चारा साक्षरता अभियानास प्रारंभ


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:-  शेतकऱ्यांना चारा, चाऱ्याचे उत्पादन, साठवणूक, चाऱ्याची पौष्टिकता वाढवणे तसेच नवीन सकस चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज (दि.1 जानेवारी 2019) पासून जिल्हाभरात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला. येत्या 10 तारखेपर्यंत हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
 या वेळी जिल्हा नियेाजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. म्हस्के,  जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी शिंदे इनामदार  आदी  मान्यवर उपस्थित होते.
या अभियानात शेतकऱ्यांना उपलब्ध हिरव्या चाऱ्याची साठवणूक, मूरघास करुन वर्षभर चारा पुरविणे, चारा बियाणे, वैरण उत्पादन याबाबत चित्ररथाद्वारे माहिती दिली जाणार आहे.  या अभियानाचे वेळापत्रक याप्रमाणे दि.1 जानेवारी अलिबाग तालुका, दि.2 रोजी मुरुड, दि.3 रोजी महाड,  दि.4 पोलादपूर, दि.5 रोजी पेण व माणगाव,  दि.8 रोजी रोहा, म्हसळा, पनवेल, दि. 9  रोजी खालापुर, कर्जत, दि.10 रोजी  तळा तालुक्यात याप्रमाणे अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांच्या हस्ते चारा बियाणे वाटप करण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक