर 12 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 2 हजार 399 विद्यार्थ्यांना अशा एकूण 3 हजार 267 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 84 हजार 824 मुले   व 2 लाख 63   हजार 720 मुली असे एकूण 5 लाख 48 हजार 544 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5328 शाळांपर्यंत पोहोचली आ